Kendra Trikon Rajyog Dainik Gomantak
Horoscope

Kendra Trikon Rajyog 2026: ''प्रमोशन, प्रॉपर्टी अन् पैशाचा होणार पाऊस'', केंद्र त्रिकोण राजयोग 'या' 3 राशींचं रातोरात पालटणार नशीब

Kendra Trikon Rajyog: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार आज, 2 मार्च 2026 रोजी ग्रहांच्या स्थितीत अत्यंत शुभ आणि दुर्मिळ असा बदल झाला.

Manish Jadhav

Kendra Trikon Rajyog 2026: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार आज, 2 मार्च 2026 रोजी ग्रहांच्या स्थितीत अत्यंत शुभ आणि दुर्मिळ असा बदल झाला. ऐश्वर्य, सौंदर्य आणि भौतिक सुखाचा कारक मानला जाणारा शुक्र ग्रह आज मीन राशीत प्रवेश कर्ता झाला. विशेष म्हणजे, मीन राशीत कर्मदाता शनी देव आधीच विराजमान आहेत. शुक्राचे आपल्या उच्च राशीत म्हणजेच मीन राशीत आगमन झाल्यामुळे 'मालव्य राजयोग' निर्माण झाला असून शनीसोबतच्या या युतीमुळे कुंडलीत अत्यंत शक्तिशाली 'केंद्र त्रिकोण राजयोग' तयार झाला. हा शुभ योग 26 मार्चपर्यंत, म्हणजेच पुढील 25 दिवस अस्तित्वात राहणार असून याचा सर्वाधिक सकारात्मक प्रभाव तीन भाग्यशाली राशींवर पडणार आहे.

या राजयोगामुळे मेष राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात सुवर्णकाळ सुरु होण्याची चिन्हे आहेत. आर्थिक आघाडीवर त्यांना मोठी प्रगती पाहायला मिळेल आणि उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण झाल्याने आर्थिक स्थिती कमालीची मजबूत होईल. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील आणि जे अविवाहित तरुण-तरुणी लग्नासाठी इच्छूक आहेत, त्यांना या काळात विवाहाचे अतिशय चांगले प्रस्ताव येण्याची शक्यता आहे. कुटुंबासोबत आनंदाचे क्षण घालवण्याची ही उत्तम संधी असेल.

वृषभ राशीच्या लोकांसाठी हा केंद्र त्रिकोण राजयोग सर्व संकटांचा अंत करणारा ठरेल. या राशीच्या व्यक्तींना करिअरमध्ये मोठी झेप घेण्याची संधी मिळेल. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती (प्रमोशन) मिळण्याचे प्रबळ योग असून व्यावसायिकांना नफ्याचे नवीन मार्ग खुले होतील. आर्थिक धनलाभासोबतच सामाजिक प्रतिष्ठा वाढेल आणि रखडलेली कामे मार्गी लागल्याने मानसिक शांतता लाभेल.

धनु राशीच्या जातकांसाठी देखील हा काळ भाग्योदयाचा ठरेल. तुमच्या जीवनात सकारात्मक बदलांची लाट येईल, ज्यामुळे आर्थिक प्रगतीला वेग मिळेल. जर तुम्ही नवीन घर किंवा वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर 26 मार्चपूर्वी तुमचे हे स्वप्न साकार होऊ शकते. आरोग्याच्या तक्रारी दूर होतील आणि गुंतवणुकीतून (Investment) चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. एकूणच, शुक्राच्या या राशी परिवर्तनामुळे या तीन राशींच्या व्यक्तींना पैसा, करिअर आणि सुख-सुविधांच्या बाबतीत नशिबाची भक्कम साथ मिळणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pilgao: ''पुंडलिक वर दे हरि विठ्ठल"!शेकडो वर्षांची परंपरा, पिळगावात होमकुंड उत्साहात

अग्रलेख: तुम्हालाही मुली आहेत, विसरू नका

IPL 2026: 'आयपीएल'शी स्पर्धा करणं 'पाक'ला पडलं महागात! प्रेक्षकांविना होणार सामने; परदेशी खेळाडूंची माघार

Digital Census 2026: डिजिटल पद्धतीने जनगणना होणार सुरु! पहिला टप्‍पा 16 एप्रिलपासून; शिक्षकांना मिळणार 25 हजार मानधन

Kadamba Protest: ..अन्यथा प्रखर आंदोलन! कदंब कर्मचाऱ्यांचा इशारा; प्रलंबित मागण्या वेळीच सोडवण्याची मागणी

SCROLL FOR NEXT