If acidity occurs during fasting, do this remedy Dainik Gomantak
Image Story

Shrawan Fast: उपवासा दरम्यान अ‍ॅसिडिटी होते का? मग हे उपाय करुन पहाच

दुधी भोपळ्याचा रस घेतल्याने अ‍ॅसिडिटीचा (Acidity) त्रास कमी होतो.

दैनिक गोमन्तक

श्रावण महिना (Shrawan Fast) हा पवित्र मानला जातो. या महिन्यात माहादेवची पूजा केली जाते. या महिन्यात अनेकजण उपावस (Fast) करतात. प्रत्येकजण वेगवेगळ्या प्रकारचे उपवास करतात. काहीजण काहीच न खाता संपूर्ण महिना उपवास करतात तर काहीजण फक्त फळे खाऊन उपवास करतात. परंतु सतत उपवास केल्यामुळे अनेकांना अ‍ॅसिडिटीचा (Acidity) त्रास उद्भवतो. हा त्रास दूर करण्यासाठी काही घरगुत उपाय अवलंबू शकता.

* बडीसोपचे पाणी

बडीसोप रात्रभर पाण्यात भिजत ठेवावे. नंतर सकाळी उठल्यावर बडीसोपचे पाणी प्यावे. यामुळे अ‍ॅसिडिटी कमी होण्यास मदत मिळेल.

* मेथी दाण्याचे पाणी

मेथी दाण्यात औषधीयुक्त गुणधर्म असतात. यामुळे पोटाचे आजार दूर राहतात. यासाठी रात्री एका ग्लासमध्ये 1 चमचा मेथी दाणा टाकून ठेवावे. नंतर सकाळी याचे पाणी प्यावे. यामुळे अ‍ॅसिडिटीचा होणार त्रास कमी होतो.

* लिंबू आणि मध

उपवासच्या वेळी अ‍ॅसिडिटीची समस्या उद्भवल्यास गरम पाण्यात लिंबू आणि मध टाकून याचे सेवन करावे. यामुळे अ‍ॅसिडिटीचा त्रास कमी होण्यास मदत मिळते.

* दुधी भोपळा

दुधी भोपळ्याचा रस घेतल्याने अ‍ॅसिडिटीचा त्रास कमी होतो.

* कोरफडचा रस

कोरफड रसात असे गुणधर्म असतात की ज्यामुळे आपली पचनसंस्था निरोगी राहण्यास मदत मिळते. यामुळे सकाळी कोरफडचा रस पिणे आरोग्यासाठी लाभदायी ठरते.

* उपवासा दरम्यान घ्यावी ही काळजी

1) उपवास दरम्यान भरपूर पाणी प्यावे

2) अधिक फळांचे सेवन करावे

3) तेलकट पदार्थांचे सेवन टाळावे

4) लिंबू पाणी प्यावे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT