Trigrahi Yog Dainik Gomantak
Horoscope

Trigrahi Yog 2026: 22 ऑगस्टला बनतोय सर्वात शक्तिशाली 'त्रिग्रही योग'! 4 राशींच्या पदरात पडणार श्रीमंती अन् यश; भाग्योदयाचे दिवस सुरु होणार

Trigrahi Yoga August 2026: वैदिक ज्योतिशास्त्रानुसार ऑगस्ट महिन्यात सिंह राशीत एक अत्यंत दुर्मिळ आणि शक्तिशाली ग्रहयोग जुळून येत आहे.

Manish Jadhav

Trigrahi Yoga August 2026: वैदिक ज्योतिशास्त्रानुसार ऑगस्ट महिन्यात सिंह राशीत एक अत्यंत दुर्मिळ आणि शक्तिशाली ग्रहयोग जुळून येत आहे. सिंह राशीत आधीपासूनच विराजमान असलेल्या केतू ग्रहापाठोपाठ 17 ऑगस्ट रोजी ग्रहांचा राजा सूर्य प्रवेश करेल. त्यानंतर लगेचच 22 ऑगस्ट रोजी बुद्धिमत्ता आणि व्यापाराचा कारक मानला जाणारा बुध ग्रहदेखील सिंह राशीत प्रवेश करणार आहे. एकाच राशीत या तीन महत्त्वाच्या ग्रहांचा मिलाफ झाल्यामुळे एका महाप्रभावशाली 'त्रिग्रही योग' निर्माण होणार आहे.

याशिवाय, सूर्य आणि बुध यांच्या एकत्र येण्याने अत्यंत शुभ मानला जाणारा 'बुधादित्य राजयोग' देखील सक्रिय होईल. या ग्रहांच्या दुर्मिळ महासंयोगाचा प्रभाव सर्व राशींवर पडणार असला, तरी मेष, सिंह, तुळ आणि वृश्चिक या चार राशींच्या जातकांसाठी हा काळ अत्यंत लाभदायक आणि भाग्योदयाचा ठरणार आहे.

मेष राशीच्या जातकांसाठी सिंह राशीतील हा त्रिग्रही योग सुवर्णकाळ घेऊन येईल. या काळात मेष राशीच्या लोकांना करिअर आणि व्यवसायात तगडा फायदा होईल. जे तरुण किंवा नागरिक नवीन नोकरीच्या शोधात आहेत, त्यांना यश मिळून उत्तम संधी उपलब्ध होतील. तसेच, उत्पन्नाचे नवीन मार्ग खुले झाल्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल. सिंह राशीच्या स्वतःच्या राशीत हा योग बनत असल्याने त्यांच्या नेतृत्व क्षमतेत कमालीची वाढ होईल. नोकरीपेशा वर्गाला मोठ्या आणि नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता असून, करिअरमध्ये पुढे जाण्याच्या सुवर्णसंधी प्राप्त होतील.

तुळ राशीच्या लोकांसाठी हा काळ प्रगतीचे नवे दरवाजे उघडणारा ठरेल. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती किंवा नवीन चांगल्या संधी मिळतील. व्यापाऱ्यांसाठी हा काळ विशेष लाभदायक असणार असून, दीर्घकाळापासून अडकलेले किंवा रखडलेले पैसे अचानक परत मिळतील. शेवटी, वृश्चिक राशीच्या जातकांसाठी ग्रहांचा हा संयोग अत्यंत शुभ ठरेल. नोकरीत पदोन्नती (Promotion) आणि वेतनवाढ मिळण्याची दाट शक्यता आहे. या काळात केलेल्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळून समाजात मान-सन्मान वाढेल. एकूणच, या चारही राशींच्या आयुष्यात ग्रहांचा हा महासंयोग समृद्धी आणि आनंदाची नवी पहाट घेऊन येईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Waste Management: कचरा व्यवस्थापनाचे नियम पाळा, अन्यथा कारवाईची शक्यता; 385 घटकांवर प्रशासनाची नजर

Morjim School Repair News: महिना उलटूनही शाळेची दुरुस्ती रखडली; अंगणवाडी स्टेजवर, बालहक्क आयोगाची नाराजी

Morjim Beach Safety: मोरजी बीचवर गुरांचे कळप, भटक्या श्वानांचा उपद्रव; पर्यटन हंगामात पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न!

Ranji Trophy: गोव्याची फलंदाजी ठरतेय डोकेदुखी; विदर्भाविरुद्ध पराभवांची मालिका खंडित करण्याचे आव्हान

Rohit Sharma Dance Video: 'ले गई, ले गई' गाण्यावर रोहित शर्मानं धरला ठेका! करिश्मा कपूरसोबतचा डान्स व्हिडीओ व्हायरल; हिटमॅन म्हणाला, 'मजा आ गया'

SCROLL FOR NEXT