२०२३-२०२५ आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताचे सामने संपले आहेत. संघाचा युवा सलामीवीर यशस्वी जयस्वाल भारतासाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या टॉप ५ खेळाडूंमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे.
यशस्वी जयस्वाल हा २०२३-२५ च्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. त्याने १९ सामन्यांमध्ये ४ शतके आणि १० अर्धशतकांसह १७९८ धावा केल्या. या काळात त्याची सरासरी ५२.८८ होती तर त्याची सर्वोत्तम धावसंख्या नाबाद २१४ धावा होती.
या यादीत दुसऱ्या स्थानावर शुभमन गिल आहे. ज्याने १६ सामन्यांमध्ये ३ शतके आणि ३ अर्धशतकांसह ९७२ धावा केल्या आहेत. या काळात गिलची सर्वात मोठी खेळी नाबाद ११९ धावांची होती आणि त्याची सरासरी ३७.३८ होती.
भारताकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत कर्णधार रोहित शर्मा तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने १७ सामन्यांमध्ये ८६४ धावा केल्या आणि या दरम्यान त्याने ३ शतकेठोकली आहेत.
या यादीत चौथ्या स्थानावर विराट कोहली आहे. विराट कोहलीने १४ कसोटी सामन्यांमध्ये २ शतके आणि ३ अर्धशतकांसह ७५१ धावा केल्या आणि त्याचा सर्वोत्तम धावसंख्या १२१ धावा होती.
भारताकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रिषभ पंत पाचव्या स्थानावर आहे. पंतने १० कसोटी सामन्यांमध्ये ६७७ धावा केल्या आहेत. या काळात त्याने एक शतक आणि चार अर्धशतकं झळकावली. या काळात पंतचा सर्वोत्तम स्कोअर १०९ धावा होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.