गोव्यातील मॅरेज बीच
गोव्यातील मॅरेज बीच Dainik Gomantak
Image Story

गोव्यातील मॅरेज बीच

दैनिक गोमन्तक
गोव्यातील मॅरेज बीच

लग्नासाठी लोक चांगली ठिकाणे शोधत असतात. आणि हल्ली डेस्टिनेशन वेडिंगचा ट्रेंड जरा जास्तच वाढला आहे. यामध्येही समुद्रकिनारी विवाहसोहळा करण्याकडे लोकांचा जास्त कल आहे. आज आम्ही तुम्हाला गोव्यात मॅरेज बीचबद्दल सांगणार आहोत.

गोव्यातील मॅरेज बीच

बीच मॅरेज

गोवा हे केवळ एक उत्तम पर्यटन स्थळ तर आहेच मात्र डेस्टीनेशन वेडींगसाठी देखील गोव्याला जास्त पसंती दिली जाते आहे. गोव्यातील समुद्रकिनारे हे आकर्षणाचे केंद्र आहेत आणि अर्थातच सुंदर समुद्राभोवती विवाहसोहळे आयोजित केले जातात.

गोव्यातील मॅरेज बीच

गोवा मॅरियट रिसॉर्ट आणि स्पा

गोवा मॅरियट रिसॉर्ट आणि स्पा येथे एक आदर्श विवाह पार पडू शकतो. प्लॅनर्सला आपला दिवस अविस्मरणीय करायचा असेल तर हॉटेल नियोजक तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतील.

गोव्यातील मॅरेज बीच

लीला गोवा

लीला गोव्यात अरबी समुद्राच्या विस्तीर्ण भागाकडे एक लॉन आहे आणि अजून एक लहान लॉन साल नदीकडे आहे. येथील विवाहसोहळे आकर्षक असतात. आपल्या आजूबाजूला नैसर्गिक सौंदर्य बघायला मिळते.

गोव्यातील मॅरेज बीच

ग्रँड हयात गोवा

आश्चर्यकारक सुविधांचे जग असलेले एक आलिशान हॉटेल, येथील लग्न म्हणजे एकदम ग्रॅड. या रिसॉर्टमध्ये एक रोमँटिक वातावरण आहे. बीचवर लग्न करायच्या विचारात असाल तर आपल्या पार्टनर सोबत तुम्ही इथे लग्नाचा आनंद घेवू शकतो.

गोव्यातील मॅरेज बीच

ललित गोल्फ आणि स्पा रिसॉर्ट गोवा

स्वतःचा खाजगी समुद्रकिनारा असलेले हॉटेल हे स्वतःचे एक जग असते आणि येथे विवाहसोहळा अगदी सुंदर पध्दतीने पार पडू शकतो. तुम्ही बीचफ्रंट, पूलसाइड किंवा तिथल्या लॉनमध्ये तुमच्या लग्नाचे सुंदर फोटो घेवू शकता शकता.

गोव्यातील मॅरेज बीच

वेस्टिन गोवा

तुमच्या नियोजनानुसार तुम्हाला सुंदर ठिकाण मिळू शकते. वेस्टिन गोवा एक उत्तम पर्याय आहे.. हॉटेल तुम्हाला 400 पाहुण्यांच्या उपस्थितीसह आणि सुविधांनी युक्त असा एक भव्य विवाह सोहळा आयोजित करून देतील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's Live News: गोव्यात सकाळी नऊपर्यंत 13.02 टक्के मतदान

Lok Sabha Election 2024: ''लोकसभा निवडणुकीनंतर ओबीसींच्या प्रलंबित मागण्या मार्गी लावणार''; CM सावंत यांची ग्वाही

Lok Sabha Election 2024: तिसवाडीत एक लाख मतदार बजावणार मतदानाचा हक्क; खिस्ती मते ठरणार निर्णायक

Congress Leader Shashi Tharoor: ‘व्‍यक्तिस्‍वातंत्र्य’ अबाधित राहावे; शशी थरूर यांनी लेखक, विचारवंतांशी मडगावात साधला संवाद

Lok Sabha Election 2024: दक्षिण गोव्यात आज विक्रमी मतदानाची शक्यता; विरियातो अन् पल्लवी यांच्यात निकराची लढाई

SCROLL FOR NEXT