Grah Gochar 2026 Dainik Gomantak
Horoscope

Grah Gochar 2026: नशिबाचा 'डबल' धमाका! पाच राशींना मिळणार भाग्याची साथ; सूर्य-शुक्र आणि शुक्र-गुरुचा 'द्विद्वादश योग' ठरणार वरदान

Double Dwidwadash Yoga Benefits: ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने 11 मे 2026 हा दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण आणि बदलांचा संकेत देणारा ठरणार आहे.

Manish Jadhav

Double Dwidwadash Yoga Benefits: ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने 11 मे 2026 हा दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण आणि बदलांचा संकेत देणारा ठरणार आहे. या दिवशी ग्रहांच्या विशेष हालचालींमुळे 'डबल द्विद्वादश' आणि 'लाभ योग' असे अत्यंत शुभ योग जुळून येत आहेत. विशेषतः मंगळ आणि सूर्य यांच्या गोचरमुळे पाच राशींच्या व्यक्तींसाठी यश आणि प्रगतीचे नवे मार्ग मोकळे होणार आहेत. 11 मे रोजी पहाटे 2:51 वाजल्यापासून सूर्य-शुक्र आणि सकाळी 6:36 वाजल्यापासून शुक्र-गुरु एकमेकांपासून 30 अंशांच्या अंतरावर असल्याने 'डबल द्विद्वादश योग' निर्माण होईल.

तसेच, सकाळी 7:40 वाजल्यापासून सूर्य आणि गुरु 60 अंशांच्या अंतरावर राहून 'लाभ योग' तयार करतील. याच दिवशी दुपारी 12:47 वाजता मंगळ मीन राशीतून स्वतःच्या मेष राशीत प्रवेश करेल, तर संध्याकाळी 7:37 वाजता सूर्य स्वतःच्या कृत्तिका नक्षत्रात गोचर करेल. ज्योतिषाचार्य हर्षवर्द्धन शांडिल्य यांच्या मते, ही ग्रहांची महाहलचल पाच राशींसाठी अत्यंत फलदायी ठरणार आहे.

मेष राशीच्या व्यक्तींसाठी हा दिवस ऊर्जा आणि आत्मविश्वासाने भरलेला असेल. मंगळाचा स्वराशीतील प्रवेश रखडलेली कामे मार्गी लावेल आणि करिअरमध्ये नवीन सुरुवातीचे संकेत देईल. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल आणि स्पर्धेत यश मिळण्याचे योग आहेत. वृषभ राशीला भाग्याची उत्तम साथ मिळेल. सूर्य आणि गुरुच्या प्रभावामुळे नोकरी-व्यवसायात प्रगती होईल आणि जुन्या गुंतवणुकीतून (Investment) लाभ मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील आणि धनसंचयाचे नवे मार्ग उपलब्ध होतील.

मिथुन राशीसाठी हा दिवस सन्मान आणि यश घेऊन येईल. कार्यक्षेत्रात मेहनतीचे चीज होईल आणि वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील. आर्थिक बाजू भक्कम होईल आणि एखादी मोठी संधी तुमच्या हाती लागू शकते.

सिंह राशीच्या व्यक्तींना नशिबाची पूर्ण साथ मिळणार असून प्रलंबित कामे पूर्ण होतील. परदेश प्रवास किंवा लांबच्या प्रवासाचे योग जुळून येतील, तसेच शिक्षण आणि करिअरमध्ये उत्तम परिणाम प्राप्त होतील. समाजात मान-सन्मान वाढेल आणि कुटुंबाकडून पूर्ण सहकार्य मिळेल. मीन राशीसाठी हा काळ प्रगतीचा आणि बदलांचा असेल. मंगळाचे राशी परिवर्तन आर्थिक स्थिती अधिक मजबूत करेल आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. गुंतवणुकीसाठी वेळ अनुकूल असून करिअरला नवीन दिशा मिळेल, ज्यामुळे जीवनात सकारात्मकता आणि मानसिक समाधान वाढेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mitchell Starc Fight: लाईव्ह सामन्यात 'रनिंग लाईन'वरुन राडा! मिचेल स्टार्क मेहदी हसन मिराजशी भिडला; हाय-व्होल्टेज ड्रामा व्हायरल

Goa Olympic Association: 'गोवा ऑलिंपिक'ला 21 वर्षांनंतर लाभणार नवा सचिव, गुरुदत्त भक्ता यांची दोन दशकांची कारकीर्द; महत्त्वाच्या स्पर्धांचे राज्यात आयोजन

Shukra Pushkaransh Yog 2026: शुक्रदेवांची अफाट कृपादृष्टी! 15 ऑगस्टपासून 'या' राशींच्या नशिबाला मिळणार नवी दिशा; 'शुक्र पुष्करांश' योग करणार मालामाल

Calangute Dance Bar: कळंगुटमधील 'डान्स बार' बंद करा, गट काँग्रेस समितीची मागणी; पोलिसांना निवेदन सादर

Child Disappearance Goa: राज्यात पाच वर्षांत हरवली 256 मुले, 106 सापडली,150 बेपत्ता

SCROLL FOR NEXT