मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी खरोखर खास आहे. कामाच्या ठिकाणी योग्य निर्णय घ्या म्हणजे नक्कीच यशस्वी व्हाल. हिम्मत न हरता काम करत रहा.
वृषभ: आजच्या दिवशी एका खास व्यक्तीला भेटण्याचा योग आहे. आजूबाजूला काय चाललंय याकडे लक्ष न देता स्वतःच्या कामावर लक्ष केंद्रित करा. विनाकारण खर्च करणं टाळा.
मिथुन: विद्यार्थ्यांना आज एखाद्या स्पर्धेत यश मिळू शकते. संपत्ती किंवा वाहनसंबंधित काही त्रास निर्माण होऊ शकतात.
कर्क: तुमच्या जीवनात काही सकारात्मक बदल होणार आहेत. जे लक्ष साधण्याचा प्रयत्न करत आहेत ते नक्कीच साध्य होईल. व्यापार करत असाल तर बाजारातील घडामोडींकडे लक्ष असुद्या.
सिंह: घरच्यांसाठी काही गोष्टी खरेदी कराल. मुलांच्या शिक्षणाचे प्रश्न मिटतील. एकूण दिवस उत्तम असेल तरी खर्चावर मात्र नियंत्रण असायला हवे.
कन्या: संपत्तीच्या बाबतीत काही अडचणी किंवा वाद असल्यास दूर होतील. कोणताही निर्णय घेताना विचार करा, घाईगडबडीत निर्णय घेणं महागात पडू शकतं.
तूळ: आज नवीन लोकांची भेट होईल आणि संपर्क वाढेल. दैनंदिन कामातून सुख मिळेल.
वृश्चिक: आज तुम्ही कामात व्यस्त रहाल. परदेशात जाण्याची इच्छा असणाऱ्यांची स्वप्न आज पूर्ण होऊ शकतात, मात्र जो काही निर्णय घ्याल तो घरच्यांच्या मार्गदर्शनातून घ्यावा.
धनु: आत्मविश्वास कमी व्हायला देऊ नका, कारण याच विश्वासाच्या जोरावर तुम्ही अनेक कठीण प्रसंग पार करणार आहात. लोकं काय बोलतात याकडे होईल तेवढं दुर्लक्ष करा.
मकर: जी लोकं तुमच्या विरुद्ध होती त्यांना त्यांची चूक लक्षात येईल. भावा-बहिणीच्या नातं खुलेल.
कुंभ: कितीही संकटं आली तरी न घरबता त्यांचा सामना करा. विचाराने निर्णय घ्या. घरात आज काही क्लेश होण्याची शक्यता आहे.
मीन: वाढणारा खर्च तुमच्यासाठी डोकेदुखी असू शकतो म्हणूनच खर्चावर नियंत्रण ठेवा. अतिउत्साहात केलेल्या गोष्टी चुकण्याची शक्यता आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.