डॉ.पूर्णिमा उसगावकर Dainik Gomantak
Image Story

Goa: ना शेत, ना मैदान, गच्चीत फुलवले अद्भुत नंदनवन

फोंड्याच्या (Ponda) डॉ. पौर्णिमा उसगावकर यांनी चक्क आपल्या गच्चीलाच उद्यानाचा (Terrace Garden) स्वरूप दिले आहे.

दैनिक गोमन्तक

गच्ची म्हणजे फारफार पाय मोकळे करण्याचा पैस. पण फोंड्याच्या बालरोगतज्ज्ञ  डॉ.पूर्णिमा उसगावकर यांची गच्ची पाहाल तर तुमची गच्चीची व्याख्याच बदलेल. एखादे पिकांनी डोलणारे शेतही फिके पडेल , असा बहर इथं अनुभवाला येतो. इतकंच नाही तर तुम्ही उद्यानासारख्या शारीरिक कसरती करण्याची मौज इथं अनुभवू शकता. गेल्या चाळीस वर्षांपासून फुलवलेले हे अद्भुत उद्यान फुलझाडे, वेली, वनस्पती यांच्या असंख्य नामशेष प्रजातींनी बहरलेले आहे. आणि डॉ.पूर्णिमा उसगावकर यांच्यासाठी हे उद्यान आता मानसिक आरोग्याचा मंत्र ठरत आहे. (Dr. Purnima Usgavkar from Ponda created the terrace garden)

शहरांच्या भाऊगर्दीत इमारतीना जागा मिळत नाही तिथं आपल्यामध्ये रुतलेल्या आवडीनिवडीना कुठे मिळणार ? मात्र फोंड्याच्या डॉ. पौर्णिमा उसगावकर यांनी यात मार्ग काढत झाडाझुडपांची आवड आपल्या गच्चीवर जोपासली आहे. त्याने चक्क आपल्या गच्चीलाच उद्यानाचा स्वरूप दिले आहे. सध्या त्यांच्याकडे चारशेहून अधिक झाडे  आहेत. या झाडांचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे यात वेगवेगळ्या प्रकारची फुले, नानाविध फळ आणि भाजीपाल्यांचा समावेश आहे. त्यामुळे ही गच्ची कमी आणि उद्यान जास्त वाटते. कारण या उद्यानात व्यायाम करण्यासाठीची सोय आहे. आणि निवांत बसून छोटी पार्टीही करता येते. 

एरवी हॉस्पिटल म्हंटले की विविध अर्थाने आपल्या अंगावर काटा येतो. रुग्णालय मधला औषधांचा दर्प, रुग्णांच्या चेहऱ्यावरील मानसिक तणाव, नातेवाईकांच्या काळजीचे भाव. मात्र आपल्या अवतीभवती खरोखरच्या निसर्गाचा साथ लाभली तर यात अनेक गोष्टीवर मात करता येते. हे उसगावकर बाल रुग्णालयांना सिद्ध केले आहे. कारण या बाल रुग्णालयाची गच्ची तर उद्यान आहेच. शिवाय रुग्णालयांमधील अनेक गॅलरी वेगवेगळ्या वेली, पानाफुलांनी भरलेले आहेत.

गच्चीलाच उद्यानाचा स्वरूप

डॉ. उसगावकर मॅडम चाळीस वर्ष फोंड्यात लहान मुलांच्या आरोग्याची काळजी घेत आहेत. मुलांना बरे करण्याचे काम करतात. हे करताना आई-वडिलांकडून मिळालेली निसर्गाची आवड ही त्या अत्यंत तन्मयतेने जपतात. त्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारची वनस्पतींचे दालनच आहे.

गच्चीवरच्या उद्यानात आलेली फळ

त्यात काही दुर्मिळ तर काही प्रदेशनिष्ठ आहेत. सुगंधी मोगऱ्याच्या मोगरा , लांबदांडी,कुंदा, जाई, जुई,बटदांडी,सिंगल , डबल अशा आठ जाती त्याच्या या गच्चीवर आहेत. फुलांमध्ये म्हटला तर जास्वंदीच्या 20 हून अधिक प्रजाती त्यांच्याकडे आहेत. त्याशिवाय तगर देव चाफा गुलाब अडेनियम अशी कितीतरी फुले त्यांच्याकडे आहेत.

गच्चीवरच्या उद्यानात आलेली फळ

केळीच्या वेलची,वसई,मंगलोरी, रसबाळी,सालदाटी अशा जाती अनेक वर्षे केळी त्यांना देतात.आंब्याच्या हापूस, मानकूर, पायरी, रत्ना या जाती पाहिला मिळतात. याशिवाय आवळा, पेरू, लिंबू, अंजीर, कोकम, काजू, बोर, जाम, जांभूळ, चेरी, डाळिंब अशी फळ त्यांच्याकडे आहेत.  नेहमीच्या स्वयंपाक घरात लागणाऱ्या आले, पुदिना, कढीपत्ता, हळद, आंबेहळद, ऑल स्पाइस गंजन - गवतीचहा ,मिरी हे तर कायम त्यांच्याकडे उपलब्ध असतेच. याबाबत बोलताना डॉ. पूर्णिमा उसगावकर म्हणाल्या "आई-वडिलांकडून मिळालेली निसर्गाची आवड सोपाताना मनाला एक वेगळ्याच प्रकारचा आनंद मिळतो. आता तर मला ही झाडे वेली माझ्याशी बोलतात, मला समजून घेतात असंच वाटतंय. त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद होत नसला तर त्यांचं फुलणे, बहरने, मनाला आनंद देऊन जाते. या कामात डॉक्टरांचीही मदत होते. मुली आणि नातवंड हे या गच्चीवर रमून जातात."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rashi Bhavishya 06 July 2025: नवे काम सुरू कराल, प्रेमसंबंध मजबूत होतील; खर्च मात्र जपून करा

Shubman Gill Century: शुभमन गिलचा धमाका! ठोकलं बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय

Camel Tear: उंटाचे अश्रू सापाच्या विषावर गुणकारी, एक थेंब 26 सापांच्या विषावर ठरेल जालीम औषध; अभ्यासातून स्पष्ट

CO2 To Alcohol: विज्ञानाचा चमत्कार! कार्बनचे अल्कोहोलमध्ये रुपांतर करण्यात कोरियाच्या वैज्ञानिकांना यश

Anaya Bangar: 'पुरुषाच्या देहात एक कोमल स्त्री जगत होती'; अनाया बांगरने जागवल्या लिंगबदल काळातील नाजूक आठवणी

SCROLL FOR NEXT