Hunny  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Goa: रानावनात रममाण होणारा गोव्यातील आनंद मेळेकर

गोव्यातील लोकांना किंवा वेगवेगळ्या ठिकाणाहून येणाऱ्या पर्यटकांना ग्रामीण गाईड म्हणूनही आनंद काम करतो.

दैनिक गोमन्तक

गुळेली: आपल्या गोमंतक भूमीत निसर्गाच्या सान्निध्यात रममाण होणारी किती रत्ने आपण पाहत आलो आहोत. अशेच एक रत्न सत्तरी तालुक्यातील गुळेली पंचायत क्षेत्रातील मेळावली भागातील शेळ येथे राहणारे आहे.

आपले काम की आपण या उक्तीप्रमाणे निसर्गाच्या सान्निध्यात दिवस घालविणारे आनंद राघोबा मेळेकर एक उत्कृष्ट साप पकडणारे आहेत. सर्पमित्र अमृतसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली साप पकडण्याचे तंत्र त्यांनी शिकून घेतले आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली विविध ठिकाणी साप पकडण्यासाठी जात असतात. आजपर्यंत कितीतरी सापांना त्यांनी जीवदान दिले आहेत. गोव्यात (Goa) आढळणारे अधिकाधिक साप आपण पकडले आहे असे त्यांनी सांगितले आहे.

सध्या बोंडला अभयारण्यात काम करत आपल्या फावल्या वेळी निसर्ग भ्रमण करत असतांना निसर्गाच्या कुशीतील नवनवीन गोष्टी शिकत आहे अशी त्यांनी माहिती दिली आहे. आनंद यांनी त्यांच्या वडील राघोबा रावजी मेळेकर यांच्याकडून निसर्ग भ्रमंतीचा वारसा घेतला. निसर्गात आढळणाऱ्या विविध गोष्टींचा अभ्यास जणू त्यांनी आपल्या वडिलांकडून शिकून घेतला. वडील कामानिमित्त रानावनात भटकत होते. या निसर्ग भ्रमंतीत झाडावर,ढोलीत, आढळणारे मधाची पोळी काढत होते. हे काम आनंदने सध्या शिकून घेतले असून वेगवेगळ्या ठिकाणी मधाची पोळी काढून देण्याचे ही काम तो करतो आहे. स्व:ता बांबुत मध पैदास करण्याच काम करत आहे. अशा प्रकारचे सुमारे शंभर छोटे छोटे बांबू त्याच्याजवळ असून या बांबूत मध तयार झाल्यावर ते आवश्यक लोकांना देत आहे. खोखल्यावर रामबाण औषध म्हणून लोक या मधाचा वापर करतात. कोंघे, बडयाळे, सातोडे, पोळे अशा विविध प्रकारच्या माध्यमातून मध (Honey) गोळा ते करतात.

याबरोबर जून्या पारंपरिक गोष्टी, अवजारे यांचे संकलन करण्याचा छंदही आनंद बाळगतो . वेगवेगळ्या ठिकाणी अशा प्रकारची प्रदर्शने त्यांनी मांडली आहे. यात जूनी अवजारे,भांडी, दैनंदिन उपयोगातील वस्तू आदिंचा समावेश आहे. सत्तरीतील वेगवेगळा भाग त्याचा परीचयाचा आहे. यामुळे गोव्यातील लोकांना किंवा वेगवेगळ्या ठिकाणाहून येणाऱ्या पर्यटकांना ग्रामीण गाईड म्हणूनही तो काम करतो. फक्त वाट दाखवायचे काम न करता त्या भागांची माहिती तो लोकांना देतो.

आनंद राघोबा मेळेकर

निसर्गात (Nature) आढळणाऱ्या विविध नवनवीन गोष्टींची माहिती करुन घेत ती फक्त आपल्यापर्यंत न ठेवता इतरांनाही करुन देण्याचे काम आनंद करीत आहेत. भारत (India) सरकारच्या नेहरु युवा केंद्राच्या आयोजित विविध शिबिरात एक वक्ता म्हणूनही या प्रकारची निसर्गाची माहिती व निसर्गातील प्राण्यासंबंधी जागृती करण्याचे काम आनंद करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT