
दैनंदिन व्यवहारात अनेक गोष्टी आपल्याला सोडून जमिनीवर पडतात. यात काही विशेष नसले तरी ज्योतिष शास्त्रानुसार अशा काही विषेश गोष्टी आहेत, ज्या हातातून पडणे अशुभ मानले जाते. असे म्हणतात की त्या गोष्टी हातातून निसटणे म्हणजे एखादी वाईट घटना घडण्याचे संकेत असणे. अशा गोष्टी कोणत्या आहेत आणि त्या आपल्याला काय सूचित करतात हे जाणून घेऊया. (Astro Tips News)
देवाचा प्रसाद
तुमच्या हातातुन कधी प्रसाद खाली पडला आहे का? ज्योतिषशास्त्रानुसार प्रसाद खाली पडल्यास आपली कोणतीही इच्छा अपूर्ण राहु शकते. त्याचा दुसरा अर्थ असाही होतो की देव आपल्यावर कोपला आहे, ज्यामुळे आपल्या जीवनावर परिणाम होईल आणि घरात आणखी संकट येईल. हे टाळण्यासाठी खाली पडलेला प्रसाद उचलून लगेच कपाळाला लावावा. तसेच, एकतर ते वाहत्या पाण्यात टाका किंवा स्वच्छ भांड्यात टाका, जेणेकरून त्याचा अपमान होणार नाही.
देवाची मूर्ती
देवाची मूर्ती हातातून खाली पडणे अशुभ मानलं जातं. देवाची मूर्ती खाली पडल्यास कुटुंबात संकट येणार आहे. यामुळे कुटुंबातील तणावही वाढू शकतो आणि घरातील (Home) गरिबीही वाढु शकते. अशी आपत्ती टाळण्यासाठी तुटलेल्या मूर्तीचे वाहत्या पाण्यात विसर्जन करावे किंवा जमिनीत खणून ती आदराने पुरावी.
* सिंदूरची डब्बी खाली पडणे
सिंदूर हे कोणत्याही महिलेच्या पतीच्या दीर्घायुष्याचे प्रतीक मानलं जातं. अनेक वेळा मेकअप करताना सिंदूराचा डब्बा हातातून निसटून खाली पडतो. ज्योतिषशास्त्रानुसार या स्थितीचा अर्थ पतीच्या जीवनात काही संकटे येणे होय. असे कधी घडले तर विसरुनही खाली पडलेला सिंदूर झाडूने साफ करू नये. त्याऐवजी ते स्वच्छ कापडाने गोळा करून वाहत्या पाण्यात टाकावे.
पाण्याने भरलेले भांडे
पाण्याने भरलेले भांडे हातातून खाली पडणे अशुभ मानलं जातं. हिंदू धर्मग्रंथांनुसार, याचा अर्थ असा आहे की देवी-देवता आणि पूर्वज तुमच्यावर नाराज आहेत आणि स्वतःकडे लक्ष वेधण्यासाठी हे संकेत देत आहेत. जर तुम्ही या लक्षणांकडे लक्ष दिले नाही तर तुमच्या समस्या वाढू शकतात.
पूजेचा दिवा
देवपूजा केल्यानंतर दिवा लावणे ही सनातन धर्माची अनिवार्य परंपरा आहे. अनेक वेळा पूजेनंतर लावलेला दिवा आपल्या हातातून खाली पडतो. असे झाल्यास काहीतरी अघटित होण्याचे लक्षण आहे. असे मानले जाते की तुमचे किंवा तुमच्या कुटुंबाचे काहीतरी वाईट होणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.