मोरजी - चिकण मातीच्या (Clay soil) मुर्त्या सुबक बनवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. हल्ली गणेशभक्तांना मुर्त्या गुळगुळीत सुळसुळीत अपेक्षित असतात. त्यामुळे अनेक गणेशभक्त आकर्षित वाटणाऱ्या पीओपी मुर्त्याना पसंती देत असतात. शाडू मातीच्या (Shandu soil) नावाखाली 70 टक्के पीओपी वापरून शाडू मातीच्या मुर्त्या केल्या जातात आणि त्या मुर्त्या गुळगुळीत आणि सुळसुळीत असतात त्यामुळे त्या मुर्त्या आकर्षित वाटतात असे मत नानेरवाडा पेडणे येथील मूर्तिकार विष्णू च्यारी यांनी व्यक्त केले.
विष्णू च्यारी यांनी बोलताना मातीच्या मुर्त्या अगदी गुळगुळीत करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. जी माती गणेश मुर्त्या बनवण्यासाठी आणली जातात त्या मातीत अनेक बारीक बारीक दगड असल्याने त्या मातीपासून गुळगुळीत गणेश मुर्त्या करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते असे च्यारी म्हणाले.
आज काल अनेक चित्र शाळेत शाडू मातीच्या नावाने प्लास्टर ऑफ पेरीसच्या मुर्त्या विकल्या जातात त्याला जबाबदार ग्राहकाच असतात, त्याना आकर्षित आणि हलक्या मुर्त्या हव्या असतात. त्यानुसार मूर्तिकार प्लास्टर ऑफ परीसच्या सुबक आकर्षित मुर्त्या आपल्या चित्रशाळेत विक्रीसाठी स्वस्त दरात उपलब्ध करून देतो, जे कोणी गणेशमुर्त्या मातीच्या बनवत नाही, त्याच्या चित्रशाळेत शेकडो हलक्या मुर्त्या पहावयास मिळत असतात. मातीच्या मुर्त्या बनवण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागते, मात्र पीओपीच्या मुर्त्या अगदी स्वस्त मिळतात आणि मग ग्राहकाला विकताना त्याना 100 टक्के नफा होतो. या प्रकारामुळे जे प्रामाणिकपणे रात्रंदिवस मेहनत घेवून केवळ मातीच्याच मुर्त्या बनवतात त्यांच्यावर अन्याय होत असतो.
चतुर्थीचे वेद लागल्यानंतर विष्णू च्यारी चित्रशाळेत कलाकारांचे हात मातीत वेगवेगळ्या मुर्त्या करायला मग्न असतात , चिकण मातीला सुंदर आकार देवून सुबक मुर्त्या बनवण्यासाठी च्यारी यांचे अक्खे कुटुंब या गणपतीच्या मूर्ती करण्यास मग्न असतात ही मंडळी गणेश मुर्त्या बनवण्यास मग्न असतात . विष्णू म्हणतो जे समाधान कलेतून मिळते ते समाधान इतर क्षेत्रातून मिळणे कठीण आहे .कलेच्या नभात मुक्त पणे वावरणे आपल्या कर्म आहे असे ते सांगतात .
विष्णू च्यारी हे गेली 11 वर्षे सातत्याने गणेश मुर्त्या केवळ मातीपासून तयार करत असतात. वर्षाला 70 ते 90 मुर्त्या फक्त मातीचा वापर करून ग्राहकांच्या पसंती मागणीनुसार बनवून दिल्या जातात.
पीओपीच्या मुर्त्या पर्यावरणावर दिवसेंदिवस परिणाम करत असतानाही ग्राहक हलक्या व आकर्षित मुर्त्याना पसंती देत असतात.
विष्णू च्यारी म्हणतात कोणतीही कला आत्मसात करण्यासाठी अगोदर त्या कलेची आवड निर्माण करायला हवी, कोणतीही कला तुम्हाला उपाशी ठेवणार नाही. असे ते म्हणतात.
सरकार कलाकारांना प्रत्येक मूर्तीमागे 100 रुपये अनुदान देतात ते अनुदान खूप कमी असून त्यातून रंगही येत नसल्याची खंत व्यक्त करून सरकारने हे अनुदान वाढवून द्यावे अशी मागणी विष्णू चारी यांनी केली आहे.
गणपतीचा वेध लागल्यावर चिकण माती तयार करून एक एक मातीचा गोळा घेवून ग्राहकांच्या मागणीनुसार त्यांच्या पसंतीनुसार गणपती मुर्त्या बनवत असतात .
विष्णू म्हणतात , मातीला जसा आकार देता येतो त्यातून मूर्ती घडत असते , प्रामाणिक काम केल्यास यश हे आपल्या हातात आहे , या कलेत सुद्धा करियर घडू शकते . जो पूर्वजांनी वारसा आपल्याकडे दिला तो आम्ही पुढच्या पिढीकडे द्यायला हवा आणि ते देण्याचे काम आम्हा कलाकारांचे आहे .
नोकरीच्या मागे न लागता व्यवसा किंवा एकाधि कला आत्मसात केली तर ती आपल्याला कधीही दूर करू शकत नाही असे च्यारी म्हणतो .
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.