Floods Twitter/ @ANI
Image Story

Floods: गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटकात भारतीय नौदल दाखल

महाराष्ट्रातील मृत्यूची संख्या गेल्या 48 तासांत 129 वर पोहोचली आहे. तलाई गावाजवळ दरड कोसळल्याने. एनडीआरएफचे पथक आणि स्थानिक अधिकारी महाडमध्ये बचावकार्यात कार्यरत आहेत.

दैनिक गोमन्तक

सतत पावसामुळे शहरी आणि ग्रामीण भागातील पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा येथील पुरग्रस्त भागाच्या राज्य व जिल्हा प्रशासनांना मदतीला भारतीय नौदलाची पश्चिम नौदल तुकडी मदतीसाठी धावून आली आहे.

Floods

रायगड येथे मुंबईहून एक सीकिंग 42 सी हेलिकॉप्टर तैनात करण्यात आले आहे. गोवा येथील एक ALH हेलिकॉप्टर रत्नागिरीत बचावासाठी तैनात करण्यात आले आहे.

Floods

कर्नाटकात झालेल्या अतिवृष्टीमुळे कड्रा धरण, मल्लापूर कुर्निपेट, कैगाजवळ अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी भारतीय नौदल आपत्कालीन पथका (ERT) तैनात करण्यात आले. या तुकडीने भैरे गावातून 100 हून अधिक लोकांना वाचविण्यात यश मिळविले आहे.

Floods

महाराष्ट्रातील मृत्यूची संख्या गेल्या 48 तासांत 129 वर पोहोचली आहे. बहुतेक मृत्यू रायगड आणि सातारा जिल्ह्यात झाले आहेत भूस्खलन वगळता अनेक लोक पुराच्या पाण्यात बुडाले आहेत.

Floods

कोल्हापूर(Kolhapur), सातारा(Satara) अन् सांगलीला(Sangali) पुन्हा महापुराचा धोका निर्माण झाला असून पुण्याच्या घाटमाथ्यावरही जोरधार सुरू आहे. या जिल्ह्यातील एकूण 84,452 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

Floods

महाराष्ट्र व गोव्यात पूर परिस्थिती निर्माण झाल्याने हेलिकॉप्टर्स व्यतिरिक्त, भारतीय वायुसेनेची तुकडीही मदतीला धावून आली.

Floods

मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारणाच्या मदतीने भुवनेश्वर ते पुणे, रत्नागिरी आणि गोवा येथे एनडीआरएफच्या 21 जवानांची तुकडी तैनात करण्यात आली.

Floods

पुरात अडकेलेल्या लोकांना वाचवण्यासाठी भारतीय नौदल आपत्कालीन पथकाला (ERT) तैनात करण्यात आले.

Floods

पुरात अडकेलेल्या लोकांना वाचवण्यासाठी भारतीय नौदल आपत्कालीन पथकाला (ERT) तैनात करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Shipyard Blast: लोटली स्फोटातील मृतांची संख्या वाढली; शिपयार्ड सील, सुरक्षा अधिकाऱ्याला अटक!

Asim Munir: पाकचे सैन्य प्रमुख आसिम मुनीरने पुन्हा ओकली गरळ; भारताला दिली अणुयुद्धाची धमकी Watch Video

Indian Railways: रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी! एसी कोचमध्ये स्वच्छतेवर भर; प्रवाशांना मिळणार कव्हर घातलेले ब्लँकेट

चौकार-षटकारांचा पाऊस, 'पॉवर हिटर' किरण नवगिरेनं रचला इतिहास; टी-20 मध्ये झळकावलं सर्वात जलद शतक

Diwali Market: 200 वर्षांची परंपरा धोक्यात! 'भायले' व्यापारी आल्याने गोमंतकीय दुकानदारांचा व्यवसाय थंड

SCROLL FOR NEXT