इंस्टाग्रामने डायरेक्ट मेसेजिंगमध्ये (DM) मोठे बदल करत नवीन फीचर्स आणले आहेत. हे फीचर्स युजर्ससाठी संवाद अधिक सुलभ आणि मजेदार बनवण्यावर लक्ष केंद्रित करतात. पाहुयात, या नव्या फीचर्सबद्दल सविस्तर माहिती.
मेसेज शेड्यूलिंग फीचर इंस्टाग्रामवर अनेकांसाठी उपयुक्त ठरणार आहे. यामुळे युजर्स त्यांच्या DM पूर्वनियोजित वेळेसाठी सेट करून ठेवू शकतात, त्यामुळे योग्य वेळी संदेश पाठवण्याची चिंता राहणार नाही.
वेगवेगळ्या भाषांमध्ये चॅट करताना अडचण येऊ नये म्हणून इंस्टाग्रामने रिअल-टाइम मेसेज ट्रान्सलेशन फीचर आणले आहे. यामुळे वापरकर्ते त्यांना आलेले मेसेज आपल्या भाषेत सहज ट्रान्सलेट करू शकतात.
इंस्टाग्रामवर आता थेट चॅटमध्ये म्युझिक शेअर करता येईल. युजर्स त्यांच्या आवडत्या गाण्यांचा लहानसा क्लिप मित्रांसोबत शेअर करू शकतात.
महत्त्वाचे मेसेज किंवा चॅट टॉपवर पिन करता येणार आहेत. यामुळे आवश्यक मेसेज पटकन मिळवणे सोपे होईल.
ग्रुपमध्ये नवीन मेंबर्स जोडण्यासाठी QR कोड फीचर देण्यात आले आहे. यामुळे लिंक शेअर करण्याची गरज न राहता थेट QR स्कॅन करून ग्रुपमध्ये जॉइन होऊ शकता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.