Rahul Dravid File image
Image Story

Rahul Dravid Birthday: जेव्हा राहुल द्रविडला राग आला…

राहुल द्रविडला 2004 मध्ये ICC क्रिकेटर ऑफ द इयर आणि टेस्ट क्रिकेटर ऑफ द इयर म्हणूनही गौरविण्यात आले.

दैनिक गोमन्तक
Rahul Dravid

टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) आज 49 वर्षांचा झाला. माजी कर्णधार द्रविड त्याच्या अप्रतिम फलंदाजीच्या जोरावर 'द वॉल' आणि 'मिस्टर ट्रस्टवर्दी' म्हणून प्रसिद्ध होता. द्रविड मैदानावर क्वचितच रागावताना दिसला, पण एकदा तो पत्रकार परिषदेत भडकला होता. 2004 मध्ये भारतीय संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर होता. यादरम्यान मॅच फिक्सिंगच्या प्रश्नावर तो चांगलाच संतापला. 'या व्यक्तीला (रिपोर्टर) कोणीतरी बाहेर काढा. हा कचरा आहे आणि अशा गोष्टी खेळासाठी वाईट आहेत, असे म्हणत तेव्हा द्रविड संतापला होता.

Rahul Dravid

1973 साली इंदौरमध्ये जन्मलेल्या द्रविडला संघाचा पराभव अजिबात आवडायचा नाही. 2006 मध्ये इंग्लंडविरुद्ध मुंबई कसोटी हरल्यानंतर द्रविडने रागाच्या भरात ड्रेसिंग रूममध्ये खुर्ची फेकली होती. वास्तविक, त्या विजयासह इंग्लंडच्या संघाला तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधता आली.

Rahul Dravid

गांगुली-द्रविड यांनी एकत्र कसोटीत पदार्पण केले

राहुल द्रविड आणि दुसरा माजी कर्णधार सौरव गांगुली या दोघांनी 1996 मध्ये कसोटीत पदार्पण केले होते. गांगुलीने पहिल्या कसोटी डावात शतक झळकावले, तर द्रविडचे अवघ्या पाच धावांनी शतक हुकले. या दोन्ही खेळाडूंनी 1999 च्या विश्वचषकात टॉंटन मैदानावर श्रीलंकेविरुद्ध दुसऱ्या विकेटसाठी 318 धावांची भागीदारी केली होती. 2002 मध्ये, द्रविडने सलग चार कसोटीत शतके झळकावली होती.

Rahul Dravid

त्यानंतर 2003-04च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात द्रविडने चांगली कामगिरी केली. अॅडिलेडमधील दुसऱ्या कसोटीत त्याने 835 मिनिटे फलंदाजी करत पहिल्या डावात 233 आणि दुसऱ्या डावात नाबाद 72 धावा करत भारताला प्रसिद्ध विजय मिळवून दिला. त्यानंतर द्रविडने पाकिस्तान आणि वेस्ट इंडिजमध्ये अविस्मरणीय मालिका जिंकल्या. इतकेच नाही तर द्रविडने त्याच्या नेतृत्वाखाली 21 वर्षांनी भारताला इंग्लिश भूमीवर पहिली कसोटी मालिका मिळवून दिली होती.

Rahul Dravid

मार्च 2008 मध्ये, तो कसोटी क्रिकेटमध्ये दहा धावा करणारा तिसरा भारतीय ठरला. 2011 हे वर्ष द्रविडसाठी खूप चांगले होते आणि तो सर्वाधिक कसोटी धावा करणारा खेळाडू होता. यादरम्यान त्याने पाच शतके आणि चार अर्धशतकांच्या मदतीने 1145 धावा केल्या. 2011-12 च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर द्रविडने आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा निरोप घेतला.

Rahul Dravid

टीम इंडियाचे असे दोनच फलंदाज आहेत, ज्यांनी कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये 10,000 हून अधिक धावा केल्या आहेत. सचिन तेंडुलकर व्यतिरिक्त, द्रविडने कसोटीत 36 शतके आणि 63 अर्धशतकांसह 13,288 धावा केल्या आहेत. द्रविडने वनडेमध्ये 10,889 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये त्याच्या 12 शतकांचा समावेश आहे.

Rahul Dravid

फिल्डर म्हणून सर्वाधिक झेल घेण्याचा विश्वविक्रम द्रविडच्या नावावर आहे. त्याने 301 डावात 210 झेल घेतले. महेला जयवर्धने 205 झेलांसह दुसऱ्या स्थानावर आहे. तर जॅक कॅलिसने आपल्या कसोटी कारकिर्दीत 200 झेल घेतले आहेत.

Rahul Dravid

द्रविडच्या नेतृत्वाखाली भारताने दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर पहिला कसोटी विजय मिळवला होता. डिसेंबर 2006 दौऱ्यातील जोहान्सबर्ग कसोटीत भारताने विरोधी टिमचा123 धावांनी पराभव केला होता. याशिवाय द्रविडच्या नेतृत्वाखाली भारताला 21 वर्षांनंतर (2007 नंतर 1986 मध्ये) इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकता आली होती.

Rahul Dravid

Rahul Dravidद्रविडला 2004 मध्ये ICC क्रिकेटर ऑफ द इयर आणि टेस्ट क्रिकेटर ऑफ द इयर म्हणूनही गौरविण्यात आले. 2018 मध्ये, त्याला ICC हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट करण्यात आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa Live Updates: इंडिया आघाडीच्या नेत्याच्या प्रचारासाठी विजय सरदेसाई महाराष्ट्रात!

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

SCROLL FOR NEXT