Vipreet Rajyoga 2026 Dainik Gomantak
Horoscope

Vipreet Rajyoga 2026: "आता गरिबी हटणार अन् लक्झरी लाईफ मिळणार!" शुक्राचा 14 मे पर्यंत मोठा धमाका; विपरीत राजयोगाने उजळणार 'या' 4 राशींचे नशीब

Vipreet Rajyoga Benefits for Zodiac Signs: ज्योतिषशास्त्रामध्ये शुक्र ग्रहाला धन, वैभव, ऐश्वर्य, प्रेम आणि भौतिक सुखांचा कारक मानले जाते.

Manish Jadhav

Vipreet Rajyoga Benefits for Zodiac Signs: ज्योतिषशास्त्रामध्ये शुक्र ग्रहाला धन, वैभव, ऐश्वर्य, प्रेम आणि भौतिक सुखांचा कारक मानले जाते. जेव्हा शुक्र ग्रह स्वतःच्या राशीत किंवा शुभ स्थितीमध्ये गोचर करतो, तेव्हा अनेक राशींच्या भाग्याचे दरवाजे उघडतात. 19 एप्रिल 2026 रोजी दुपारी 3 वाजून 51 मिनिटांनी शुक्र ग्रहाने वृषभ राशीत प्रवेश केला असून या गोचरमुळे 'विपरीत राजयोग' निर्माण झाला. हा अत्यंत शक्तिशाली राजयोग 14 मे 2026 रोजी सकाळी 10 वाजून 58 मिनिटांपर्यंत कार्यरत राहणार आहे. या काळात मिथुन, तूळ, धनु आणि मीन या चार राशींवर शुक्राची विशेष कृपा बरसणार असून, त्यांच्या आयुष्यात सुवर्णकाळ सुरु होणार आहे.

मिथुन राशीच्या जातकांसाठी हा काळ चुका सुधारण्याची मोठी संधी घेऊन आला आहे. जर तुमच्याकडून भूतकाळात काही मोठ्या चुका झाल्या असतील, तर त्या दुरुस्त करण्यासाठी ग्रहमान तुम्हाला साथ देईल. या काळात तुम्ही तुमच्या वडिलांशी मोकळेपणाने संवाद साधाल, ज्यामुळे कौटुंबिक नाते अधिक दृढ होईल. विशेष म्हणजे, तुमच्या उत्पन्नात (Income) वाढ होण्याचे प्रबळ संकेत आहेत, ज्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल.

तूळ राशीच्या लोकांसाठी हा विपरीत राजयोग आरोग्याच्या दृष्टीने वरदान ठरणार आहे. जर तुम्हाला तुमच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या आरोग्याविषयी चिंता सतावत असेल, तर आता तुम्ही चिंतामुक्त होऊ शकता, कारण त्यांच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा होईल. नोकरी करणाऱ्या जातकांचे कार्यालयात मन रमेल आणि त्यांना कामाच्या ठिकाणी काहीतरी नवीन आणि सृजनात्मक शिकण्याची संधी मिळेल, ज्यामुळे भविष्यातील प्रगतीचे मार्ग मोकळे होतील.

धनु राशीच्या जातकांना या काळात कार्यालयात नवीन आणि मोठ्या जबाबदाऱ्या मिळू शकतात. या जबाबदाऱ्या तुम्ही अत्यंत निष्ठेने आणि कार्यक्षमतेने पार पाडाल, ज्यामुळे तुमच्या प्रतिष्ठेत वाढ होईल. आर्थिक चणचण आणि आरोग्याच्या तक्रारी आता दूर होणार असून, तुम्हाला मानसिक शांतता लाभेल.

मीन राशीच्या लोकांसाठी हा काळ आयुष्यात काहीतरी मोठे साध्य करण्याचा आहे. नोकरी-व्यवसायात तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या चोख बजावाल, ज्याचा सकारात्मक परिणाम तुमच्या करिअरवर होईल. प्रेमसंबंधांच्या बाबतीत हा काळ अत्यंत मधुर असेल; जोडीदारासोबतचे संबंध सुधारतील आणि तुम्ही सुखी वैवाहिक जीवनाचा आनंद घ्याल. एकंदरीत, 14 मे पर्यंतचा हा काळ या चार राशींच्या आयुष्यात चैनीच्या वस्तू, सुखसोयी आणि आनंदाची उधळण करणारा ठरेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT