Hair Care: मजबूत केसांसाठी आयुर्वेदिक तेल गुणकारी Dainik Gomantak
भृगराज हे फुल सूर्यफूलाचा एक प्रकार आहे. त्याची पाने केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. यात लोह, मॅग्नेशियम, जीवनसत्त्वे ई आणि डी चा समावेश असतो. यामुळे केसांच्या मुळा मजबूत होतात.
मेथी दाणे केसांचे आरोग्यसाठी गुणकारी ठरते. केसांमधील कोंडा, केसांचे गळने, यासारख्या समस्या दूर होतात. यात लोह, प्रथिने, फॉलिक ऍसिड यासारखे पोषक घटक असतात. तुम्ही मेथी दाण्याची बारीक पेस्ट तयार करून मेसच्या मुळात लावू शकता. यामुळे केस मजबूत होण्यास मदत मिळते. पातळ आणि गळणाऱ्या केसांची समस्या दूर करण्यासाठी आवळा उपयुक्त ठरतो. यात व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. यामुळे केसांचे आरोग्य निरोगी राहून केस मजबूत होतात.यामुळे आवळाच्या तेलाचा वापर करणे केसांसाठी फायदेशीर ठरते.