Palmistry Money Line Dainik Gomantak
Image Story

Palmistry: ही 'रेषा' हातात असेल तर तुम्हाला होणार मोठा धनलाभ, अशी करा ओळख

असं म्हणतात की माणसाच्या हाताच्या रेषामध्ये अनेक रहस्य लपलेले असतात. हातावरील या रेषा व्यक्तीचे भविष्य सांगतात.

दैनिक गोमन्तक
Palmistry Money Line

Money Line: असं म्हणतात की माणसाच्या हाताच्या रेषामध्ये अनेक रहस्य लपलेले असतात. हातावरील या रेषा व्यक्तीचे भविष्य सांगतात. पण धन रेषा कोणती हे भविष्य जाणणाऱ्यांनाच कळू शकते. त्याचप्रमाणे आज आपण एखाद्या व्यक्तीच्या हातात दिसणार्‍या धन रेषेबद्दल जाणून घेणार आहोत. जिथे माणसाच्या हाताच्या रेषांवरून भविष्य कळू शकते. त्याचबरोबर त्याची आर्थिक स्थितीही सहज समजू शकते. (Money Line In Hand)

Palmistry Money Line

हातातील धन रेषेला खूप महत्त्वाचे स्थान आहे. आणि प्रत्येक व्यक्तीला हे जाणून घ्यायचे असते की भविष्यात त्याच्याकडे किती पैसे असतील.तर आपण सांगूया की धन रेषा व्यक्तीच्या सर्वात लहान बोटाखाली असते. तसे, ही रेषा प्रत्येक व्यक्तीच्या हातात नसते किंवा ती तूटक असते. हस्तरेषा शास्त्रानुसार, हातामध्ये दिसणारी स्वच्छ धन रेषा व्यक्ती भाग्यवान असल्याचे दर्शवते. असे लोक आयुष्यात खूप पैसा कमावतात.

Palmistry Money Line

हस्त रेषा शास्त्रानुसार, रिंग फिंगर आणि सर्वात लहान बोटाच्या खाली असलेल्या सरळ रेषाला धन रेषा म्हणतात. हातात धन रेषाविषयी जाणून घ्यायला अनेकांना आवडते.मात्र ही धनरेषा कोणत्या हातात आहे माहिती असणे तेवढेच गरजेचे आहे.खरं तर, अनेकांना असा विश्वास आहे की, पुरुषांचा उजवा हात, तर स्त्रियांच्या डाव्या हाताच् रेषांवरून भविष्य बघितले जाते. तर हस्तशास्त्रानुसार, हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की, ज्या हाताने व्यक्ती अधिक काम करतो त्याच हाताच्या धन रेषाद्वारे आर्थिक भविष्यवाणी केली जाते.

Palmistry Money Line

वडिलोपार्जित संपत्तीचा लाभ मिळेल

ज्योतिष शास्त्रानुसार, मंगळ रेषा हातात धन रेषा घेऊन शेवटच्या टोकापर्यंत पोहोचली तर ती खूप शुभ मानली जाते. जर एखाद्या व्यक्तीच्या हातावर अशी रेषा असेल तर त्याला आयुष्यात वडिलोपार्जित संपत्तीचा लाभ होतो. ज्या लोकांच्या हातात धन रेषा स्पष्ट दिसते त्यांच्याकडे भरपूर धन संपत्ती असते. हे लोक खूप श्रीमंत असतात. धन रेषेसोबत हातात सूर्य रेषा सरळ आणि स्पष्ट दिसत असेल तर धनासोबत मान-सन्मानही मिळतो.

Palmistry Money Line

त्रिकोणी चिन्ह असणे खूप शुभ असते

हस्तरेषा शास्त्रानुसार सूर्य पर्वतावर त्रिकोणाचे चिन्ह खूप शुभ मानले जाते. हा त्रिकोण धारण झाल्यास एखादी कला अवगत होऊन माणूस श्रीमंत होतो. कोणाच्या हातावर ही खूण असेल तर माणूस कितीही गरीब असला तरी त्याच्या मेहनतीने तो खूप प्रगती करतो.

Palmistry Money Line

वर्ग चिन्ह श्रीमंत बनवते

ज्योतिष शास्त्रानुसार गुरु ग्रहावर म्हणजेच बृहस्पति वर बनवलेले चौकोनाचे चिन्ह माणसाला खूप श्रीमंत बनवते. हे लोक कार्यक्षम प्रशासक आणि दूरदर्शी असतात. हे लोक गरीब घरात जन्मले असले तरी कठोर परिश्रमाने उच्च स्थान प्राप्त करतात. सर्व भौतिक सुखे प्राप्त होतात. त्यांना वैभवशाली जीवन जगायला आवडते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT