Trigrahi Yog  Dainik Gomantak
Horoscope

Trigrahi Yog 2026: बुध, शुक्र आणि गुरुची कमाल! शक्तिशाली त्रिग्रही योगामुळे 7 राशींवर होणार धनाचा वर्षाव; जोडीदारासोबतचे संबंध होणार अधिक मधुर

Trigrahi Yog In Cancer Rashi 2026: ज्योतिष शास्त्रात ग्रहांच्या युतीला आणि राशी परिवर्तनाला अत्यंत विशेष स्थान आहे. सोमवार, 22 जून 2026 रोजी ग्रहांचा राजकुमार बुध मिथुन राशीतून बाहेर पडून कर्क राशीत प्रविष्ट झाला.

Manish Jadhav

Trigrahi Yog In Cancer Rashi 2026: ज्योतिष शास्त्रात ग्रहांच्या युतीला आणि राशी परिवर्तनाला अत्यंत विशेष स्थान आहे. सोमवार, 22 जून 2026 रोजी ग्रहांचा राजकुमार बुध मिथुन राशीतून बाहेर पडून कर्क राशीत प्रविष्ट झाला. कर्क राशीमध्ये आधीपासूनच सुख-सुविधांचा कारक शुक्र आणि देवांचे गुरु बृहस्पती विराजमान आहेत. बुधाच्या या गोचरामुळे आता कर्क राशीत बुध, शुक्र आणि गुरु या तीन अत्यंत शुभ ग्रहांची युती झाली असून एक अतिशय शक्तिशाली 'त्रिग्रही योग' निर्माण झाला.

वैदिक ज्योतिषात या तिन्ही ग्रहांना शुभ मानले जाते, त्यातच गुरु सध्या कर्क राशीत उच्च च्या अवस्थेत असल्याने या योगाचे बळ कमालीचे वाढले. ज्योतिषाचार्यांच्या मते, या ऐतिहासिक ज्योतिषीय घटनेमुळे 7 भाग्यशाली राशींचे दिवस बदलणार असून त्यांना करिअर आणि आर्थिक आघाड्यांवर अभूतपूर्व यश मिळणार आहे.

या त्रिग्रही योगामुळे वृषभ राशीच्या लोकांना जुन्या ओळखीचा आणि नेटवर्किंगचा मोठा फायदा होईल, तर ऑनलाइन व्यवसायातून अतिरिक्त उत्पन्न मिळून रखडलेली कामे पूर्ण होतील. हा योग कर्क राशीतच बनत असल्याने या राशीच्या व्यक्तींना सर्वाधिक लाभ मिळेल; नोकरीत प्रभाव वाढेल, जुने ग्राहक परत येतील आणि नवीन मालमत्ता खरेदीचे योग येतील. सिंह राशीच्या लोकांसाठी हा काळ अचानक धनलाभ आणि रखडलेले पैसे मिळवून देणारा ठरेल, तसेच उच्च शिक्षणात मोठी यशस्विता लाभेल. कन्या राशीच्या व्यक्तींची आर्थिक बाजू मजबूत होईल, उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील आणि मित्रांच्या मदतीने नवीन काम सुरु करता येईल.

वृश्चिक राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ लाभेल; प्रदीर्घ काळापासून रखडलेल्या योजना पुढे सरकतील, धार्मिक प्रवासाचे बेत आखले जातील आणि परदेश शिक्षणाची दारे खुली होतील. मकर राशीच्या लोकांना भागीदारीच्या व्यवसायातून मोठा नफा कमावता येईल, जोडीदारासोबतचे संबंध मधुर होतील आणि आर्थिक स्थिती कमालीची मजबूत होईल. शेवटी, मीन राशीच्या लोकांमध्ये कमालीचा आत्मविश्वास पाहायला मिळेल. कला, लेखन आणि डिजिटल क्षेत्रातील लोकांना धनलाभाच्या उत्तम संधी मिळतील; तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना (Student) त्यांच्या कष्टाचे योग्य फळ मिळून नवीन जबाबदाऱ्यांचे सोने करता येईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mark Zuckerberg News: चाइल्ड पोर्नोग्राफी आणि डीपफेक कंटेंटवरुन मोदी सरकार आक्रमक, मार्क जुकरबर्गने मागितली माफी; मेटाच्या अधिकाऱ्यांना पुन्हा समन्स

India vs Sri Lanka: स्वातंत्र्यदिनी टीम इंडिया रचणार इतिहास! अशी कामगिरी करणारा भारत ठरणार जगातील तिसराच; श्रीलंकेत गिल ब्रिगेड करणार कमाल

Navpancham Rajyog 2026: सूर्य-शनिच्या नवपंचम राजयोगानं उजळणार 5 राशींचं भाग्य; धनलाभासह करिअरमध्ये मिळणार प्रचंड यश!

CJP Paper Leak Protest: पेपरफुटीच्या वादात युवाशक्तीचा मोठा विजय! प्रधानांचा राजीनामा अन् मोदी सरकारचा नतमस्तक होणारा पराजय?

Gold Silver Rate: सोन्याचा भाव गगनाला भिडला! 1 लाख 46 हजारांचा टप्पा केला पार, चांदीनेही गाठला नवा उच्चांक; जाणून घ्या आजची किंमत

SCROLL FOR NEXT