गोव्यामध्ये गणपती च्या माथ्यावर माटोळी बांधण्याची परंपरा आहे. इथे प्रत्येक गणपतीवर माटोळी बांधतात ,
गोव्यात माटोळी स्पर्धा आयोजित केली जाते त्यानिमित्ताने काही कुटुंब या स्पर्धेत भाग घेतात. Dainik Gomantak
सुमारे 300 विविध प्रकारची नग बांधली जातात. हे विविध नग जमवताना त्यांचा या फळांच्या जैवविविधतेवर अभ्यास होत आहे, अशा विविध प्रकारची माटोळी बांधत असल्याने गोव्यातील पर्यावरण क्षेत्रात व वनस्पती शास्त्रत काम करण्याऱ्यासाठी पर्वणी आहे. त्यामुळे यांच्या घरी अशा मंडळी ची रेलचेल असते. परिसरातील गावातील लोक ही यांच्या घरी आवर्जून भेट देतातया माटोळीतून या भागातील जैवविविधतेचे दर्शन होते. तसेच इथल्या स्पर्धकाकडून सुमारे 300 विविध प्रकारची नग बांधली जातात
आपली माटोळी अधिक सुशोभित होण्यासाठी विविध प्रकारची जंगली फळे बांधणे सुरू झाले आणि जंगली फळांसाठी रानावनात जाऊन नवनवीन फळे शोधणे आणि ती माटोळीला बांधू लागले.आता गेल्या काही वर्षांपासून माटोळी स्पर्धा सुरू झाल्यावर माटोळीचा जास्तीत जास्त प्रकारची फळे फुले बांधायला सुरुवात झाली. माटोळी च्या निमित्ताने ही मंडळी आपल्या परिसरातील रानावनात हिंडतात आणि माटोळी साहित्य जमवाजमव करतात. यानिमित्ताने त्यांच्याकडून जंगली वनस्पतीचे ज्ञान संकलन होते.
माटोळी ही लाकडी चौकनी आराखडा गणपतीच्या (पूजेला लावतात त्या ठिकाणी) माथ्यावर लावलेली असते. त्या माटोळीला नारळ, आंब्याचे टाळ, सुपारीची पेंड, बागायतीतील फळे ज्यात तोरिंगण, म्हावळींग, निरफणस, केळीचा घड, आदी तसेच फळ भाज्या ज्यात काकडी, चिबुड, दोडगी, वांगी, भेंडी, भोपळा, करमल, चिकू,.... या सर्व फळाबरोबर पावसाळ्यात आढळणारी रान फळे ज्यात कांगोणी, माट्टी फळे, कवंडळ, घागऱ्या, कुड्याच्या शेंगा, नागुलकुडा, आदी व रान फुले ज्यात हरणे, शेरवड यांचा समावेश आहे.. परंपरागत अशी माटोळी ला फळे-फुले बांधण्याची प्रथा आहे...