Adhik Maas 2023 Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Adhik Maas 2023: अधिक मास म्हणजे काय? जाणून घ्या महत्त्व

यंदा अधिक मास हा 18 जुलैपासून सुरू होत आहे आणि 16 ऑगस्ट रोजी संपेल.

Puja Bonkile

Adhik Maas 2023: तीन वर्षांतून एकदा येणारा अधिकारमास हा 18 जुलैपासून सुरू होणार आहे. तर श्रावण महिना ऑगस्टपासून सुरू होणार आहे. पण यंदा श्रावण महिन्यात अधिकमास आला आहे. दर तीन वर्षांतून एकदा वर्षातील एक अतिरिक्त महिना असतो ज्याला अधिकामास म्हणतात. हा अधिक मास 16 ऑगस्टला संपणार आहे.

यंदा अधिक मास श्रावण असल्याने सर्वत्र भक्ति-कीर्तनाचा गजर होणार आहे. यादरम्यान महादेवाची पुजा केल्याने अधिक लाभ मिळणार आहे.

  • अधिक मासाचे महत्व

अधिक मास श्रावणात भगवान शंकराला प्रसन्न करून लाभ मिळवण्यासाठी मनभावे पूजा करावी. अधिक मास यालाच मलमास किंवा पुरुषोत्तम मास असे देखील म्हणतात. आदिमासात सूर्य संक्रांत नसते, म्हणूनच या महिन्याला मलमास म्हणतात. 

हिंदू धर्मानुसार जगातील प्रत्येक जीव जल, अग्नि, आकाश, वायू आणि पृथ्वी या पाच घटकांनी बनलेला आहे. ज्या काळात व्यक्ती धार्मिक कार्यांसह ध्यान, ध्यान, योग इत्यादीद्वारे आपल्या शरीरात उपस्थित असलेल्या या पंचमहाभूतांचा समतोल स्थापित करण्याचा प्रयत्न करतो. म्हणूनच अधिकमास दरम्यान केलेल्या कामांनी दर तीन वर्षांनी परम शुद्धता प्राप्त केल्यानंतर व्यक्ती नवीन उर्जेने कामाला सुरूवात करतो. या महिन्यात विवाह, मुंडन, गृह प्रवेश, विधी असे कोणतेही शुभ कार्य केले जात नाही.

अधिक मास दर तीन वर्षांनी येतो. यंदा 18 जुलैपासून अधिक मास श्रावण सुरू होत असून 16 ऑगस्टला संपणार नाही. या काळात कोणत्याही शुभ कार्यासाठी मुहूर्त नाही. तर श्रावण महिना हा ऑगस्टपासून सुरू होणार आहे.

  • महादेवाला प्रसन्न करण्यासाठी कोणत्या गोष्टी अर्पण कराव्या

  1. महादेवाला बेलाची पाने प्रिय असून हे अर्पण केल्यास लवकर प्रसन्न होतील.

  2. महादेवाला धोत्र्याचे फुल अर्पण केल्यास त्यांची कृपा आपल्यावर कायम राहते.

  3. भोलेनाथला तांदूळ अर्पण करावे. त्यामुळे लोकांच्या जीवनात धनाचा वर्षाव होतो आणि गरीबी दूर होते.

  4. तुम्हाला तुमच्या आयुष्यातील पाप नष्ट करायचे असल्यास महादेवाला तीळ अर्पण करावे.

  5. घर आणि जीवनात सुख समुद्धी आणण्यासाठी जवस अर्पण केले पाहिजे.

  6. संतान प्राप्तीसाठी महादेवाला देवाला गहू अर्पण करावे.

  7. महादेवाला प्रसाद अर्पण केल्यानंतर त्याचे गरीबांमध्ये वाटप करावे.

  8. महादेवाला प्रसन्न करण्यासाठी डमरू वाजवावा.

  9. घरात सदस्य सारखे आजारी असतात त्यांनी शंकराला पाणी अर्पण करावे.

  10. भोग आणि मोक्ष प्राप्तीसाठी शंकराला गंगा जल अर्पण करावे.

  11. महादेवाला दूध, मध अर्पण करावे

(Disclaimer - या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT