Ravindra Jadeja Dainik Gomantak
Image Story

IND vs ENG: अष्टपैलू जडेजाचा नागपूरमध्ये धमाका! 3 बळी घेत केली खास कामगिरी

Manish Jadhav
Ravindra Jadeja

भारत आणि इंग्लंड वनडे सामना

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला वनडे सामना नागपूरमध्ये खेळला जात आहे. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

Ravindra Jadeja

रविंद्र जडेजा

पहिल्यांदा फलंदाजी करताना इंग्लंडच्या संघाने 248 धावा केल्या. गोलंदाजीदरम्यान, रवींद्र जडेजाने पुन्हा एकदा आपला जलवा दाखवून दिला. 3 विकेट्स घेत त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक विशेष कामगिरी नोंदवली.

Ravindra Jadeja

600 आंतरराष्ट्रीय विकेट्स

सामन्यात जडेजाने 9 षटकांत 26 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. यादरम्यान त्याने जो रुट, जेकब बेथेल आणि आदिल रशीद यांना पॅव्हेलियनध्ये धाडलं. 3 विकेट्स घेत जडेजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 600 विकेट्स पूर्ण केल्या. जडेजा आता 600 किंवा त्याहून अधिक विकेट्स घेणारा सहावा भारतीय गोलंदाज बनला.

Ravindra Jadeja

जो रुटला 12व्यांदा आऊट केले

या सामन्यात इंग्लंडचा स्टार फलंदाज जो रुट देखील बऱ्याच कालावधीनंतर इंग्लंड संघात परतला, परंतु रुट या सामन्यात काही खास कामगिरी करु शकला नाही. या सामन्यात जो रुट 31 चेंडूत फक्त 19 धावा काढून आऊट झाला. जडेजाने वनडे क्रिकेटमध्ये 12 व्यांदा जो रुटला आऊट केले. याशिवाय जडेजाने वनडे क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथला 11 वेळा आऊट केले.

England

इंग्लंडचा संघ 248 धावांवर ऑल आऊट

या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंड संघाचा डाव 47.4 षटकांत 248 धावांवर गारद झाला. इंग्लंडकडून फलंदाजी करताना कर्णधार जोस बटलरने सर्वाधिक 52 धावा केल्या. याशिवाय, जेकब बेथेलने 51 धावा केल्या. टीम इंडियाकडून गोलंदाजी करताना हर्षित राणा आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी 3-3 विकेट घेतल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Monsoon Trip Goa: मान्सूनमध्ये गोव्यात कुठली 'ऑफबीट' ठिकाणं एक्सप्लोर कराल? वाचा खास टिप्स

Rashi Bhavishya 04 July 2025: प्रवासाचे योग, सामाजिक मान मिळेल; महत्वाची व्यक्ती भेटेल

Acid Attack Goa: 'त्याच्या' आईनेच आत्महत्येस प्रवृत्त केलं... अ‍ॅसिड हल्ल्याप्रकरणी मृत मुलीच्या आईचा खळबळजनक आरोप

E-Sakal: ई-सकाळची गरुडझेप! पुन्हा ठरले देशातील नंबर 1 मराठी न्यूज पोर्टल

Vijai Sardesai: 'आत्ताच्या हुकूमशाहीपेक्षा पोर्तुगीज परवडले'; विजय सरदेसाईंचा भाजप सरकारला टोला

SCROLL FOR NEXT