Shani Dev  Dainik Gomantak
Horoscope

शनिदेवाची वक्रदृष्टी संपली, आता सुरु होणार सुखाचे दिवस! 'या' दोन राशींचे भाग्य अचानक चमकणार; डिसेंबरपर्यंतचा काळ ठरणार खास

Shani Dev Blessings Makar Kumbha Rashi: वैदिक ज्योतिषशास्त्रात शनिदेवाला कर्मफलदाता आणि न्यायाचा अधिपती मानले जाते.

Manish Jadhav

Shani Dev Blessings Makar Kumbha Rashi: वैदिक ज्योतिषशास्त्रात शनिदेवाला कर्मफलदाता आणि न्यायाचा अधिपती मानले जाते. माणसाच्या चांगल्या-वाईट कर्मांनुसार शनिदेव त्याला फळ देतात. वाईट कर्मांची शिक्षा आणि चांगल्या कर्मांचे उत्तम फळ देणारे ग्रह म्हणून शनीची ओळख आहे. ज्योतिषशास्त्रानुसार मकर आणि कुंभ या दोन्ही राशींचे स्वामी स्वतः शनिदेव आहेत. त्यामुळे या दोन्ही राशींच्या लोकांवर शनीचा विशेष प्रभाव पाहायला मिळतो.

चालू वर्ष २०२६ चे उरलेले महिने म्हणजेच डिसेंबर महिन्यापर्यंतचा काळ मकर आणि कुंभ राशीच्या लोकांसाठी अत्यंत शुभ आणि सकारात्मक ठरणार आहे. या काळात त्यांच्या आयुष्यात मोठ्या आनंदाचे आगमन होणार असून प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेली कामे मार्गी लागणार आहेत.

मकर राशीच्या लोकांसाठी वर्षाचे उर्वरित महिने अत्यंत फलदायी सिद्ध होतील. व्यावसायिक दृष्टिकोनातून हा काळ सुवर्णकाळ ठरणार असून व्यापार-उद्योगात मोठी यशप्राप्ती होईल. शनिदेवाच्या प्रभावामुळे तुमच्या आयुष्यात गेली अनेक वर्षे चाललेल्या मानसिक आणि आर्थिक संकटांचा अंत होईल. नोकरी करणाऱ्या जातकांच्या अडचणी दूर होऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांचे उत्तम सहकार्य लाभेल, ज्यामुळे करिअरमध्ये प्रगतीचे आणि पदोन्नतीचे योग येतील. आर्थिक स्थिती मजबूत झाल्यामुळे मन प्रसन्न राहील आणि मानसिक शांतता लाभेल. या काळात माता-पित्यांचे पूर्ण सहकार्य तुम्हाला मिळेल. या काळात मकर राशीच्या लोकांनी शनिदेवाची उपासना करावी आणि नियमितपणे शनिवारी शनि मंदिरात जाऊन दर्शन घ्यावे.

दुसरीकडे, कुंभ राशीच्या जातकांवर सध्या शनीच्या साडेसातीचा तिसरा आणि अंतिम चरण सुरू आहे. हा काळ कुंभ राशीच्या लोकांना त्यांच्या भूतकाळातील चुका सुधारण्याची सुवर्णसंधी देईल. कुंभ राशीचा स्वामी स्वतः शनी असल्याने त्यांना या काळात संमिश्र आणि सामान्यतः फायदेशीर फळे मिळतील. वर्षाच्या अखेरपर्यंतचा काळ आर्थिक दृष्टीने लाभदायी ठरणार असून अचानक धनलाभाचे योग येतील. नशिबाची पूर्ण साथ लाभल्यामुळे बेरोजगार असणाऱ्यांना रोजगाराच्या (Employment) नवीन संधी मिळतील आणि उत्पन्नात वाढ होईल.

शनिदेवाच्या कृपेने तुमच्या कठोर परिश्रमाचे योग्य फळ तुम्हाला नक्की मिळेल. कुंभ राशीच्या जातकांनी अधिक शुभ फळांसाठी शनिवारी मोहरीच्या तेलाचे दान करावे आणि दररोज किंवा शनिवारी हनुमान चालीसाचे पठण करावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

EPFO कडून पेन्शनधारकांसाठी मोठी खूशखबर! आता घरी बसून जमा करता येणार 'डिजिटल लाईफ सर्टिफिकेट'; जाणून घ्या पद्धत

Abhishek Sharma T20 Record: सिक्सर किंग अभिषेक शर्माची कमाल! पॉवरप्लेमध्ये 100 षटकार मारणारा ठरला जगातील पहिला फलंदाज; रोहित शर्माला सोडले मागे

Donald Trump Iran Jail: डोनाल्ड ट्रम्पला इराणनं तुरुंगात डांबलं? तेहरानमधील व्हायरल व्हिडिओनं जगात खळबळ; अमेरिकेच्या दादागिरीला चोख प्रत्युत्तर VIDEO

Codli Iron Ore Mine: कोडली खाण पुन्हा सुरू करण्यावर संमिश्र प्रतिक्रिया; रोजगाराची आशा, पण पाणी, शेती आणि प्रदूषणाची गंभीर चिंता

Made In India Smartphone Brand: ॲपल-सॅमसंगला देणार टक्कर! भारत 2028 पर्यंत लॉन्च करणार स्वतःचा स्मार्टफोन ब्रँड; केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT