अनेकदा बॉलीवूड अभिनेत्रींना पाहून मनात हा प्रश्न पडतो की त्यांची त्वचा मेकअपशिवाय ही इतकी तरूण, चकाकणारी, नेहमीच चमकणारी कशी दिसते? शेवटी, ती काय करते? की तिच्या चेहऱ्यावर ही चमक दिसते? या सर्व अभिनेत्री नेहमीच त्यांच्या चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त असतात, ज्यासाठी त्यांना सतत मेकअपमध्ये राहावे लागते.
जेव्हा त्या शूटिंग करत नसतात तेव्हा काही घरगुती उपाय आवश्यक असतात. त्वचा निरोगी ठेवण्यासाठी, विशेष काळजी घेतात. दररोज त्या सौंदर्य नियमांसाठी थोडा वेळ काढतात. जर तुम्हाला तुमची त्वचा निरोगी ठेवण्यासाठी विशेष सौंदर्य पथ्ये पाळायची असतील, तर या बॉलीवूड सेलिब्रिटी ब्युटी टिप्स आणि सिक्रेट्स तुम्हाला उपयोगी पडू शकतात.
(Bollywood actress katrina kaif anushka sharma alia bhatt kareena kapoor beauty secrets is homemade )
अभिनेत्री अनुष्का शर्माची त्वचा अशाप्रकारे खूपच ग्लो करते
अभिनेत्री अनुष्का शर्माची त्वचेसाठी विशेष सौंदर्य नियम पाळते. यामध्ये त्वचा स्वच्छ करते, सनस्क्रीन लोशन लावते. इतकंच नाही तर ती कडुलिंबाचा फेस पॅक देखील लावते, ज्यामुळे त्वचेची धूळ आणि धुलिकण, जंतूंमुळे होणारे नुकसान, मुरुम इत्यादीपासून सुटका होऊ शकते.
आलिया भट्ट चेहऱ्यावर लावते ही माती
आलियाची त्वचा अतिशय मऊ, नाजूक आणि गुळगुळीत दिसते. तथापि, तिचे सौंदर्य नियम अतिशय सोपे आहेत. तिला मुलतानी मातीचे फेस पॅक लावायला आवडते. आपण हा पर्याय अवलंबल्यास आपल्या त्वचेला आणखी उजळ करु शकता.
थकव्यातही कतरिना कैफ मेकअप काढायला विसरत नाही
तुम्हाला माहित आहे का? की कतरिना कैफ कितीही थकली असली तरी ती आपल्या त्वचेवरून मेकअप काढायला विसरत नाही. रात्री झोपण्यापूर्वी चेहरा साफ करण्यासोबतच ती मेकअपही काढते. कॅट तिची त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी दररोज 6-8 ग्लास पाणी पिते.
करीना कपूरच्या उजळ त्वचेचे घरगुती फेस मास्क रहस्य
करीना कपूर देखील तिच्या त्वचेची विशेष काळजी घेते. करीनाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर काही ब्युटी टिप्स देखील शेअर केल्या आहेत. होममेड ब्युटी फेस मास्क हे बेबोच्या उजळ त्वचेचे रहस्य आहे.
करीनाचा हा सिक्रेट फेस मास्क तुम्हालाही तुमच्या चेहऱ्यावर वापरून पहावा लागेल, त्यामुळे तुम्हाला चंदन, व्हिटॅमिन ई, हळद पावडर, दूध आवश्यक आहे. हे सर्व मिक्स करा आणि चेहऱ्यावर 15- 20 मिनिटे सुकवा. यानंतर पाण्याने चेहरा धुवा, आपला चेहरा अधिक चमकत असल्याचं आपल्याचं लक्षात येईल.
धकधक गर्ल माधुरीच्या उजळ स्किनचे रहस्य
वयाच्या 54 व्या वर्षीही धक-धक गर्ल म्हणजेच माधुरी दीक्षितची स्किन किशोरवयीन मुलीप्रमाणे सुंदर दिसते. माधुरीच्या ब्युटी स्किन केअर रूटीनमध्ये 4 मुख्य गोष्टींचा समावेश आहे. क्लिंझर, अल्कोहोल-मुक्त टोनर, मॉइश्चरायझर आणि एसपीएफ.
माधुरी सकाळी या चारही त्वचेला लावायला विसरत नाही. तसेच, ती रात्री झोपायला जाते तेव्हा ती नक्कीच 5 स्टेप्स फॉलो करते. मेकअप काढणे, साफ करणे, टोनिंग करणे, व्हिटॅमिन सी सीरम आणि मॉइश्चरायझर लावणे.
बॉलिवूड स्टार अलिया एफ ग्लो आणण्यासाठी करते खास उपाय
बॉलिवूड चित्रपटांतून आपल्या करिअरला सुरुवात करणारी आलिया एफ कमी कालावधीत आपल्या चाहत्यांना प्रभावित करु शकली. ही अभिनेत्री पूजा बेदीची मुलगी आहे. आलिया तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर अनेक ब्युटी व्हिडिओ देखील शेअर करते.
काही दिवसांपूर्वी त्यांनी होममेड कॉफी फेस मास्क अथवा स्क्रबची रेसिपी शेअर केली होती. आलिया अनेकदा तिच्या चेहऱ्यावर चमक आणण्यासाठी कॉफी वापरते. कॉफी फेस मास्क चेहऱ्याचा फुगीरपणा कमी करतो, त्वचा एक्सफोलिएट करतो, तसेच त्वचेला मऊ आणि चमक आणतो. तुम्ही याचा वापर बॉडी स्क्रब म्हणूनही करू शकता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.