Gooseberry Dainik Gomantak
लाइफस्टाइल

'या' 6 आजारांनी ग्रासलेल्या लोकांनी आवळा खाऊ नये

आवळ्याचे पोषक घटक रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचेही काम करतात. आहाराबरोबरच अनेक प्रकारच्या औषधांमध्येही याचा वापर केला जातो.

दैनिक गोमन्तक

हिवाळ्यात आवळा खाणे खूप फायदेशीर मानले जाते. व्हिटॅमिन सी समृद्ध असण्याबरोबरच अनेक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स देखील त्यात आढळतात. म्हणूनच याला हिवाळ्यातील सुपरफूड असेही म्हणतात. आवळ्याचे पोषक घटक (Nutrients) रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचेही काम करतात. आहारा बरोबरच अनेक प्रकारच्या औषधांमध्येही याचा वापर केला जातो. आवळ्याचा सर्वांनाच फायदा होत नाही आणि काही विशिष्ट परिस्थिती असलेल्या लोकांना देखील आवळ्याचे दुष्परिणाम जाणवू शकतात. चला जाणून घेऊया कोणत्या लोकांनी आवळा खाऊ नये.

अ‍ॅसिडिटी असलेले लोक - आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी (Vitamin C) भरपूर प्रमाणात असते. हे एक पोषक तत्व आहे जे फळाची आम्लता वाढवण्याचे काम करते. अभ्यासानुसार, आवळा छातीत जळजळ होण्याची समस्या दूर करते, परंतु ते हायपर अॅसिडिटी असलेल्या लोकांमध्ये समस्या वाढवू शकते.

रक्ताशी निगडीत असलेले आजार - आवळ्यामध्ये अँटीप्लेटलेट गुणधर्म असतात. याचा अर्थ ते रक्ताच्या गुठळ्या तयार होण्यास प्रतिबंध करू शकतात. आवळ्याच्या या गुणधर्मामुळे हृदयविकाराच्या झटक्याचा धोका कमी होतो, परंतु ज्यांना आधीच कोणत्याही प्रकारच्या रक्त विकाराने ग्रासले आहे त्यांच्यासाठी आवळा हा चांगला पर्याय नाही. अशा लोकांनी डॉक्टरांशी संपर्क साधल्यानंतरच आवळा खावा.

ज्या लोकांची शस्त्रक्रिया आहे- ज्यांना लवकरच एखाद्या गोष्टीसाठी शस्त्रक्रिया करावी लागणार आहे, त्यांनी सध्या आवळा खाणे टाळावे. या फळाचे जास्त सेवन केल्यास रक्तस्त्राव होण्याचा धोका वाढतो. प्रदीर्घ रक्तस्रावामुळे हायपोक्सिमिया, गंभीर ऍसिडोसिस किंवा मल्टीऑर्गन डिसफंक्शन होऊ शकते. त्यामुळे शस्त्रक्रियेच्या किमान 2 आठवडे आधी आवळा खाणे बंद करावे, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

रक्तातील कमी साखरेचे प्रमाण- आवळा रक्तातील साखरेची पातळी कमी करते. मधुमेह असलेल्या लोकांसाठी हे फायदेशीर आहे. परंतु ज्या लोकांच्या रक्तातील साखरेची पातळी अनेकदा कमी असते त्यांच्यासाठी हे चांगले नाही. किंवा जे लोक मधुमेहविरोधी औषध घेत आहेत.

गरोदर किंवा स्तनपान करणाऱ्या महिला- आवळ्यामध्ये असे अनेक आवश्यक पोषक घटक आढळतात जे शरीरासाठी फायदेशीर असतात, परंतु ते जास्त प्रमाणात खाल्ल्याने पोट खराब होऊ शकते. यामुळे डायरिया आणि डिहायड्रेशन सारख्या समस्या देखील उद्भवू शकतात. गर्भवती किंवा स्तनपान करणाऱ्या महिलांमध्ये ही लक्षणे अधिक गंभीर असू शकतात. या महिलांनी डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच आवळा खावा.

कोरडी टाळू किंवा त्वचेचे आजार असलेले लोक- जर तुमची टाळू कोरडी असेल किंवा तुमची त्वचा कोरडी असेल तर आवळा जास्त खाल्ल्याने ही समस्या वाढू शकते. यामुळे केस गळणे, खाज येणे, कोंडा होणे आणि केसांशी संबंधित इतर समस्या उद्भवू शकतात. आवळ्यातील काही घटक डिहायड्रेशन वाढवतात. त्यामुळे आवळा खाल्ल्यानंतर भरपूर पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karapur: 'गावावर घाला घालणारा मेगा निवासी प्रकल्प नकोच'! कारापूरवासीयांचा ठाम निर्धार; संघटितपणे देणार लढा

Enough Is Enough: 'कृषी विधेयक सभागृहात सादर न होणे दुर्दैवी'! फर्दिन रिबेलोंचे प्रतिपादन; श्रीस्थळ येथे ‘इनफ इज इनफ’अंतर्गत सभा

Goa Government Jobs: गोमंतकीय तरुणांसाठी सुवर्णसंधी! 67 पदांची होणार भरती; कुठे कराल अर्ज? जाणून घ्या..

Shigmotsav: ‘घुमचे कटर घूम'! वास्‍कोत शिमगोत्सवानिमित्त शोभायात्रा; वेशभूषा, रोमटामेळ, चित्ररथ आकर्षण

Rahul Dravid: "भारतीय संघाची कामगिरी काबिल ए तारीफ"! द वॉल 'राहुल द्रविड'कडून भरभरून कौतुक; जीवनगौरव पुरस्काराने केले सन्मानित

SCROLL FOR NEXT