'Aloe Vora Dainik Gomantak
लाइफस्टाइल

केसांमध्ये 'Aloe Vora' जेल ओल्या केसांमध्ये लावावे की कोरड्या? जाणून घ्या वापरण्याची योग्य पद्धत

कोरफड आरोग्यासह केसांसाठी देखील खूप फायदेशीर आहे.

दैनिक गोमन्तक

Healthy Hair: कोरफड आरोग्यासह केसांसाठी देखील खूप फायदेशीर आहे. त्वचेसंबंधित कोणतेही समस्या असो किंवा केसासंबंधित असो तुम्ही कोरफडच्या रसाचा वापर करु शकता. केसांना पुरेसे पोषण देण्यासोबतच कोरफडीचे जेल केसांसाठी कंडिशनर म्हणूनही काम करते.

पण केसांना कोरफडचा रस कसा लावायचा याबद्दल अनेक लोकांना माहिती नसते. काही लोक ओल्या केसांमध्ये लावतात तर काही कोरड्या केसांमध्ये लावतात. चला तर मग जाणून घेउया केसांमध्ये कोरफडचा रस लावण्याची योग्य पद्धत कोणती आहे.

  • योग्य पद्धत कोणती

कोरड्या केसांमध्ये कोरफडचे जेल लावावे. ओल्या केसांमध्ये लावल्यावर त्यातील ओलावा केसांच्या पाण्याबरोबर सोकुन जातो. यामुळेच कोरफडचा जेल नेहमी कोरड्या केसांमध्ये लावावा.

Healthy Hair
  • कसं लावायचं?

कोरफडचा गर एका भांड्यात काढावा.

बोटांच्या मदतीने केसांच्या मुळांपासून संपुर्ण केसांवर लावावे

यानंतर अर्धा तास तसेच केसांमध्ये ठेवावे.

अर्ध्या तासानंतर केस शॅम्पूने स्वच्छ धुवावे.

  • किती वेळा लावावा?

कोरफडचा गर आठवड्यातून दोनदा केसांना लावु शकता. हे उत्तम कंडिशनिंग आणि स्मूथिंगचे काम करते. ते लावल्यानंतर नेहमी सौम्य शँम्पू वापरा. तुम्ही कोरफडचा गर इतर गोष्टींसोबत मिक्स करुन लावू शकता. तुम्ही त्यात खोबरेल तेल किंवा बदामाचे तेल टाकून केसांना लावू शकता.

कोरफड दीर्घकाळ कसे साठवून ठेवू शकता 

  • कोरफडीचे तीन थर असतात

कोरफडचे (Aloe Vera) तीन थर असतात. यातील पहिल्या थराला मांसल म्हणतात, जो तुम्हाला बाहेरून काटेरी स्वरूपात दिसतो. मधल्या थराला लेटेक्स म्हणतात. जेव्हा तुम्ही पाने तोडता तेव्हा तेथे असलेले अलॉइन पिवळे दिसेल. शेवटी, तुम्हाला आतील म्यूकोसा दिसतो जो पारदर्शक असतो. तो एक लगदा आहे.

  • अलॉइनचे नुकसान काय आहे

जर तुम्ही Aloin चे सेवन केले तर त्यामुळे पोटात दुखणे आणि डायरिया सारख्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे कोरफड वापरताना ते काढायला विसरू नका.

  • कोरफड मधून एलोइन थर कसा काढायचा

वाहत्या पाण्याखाली पान ताबडतोब धुवा आणि नंतर पानाचा खालचा थर कापून टाका.

आता पानांचा खालचा भाग एका ग्लास पाण्यात बुडवून ठेवा आणि थोडा वेळ राहू द्या.

आता ते स्वच्छ कापडाने किंवा टिश्यूने स्वच्छ करा. यानंतर, चाकूच्या मदतीने कट करु शकता.

  • कसे साठवायचे

कोरफडच्या पानांपासून चमच्याने त्याचा गर काढून मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावा. नंतर सेट होण्यासाठी आईस क्यूब ट्रेमध्ये ठेवावा. जेव्हा तुम्हाला ते वापरायचे असेल तेव्हा ते फ्रीजमधून बाहेर काढून वापर करु शकता.

कोरफड रसाचे इतर फायदे

  • या रसाच्या सेवन केल्यास डिहायड्रेशनची समस्या दूर होते.

  • पचनासाठी फायदेशीर आहेत.

  • बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करते.

  • पोटातील गॅसची समस्या दूर होते.

  • वजन कमी करण्यास मदत करते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT