KL Rahul Dainik Gomantak
Image Story

आलिशान घर ते कोटींच्या कार, KL Rahul कडे आहेत या महागड्या गोष्टी

भारताचा क्रिकेटपटू केएल राहुलकडे अनेक महागड्या गोष्टींचे कलेक्शन आहे.

Pranali Kodre

KL Rahul expensive things: भारताचा स्टार फलंदाज केएल राहुल लोकप्रिय खेळाडूंपैकी एक आहे. त्याचा आज (18 एप्रिल) 31 वा वाढदिवस आहे. त्याचा जन्म 18 एप्रिल 1992 रोजी बंगळुरूला झाला होता. त्याने त्याच्या कारकिर्दीत 200 पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय सामने खेळताना 14 शतकांसह 6 हजारांहून अधिक धावा केल्या आहेत.

दरम्यान, राहुल स्टायलिश खेळाडूंपैकी एक देखील समजला जातो. त्याच्याकडे अनेक महागड्या वस्तूही आहेत. त्यावरच एक नजर टाकू.

KL Rahul

केएल राहुलचे नेटवर्थ 90 कोटींहून अधिक असल्याचे अनेक रिपोर्ट सांगतात.

KL Rahul

अनेक रिपोर्ट्सनुसार केएल राहुलचा मुंबईला एक आलिशान 4 बीएचके बंगला आहे. त्या बंगल्यातून समुद्राचेही दर्शन होते. इतकेच नाही, तर त्याचे 64 लाखांचे बंगळुरूमध्येही मोठे घर आहे.

KL Rahul

त्याच्या घरांमध्ये सुंदर इंटेरियर केलेले असून अनेक सुखसुविधा या घरांमध्ये आहेत.

KL Rahul

केएल राहुलला कारचेही वेड असून त्याने जवळपास साडेतीन कोटींहून अधिकच्या किमतीची लँबोर्गिनी हुराकेन स्पायडर (Lamborghini Huracán Spyder) ही महागडी गाडी आहे. याशिवाय त्याच्याकडे एस्टोन मार्टिन डीबी11 (Aston Martin DB11), ऑडी आर८ (Audi R8) आणि रेंज रोव्हर वेलार (Range Rover Velar) या महागड्या गाड्याही आहेत.

KL Rahul

केएल राहुलकडे गाड्यांबरोबरच महागडी घड्याळं देखील आहेत. एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार त्याच्याकडे रोलेक्स डे-डेट, पाटेक फिलिप नॉटिलस, रोलेक्स कॉस्मोग्राफ डेटोना अशी जवळपास 25 लाखांहून अधिक किमतीची घड्याळे त्याच्याकडे आहेत.

KL Rahul

केएल राहुलला वेगवेगळे शुज वापरायलाही आवडतात. त्याच्याकडे वेगवेगळ्या ब्रँडचे अनेक महागडे शुज आहेत.

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

SCROLL FOR NEXT