Yuti Yog 2026 Dainik Gomantak
Horoscope

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

Yuti Yog 2026 Effect: ज्योतिषीय आकलनानुसार, एकाच महिन्यात तीन वेळा युती योग बनणे काही राशींसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे.

Manish Jadhav

Yuti Yog 2026 Effect: ज्योतिष शास्त्रामध्ये ग्रहांच्या युती योगाला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. हा योग कुंडलीत आणि गोचरमध्ये जसा शुभ फलदायी ठरतो, तसाच अनेकदा तो अत्यंत अशुभ आणि क्लेशदायकही ठरु शकतो. 'द्रिक पंचांग'च्या खगोलीय गणनेनुसार, जुलै महिन्यात तीन वेळा अशा युती योगांची निर्मिती होणार आहे. यातील पहिला युती योग 4 जुलै 2026 रोजी सकाळी 11 वाजून 34 मिनिटांनी बनेल, त्यानंतर दुसरा योग 13 जुलै रोजी सकाळी 6 वाजून 53 मिनिटांनी आणि तिसरा त्याच दिवशी म्हणजेच 13 जुलैच्या संध्याकाळी 5 वाजून 45 मिनिटांनी निर्माण होणार आहे.

ज्योतिषीय आकलनानुसार, एकाच महिन्यात तीन वेळा युती योग बनणे काही राशींसाठी धोक्याची घंटा मानली जात असून, प्रामुख्याने 5 राशींच्या जातकांसाठी हा काळ अत्यंत आव्हानात्मक आणि अशुभ राहण्याचे संकेत आहेत.

या अशुभ योगाच्या प्रभावामुळे मेष राशीच्या लोकांची कार्यक्षेत्रात प्रचंड धावपळ होईल, ज्यामुळे शारीरिक आणि मानसिक थकवा जाणवेल. घरगुती कामांमुळे प्रवासाचे योग येतील, मात्र विनाकारण किंवा कोणाच्या सांगण्यावरून केलेली गुंतवणूक मोठ्या आर्थिक नुकसानीस कारणीभूत ठरु शकते. मिथुन राशीच्या जातकांना जुलै महिन्यात गुंतवणुकीतून (Investment) नफा मिळण्याऐवजी धनहानी होण्याची दाट शक्यता आहे. या काळात कुटुंबासोबत केलेले प्रवास क्लेशदायक ठरतील आणि नातेवाईकांशी किरकोळ कारणावरुन वाद होऊ शकतात.

कन्या राशीच्या लोकांचे खर्च अपेक्षेपेक्षा जास्त वाढल्यामुळे त्यांचे आर्थिक बजेट कोलमडेल आणि मानसिक ताण वाढेल. या काळात इतरांकडून जास्त अपेक्षा ठेवणे टाळावे, अन्यथा पदरी निराशा येऊ शकते. तूळ राशीच्या जातकांनी आपल्या रागावर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे आहे, अन्यथा ते स्वतःच एखाद्या मोठ्या संकटात अडकतील. प्रवासादरम्यान अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो आणि आरोग्याच्या दृष्टीने गळ्याचे विकार उद्भवण्याची शक्यता आहे.

शेवटची म्हणजेच मकर राशीच्या लोकांसाठी व्यवसायात केलेले नवीन करार आर्थिकदृष्ट्या तोट्याचे ठरु शकतात, ज्यामुळे आर्थिक बाजू कमकुवत होईल. बाजारात अडकलेले पैसे वेळेवर न मिळाल्याने अडचण वाढेल आणि संकटसमयी जवळचे नातेवाईकही पाठ फिरवण्याची शक्यता आहे. त्यामुळे या पाचही राशींनी जुलै महिन्यात सावध राहणे हितकर ठरेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Indian Cricketers Ban: भारतीय क्रिकेटमध्ये आतापर्यंतचा सर्वात मोठा फ्रॉड! अंडर-19 वर्ल्ड कप स्टार अडकला जाळ्यात; 65 खेळाडूंवर बंदी

Goa Accident: गोव्यात अपघातांची धडकी भरवणारी आकडेवारी! 19 महिन्यांत 1107 जणांचा मृत्यू; दिवसाला दोन जीवांचा बळी

Shukra Gochar 2026: वैभव अन् संपत्तीचा कारक बदलणार चाल! शुक्राचे नक्षत्र गोचर 5 राशींसाठी ठरणार वरदान; धनाचा होणार वर्षाव

Madgaon Urban Bank: मडगाव अर्बनच्या ठेवीदारांना पुन्हा धक्का; पैसे मिळण्याची निश्चित तारीखच नाही! 4.20 कोटींच्या वसुलीसाठी 154 खटले

Goa POCSO Case: 10 वर्षांची सक्तमजुरी, दंड अन् आता सर्वोच्च न्यायालयात आव्हान, लैंगिक अत्याचार प्रकरणी पीडितेसह सरकारला नोटीस

SCROLL FOR NEXT