Vaidhriti Yog Dainik Gomantak
Horoscope

Vaidhriti Yog 4 June 2026: व्यापाऱ्यांना मोठी डील अन् नोकरदारांना प्रमोशन! अवकाशात घडणार 'वैधृती योग'; 5 राशींवर होणार पैशांचा पाऊस

Lucky Zodiac Signs Vaidhriti Yog: गुरुवारी (4 जून) संध्याकाळी 6 वाजून 9 मिनिटांनी सूर्य आणि चंद्र एकत्र येत 'वैधृती योग' निर्माण करत आहेत. हा योग साधारणपणे 7 तासांपर्यंत प्रभावी राहणार आहे.

Manish Jadhav

Lucky Zodiac Signs Vaidhriti Yog: ज्योतिष शास्त्रानुसार, सूर्य आणि चंद्र यांच्या विशेष स्थितीमुळे अंतराळात अनेक शुभ-अशुभ योग निर्माण होत असतात. याच पार्श्वभूमीवर, गुरुवारी (4 जून) संध्याकाळी 6 वाजून 9 मिनिटांनी सूर्य आणि चंद्र एकत्र येत 'वैधृती योग' निर्माण करत आहेत. हा योग साधारणपणे 7 तासांपर्यंत प्रभावी राहणार आहे. ज्योतिषीय गणनेनुसार, या वैधृती योगाचा प्रभाव सर्व राशींवर पडणार असला, तरी 5 भाग्यशाली राशींसाठी हा काळ अत्यंत शुभ आणि आर्थिक प्रगती घेऊन येणारा ठरणार आहे. मेष, वृषभ, सिंह, धनु आणि मीन या राशींच्या लोकांच्या जीवनात या योगामुळे सकारात्मक बदल घडून येतील, तसेच त्यांच्या मान-सन्मानात मोठी वाढ होईल.

मेष राशीच्या लोकांसाठी हा वैधृती योग जीवनात आशेचा एक नवीन किरण घेऊन येणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेली तुमची कामे या काळात यशस्वीरीत्या पूर्ण होतील. नोकरी आणि व्यवसायाच्या ठिकाणी तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. अचानक होणाऱ्या धनलाभामुळे पैशांशी संबंधित सर्व समस्या दूर होण्यास मदत होईल. दुसरीकडे, वृषभ राशीच्या जातकांसाठी हा योग सुख-समृद्धी वाढवणारा ठरेल. तुमचे कौटुंबिक जीवन आनंदी राहील आणि कुटुंबात जुन्या गोष्टींवरुन सुरु असलेले वाद संपुष्टात येतील, ज्यामुळे तुम्हाला मानसिक शांतता लाभेल. एखादे नवीन काम किंवा व्यवसाय सुरु करण्यासाठी हा काळ अतिशय उत्तम आहे.

सिंह राशीच्या लोकांसाठी हा काळ एखादी मोठी गोड बातमी घेऊन येणारा ठरेल. यामुळे घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नवीन सुवर्णसंधी मिळू शकते, तर व्यापाऱ्यांना एखादी मोठी आणि फायदेशीर डील फायनल करता येईल, ज्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल. धनु राशीच्या लोकांच्या आयुष्यात बऱ्याच काळापासून सुरु असलेल्या अडचणी आणि संकटे आता संपुष्टात येतील. आरोग्यामध्ये (Health) लक्षणीय सुधारणा पाहायला मिळेल आणि आर्थिक लाभ झाल्यामुळे बँक बॅलन्स वाढेल.

शेवटची भाग्यशाली राशी म्हणजे मीन. मीन राशीच्या लोकांना त्यांच्या कार्यक्षेत्रात किंवा नोकरीच्या ठिकाणी मोठे यश आणि उच्च पद मिळण्याची शक्यता आहे. समाजात आणि ऑफिसमध्ये तुमचा मान-सन्मान वाढेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील आणि आर्थिक दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी सर्वार्थाने फायदेशीर ठरेल. एकंदरीत, 4 जून रोजी होणारा हा 7 तासांचा वैधृती योग या पाच राशींच्या लोकांसाठी प्रगतीचे नवे दरवाजे उघडणारा ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope 22 July 2026: कुणाला धनलाभ, तर कुणाला मानसिक ताण! आजचा दिवस ठरणार टर्निंग पॉईंट; 'या' राशींचे चमकणार तारे

Double Murder Case: रक्ताचे नाते ठरले वैरी! दोन पोटच्या मुलांनीच केली आई-वडिलांची निर्घृण हत्या; कौटुंबिक वादातून उचललं टोकाचं पाऊल

Operation Sindoor: पाक लष्कराचे पितळ उघडे! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानचाच पराभव; इम्रान खान यांच्या बहिणीच्या दाव्यानं खळबळ

Pakistan Heavy Rain: पाकिस्तानात पावसाचा हाहाकार! खैबर पख्तूनख्वामध्ये पूर अन् भिंती कोसळून 12 जणांचा मृत्यू; 5 बालकांचा समावेश

India vs Zimbabwe T20: श्रेयस अय्यरची 'अग्निपरीक्षा'! झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया सज्ज, वैभव सूर्यवंशीवर सर्वांच्या नजरा; पाहा संपूर्ण संघ अन् वेळ

SCROLL FOR NEXT