Adhik Shrawan Maas Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Adhik Shrawan Maas: अधिक श्रावण महिन्यात कोणत्या गोष्टी पाळल्या पाहिजेत, वाचा एका क्लिकवर

अधिक श्रावणात कोणत्या गोष्टी कराव्या हे जाणून घेणार आहोत.

Puja Bonkile

Adhik Shrawan Maas: या वर्षी 18 जुलै 2023 पासून अधिक श्रावण सुरू होत आहे. यंदा एकंदरीत 59 दिवसांचा श्रावण असणार आहे. यात अधिक श्रावण आणि निज श्रावण यांचा समावेश आहे. यामधील अधिक श्रावणाला आता सरूवात होणार आहे. यामुळे अधिक श्रावणात कोणत्या गोष्टींचे पालन केले पाहिजे हे जाणून घेऊया.

  • अधिक श्रावणात कोणत्या गोष्टींचं पालन करावं?

अधिक श्रावण महिन्यात मांसाहार करू नये. मद्यपान करणे टाळावे. भगवान भोलेनाथांवर अभिषेक करावा.

भगवान नरसिंह आणि श्रीविष्णू यांची पूजा करावी. श्रीविष्णूंचं रूप असणाऱ्या भगवान नरसिंह यांचा अवतार याच महिन्यात झाल्याचे सांगितले जाते.

या महिन्यात भगवत गीतेचं वाचन, राम कथेचं वाचन, विष्णू सहस्त्रनाम याचे पठण करावे. या महिन्यात ओम नम: शिवाय या मंत्राचे दिवसातून 108 वेळा पठण करावे.

अधिक श्रावण महिन्यात एकवेळ जेवणे हे शास्त्राच्या आणि विज्ञानाच्या दृष्टीने आरोग्यदायी मानले जाते.

या महिन्यात दीपदान आणि ध्वजदानाला फार महत्व आहे.

कर्ज फेडणं, शस्त्रक्रिया करणं अशी काम या महिन्यात करावी.

अधिक श्रावणात दानाचंही महत्व सांगण्यात आले आहे. अधिक श्रावणात दान केल्याने मोठं पुण्य मिळते असे सांगण्यात आले आहे.

अधिक श्रावणात यात्रा करणा, दान करणे, व्यवसायात भागिदारी करणे, वृक्षारोपण करणे, या गोष्टी अत्यंत शुभ मानल्या जातात.

अधिक श्रावणात विवाह करणे, मुंज करणे, गृहप्रवेश करणे, संन्यास घेणे किंवा दीक्षा घेणे, यज्ञ करणे अशी शुभ किंवा मंगल कार्य करू नये.

या महिन्यात दागिने खरेदी करणे, वस्त्र खरेदी करणे, घर, दुकान, वाहन खरेदी करणे टाळावे. मात्र एखादा शुभ मुहूर्त असल्यास ज्योतिष्याचा सल्ला घेउन खरेदी करू शकता.

या महिन्यात गृहकलह, खोटं बोलणं, अपशब्द वापरणं टाळावं.

कोणत्याही प्रकारचं खोदकाम म्हणजेच विहीर खोदणे, तलाव खोदणे अशी कामं टाळावी.

(Disclaimer - या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Highway: जमिनी गेल्या, रस्ताही अडला; उगवेकरांचा संताप, एनएच 66 मुळे दैनंदिन जीवन विस्कळीत; मोबदल्याची अद्याप प्रतीक्षा

Bicholim Hit And Run Case: सुरक्षेचा 'तिसरा डोळा' ठरला कर्दनकाळ; अपघातानंतर पळणाऱ्या चालकाच्या मुसक्या आवळल्या, डिचोली पोलिसांची कारवाई

"वाघांचे मृत्यू अन् वन विभागाचे अपयश"; पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर यांचा थेट प्रहार!

Goa Crime: काकाची हत्या करून मावशीकडे घेतला आश्रय! बोरी येथील दीपक नाईक हत्या प्रकरणातील संशयित नराधम पोलिसांच्या तावडीत

Goa Accident: अटल सेतूवर विचित्र अपघात! 1 नाही, 2 नाही... 7 गाड्या एकमेकांना धडकल्या, वाहतूक विस्कळीत; Watch Video

SCROLL FOR NEXT