अनेक वेळा छोटे गैरसमज निर्माण होऊन दोन कपलमधील मधील प्रमाचे संबंध तुटतात. जर तुमचा जोडीदार तुमच्यावर कोणत्या गोष्टीबद्दल रागावला असेल किंवा दुर्लक्ष करत असेल तर वेळेतच आपल्या नात्यामध्ये प्रेम आणि आदर वाढवने आवश्यक आहे. यासाठी फॉलो करा पुढील टिप्स Dainik Gomantak
* एकमेकांशी बोला:
अनेक समस्या या एकमेकांशी बोलुनच सुटतात. जर तुमचा जोडीदार काही गोष्टीमुळे नाराज असेल किंवा तुमच्याशी बोलत नसेल तर तुम्ही स्वत:हुन तुमच्या जोडीदाराशी बोला. प्रेमाने त्याची विचारपूस करावी. त्याच्यावर तुम्ही विश्वास दाखवा. अबोला दूर करण्यासाठी कॉल करा किंवा चॅटिंगचा पर्याय निवडू शकता. * सॉरी बोला:
जर तुमचे तुमच्या जोडीदारासोबत कोणत्या विषयाला घेवून भांडण झाले असेल तर शांत बसून एकदा विचार करा की तुम्ही तुमच्या जोडीदाराला काय बोलले आहात. ते समजल्यावर लगेच सॉरी बोला. * कारण शोधा:
तुमचा जोडीदार तुमच्याकडे दुर्लक्ष का करतो आहे यामागील कारण शोधण्याचा प्रयत्न करा . पण एक गोष्ट लक्षात ठेवा की तुमच्यामध्ये गैरसज निर्माण
होऊ देवू नका.
* समजूत काढणे:
जर तुम्हाला असे वाटत असेल की तुम्ही तुमच्या जोडीदाराला काही तरी चुकीचे बोलले आहात तर त्याची समजूत काढावी.