Shani Gochar 2026 Dainik Gomantak
Horoscope

Shani Gochar 2026: शनिदेवांची उलटी चाल अन् नक्षत्र बदल! 'या' राशींना नोकरीत बसणार मोठा फटका; आयुष्यात सुरु होणार संघर्ष

Shani Revati Nakshatra Transit August 2026: ज्योतिषशास्त्रात अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जाणारे न्यायदेवता आणि कर्मफळाचा दाता 'शनिदेव' लवकरच आपले नक्षत्रपद बदलणार आहे.

Manish Jadhav

Shani Revati Nakshatra Transit August 2026: ज्योतिषशास्त्रात अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जाणारे न्यायदेवता आणि कर्मफळाचा दाता 'शनिदेव' लवकरच आपले नक्षत्रपद बदलणार आहे. गुरुवारी (20 ऑगस्ट) संध्याकाळी 7 वाजून 45 मिनिटांनी शनिदेव रेवती नक्षत्राच्या दुसऱ्या पदातून पहिल्या पदात प्रवेश करतील. त्यानंतर 9 ऑक्टोबरपर्यंत शनिदेव याच नक्षत्रात विराजमान राहतील आणि पुढे उत्तर भाद्रपद नक्षत्रात गोचर करतील.

विशेष म्हणजे, सध्या शनिदेव मीन राशीत वक्री स्थितीत आहेत. वक्री स्थितीत असतानाच होणाऱ्या या नक्षत्र गोचरामुळे सर्व 12 राशींवर याचा प्रभाव पडणार असला, तरी मेष, कर्क, वृश्चिक आणि मकर या 4 राशींच्या जातकांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.

मेष राशीच्या जातकांना या काळात आर्थिक बाबतीत प्रचंड सतर्क राहावे लागेल. पैशांचे कोणतेही व्यवहार करताना घाईगडबड टाळावी, तसेच या काळात नवीन गुंतवणूक करणे नुकसानकारक ठरु शकते. रागावर नियंत्रण न ठेवल्यास मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. कर्क राशीच्या लोकांसाठी हा काळ मानसिक ताणतणाव वाढवणारा ठरु शकतो. रागाच्या भरात घेतलेल्या चुकीच्या निर्णयामुळे हातात आलेली कामे बिघडू शकतात. आरोग्याची (Health) काळजी घेणे गरजेचे असून प्रवासादरम्यान सावध राहावे लागेल. वाढत्या खर्चामुळे आर्थिक बजेट कोलमडू शकते, त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवणे आणि नोकरी-व्यवसायात प्रचंड मेहनत करणे भाग पडेल.

वृश्चिक राशीच्या जातकांना कामाच्या ठिकाणी अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागेल. कामाचा ताण वाढल्याने मन अस्वस्थ राहील, मात्र प्रामाणिक मेहनतीने परिस्थिती नियंत्रणात आणता येईल. उधळपट्टी टाळणे आणि कोणाशीही वादविवादात न पडणेच हितकारक ठरेल, तसेच वाहन चालवताना खबरदारी बाळगणे आवश्यक आहे. मकर राशीच्या लोकांचा ताणतणाव या काळात वाढण्याची शक्यता आहे. नोकरीत मिळालेल्या नवीन जबाबदाऱ्यांमुळे त्रास होऊ शकतो. अशा वेळी नोकरी बदलणे किंवा नवीन व्यवसाय सुरु करण्याची घाई करु नये. कौटुंबिक आघाडीवर भावा-बहिणींसोबतचे संबंध बिघडणार नाहीत, याची विशेष काळजी मकर राशीच्या जातकांनी घेतली पाहिजे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shukra Gochar 2026: वैभव अन् संपत्तीचा कारक बदलणार चाल! शुक्राचे नक्षत्र गोचर 5 राशींसाठी ठरणार वरदान; धनाचा होणार वर्षाव

Madgaon Urban Bank: मडगाव अर्बनच्या ठेवीदारांना पुन्हा धक्का; पैसे मिळण्याची निश्चित तारीखच नाही! 4.20 कोटींच्या वसुलीसाठी 154 खटले

Goa POCSO Case: 10 वर्षांची सक्तमजुरी, दंड अन् आता सर्वोच्च न्यायालयात आव्हान, लैंगिक अत्याचार प्रकरणी पीडितेसह सरकारला नोटीस

Teacher Transfer Protest: 'आम्हाला हे शिक्षक यावर्षी तरी हवेत'; पेडणेतील विद्यार्थ्यांचा वर्गांवर बहिष्कार, जोरदार निदर्शने

Volkswagen Layoffs: मेड इन चायनाचा दणका! फॉक्सवॅगन 1 लाख कर्मचाऱ्यांना देणार नारळ; ऑटोमोबाईल जगतात इतिहासातील सर्वात मोठी कपात

SCROLL FOR NEXT