raksha bandhan 2025 Dainik Gomantak
Horoscope

Raksha Bandhan Muhurat: कोणत्याही वेळी बांधा राखी, पण फक्त 'हा' दीड तास टाळा; जाणून घ्या रक्षाबंधनाचा 'अभिजीत मुहूर्त'

Raksha Bandhan abhijit muhurat: विशेष म्हणजे, यंदा सुमारे ९५ वर्षांनंतर असा शुभ योग जुळून येत आहे, जेव्हा रक्षाबंधन हा सण 'भद्रा' या अशुभ कालावधीपासून पूर्णपणे मुक्त असेल

Akshata Chhatre

Raksha Bandhan Auspicious Time: बहीण-भावाच्या पवित्र नात्याचा उत्सव म्हणजेच 'रक्षाबंधन'. यंदा ९ ऑगस्ट २०२५, शनिवारी श्रावण पौर्णिमेच्या तिथीवर हा सण साजरा होणार आहे. विशेष म्हणजे, यंदा सुमारे ९५ वर्षांनंतर असा शुभ योग जुळून येत आहे, जेव्हा रक्षाबंधन हा सण 'भद्रा' या अशुभ कालावधीपासून पूर्णपणे मुक्त असेल. त्यामुळे संपूर्ण दिवसभर राखी बांधण्यासाठी शुभ मानला जात आहे. मात्र, तरीही काही विशिष्ट वेळ टाळणे आवश्यक आहे, ज्यामुळे आपल्या नात्यातील प्रेम आणि समृद्धी अधिक वाढेल.

राहुकाल टाळून राखी बांधा

ज्योतिषशास्त्रानुसार, कोणतेही शुभ कार्य राहुकालात करू नये. ९ ऑगस्ट रोजी सकाळी ९:०७ ते १०:४७ पर्यंत राहुकाल असेल. हा दीड तासाचा कालावधी शुभ कार्यांसाठी योग्य मानला जात नाही. त्यामुळे, बहिणींनी या वेळेत आपल्या भावाला राखी बांधणे टाळावे. राहुकाल संपल्यानंतर म्हणजेच सकाळी १०:४७ नंतर कोणत्याही वेळी राखी बांधता येईल.

सर्वात उत्तम मुहूर्त कोणता?

संपूर्ण दिवस शुभ असला, तरी राखी बांधण्यासाठी सर्वात उत्तम मुहूर्त म्हणजेच अभिजीत मुहूर्त असतो. या मुहूर्तामध्ये केलेले कार्य नेहमीच यशस्वी आणि फलदायी ठरते. यंदाचा अभिजीत मुहूर्त दुपारी १२:०२ ते १२:५० पर्यंत असेल. या वेळेत राखी बांधल्यास भावाच्या दीर्घायुष्य आणि भरभराटीसाठी ते अधिक लाभदायक ठरू शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT