Papmochani Ekadashi 2026 Dainik Gomantak
Horoscope

Papmochani Ekadashi 2026: नशिबाची साथ अन् श्रीहरीचा आशीर्वाद! पापमोचनी एकादशीला उजळणार 'या' 5 राशींचं भाग्य; नोकरीत बढतीसह धनलाभाचा योग

Lucky Zodiac Signs: हिंदू धर्मात एकादशीच्या व्रताला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. त्यातही पापमोचनी एकादशी ही सर्व पापांचा नाश करणारी आणि पुण्य देणारी मानली जाते.

Manish Jadhav

Papmochani Ekadashi 2026: हिंदू धर्मात एकादशीच्या व्रताला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. त्यातही पापमोचनी एकादशी ही सर्व पापांचा नाश करणारी आणि पुण्य देणारी मानली जाते. यंदाची पापमोचनी एकादशी काही विशिष्ट राशींच्या लोकांसाठी भाग्योदयाची ठरणार आहे. या दिवशी ग्रहांची स्थिती आणि भगवान विष्णूचा आशीर्वाद यामुळे 5 राशींच्या जातकांना करिअरमध्ये प्रगती, आर्थिक लाभ आणि कौटुंबिक सौख्य लाभण्याचे प्रबळ योग आहेत. चला तर मग या नशिबवान राशी नेमक्या कोणत्या आणि त्यांना काय फळ मिळणार, याविषयी जाणून घेऊया...

कर्क राशीच्या लोकांसाठी हा काळ आर्थिक प्रगतीचा असेल. गेल्या काही दिवसांपासून पैशांची असलेली चणचण आता दूर होणार असून तुमची आर्थिक स्थिती अधिक मजबूत होईल. गुंतवणुकीचा (Investment) विचार करणाऱ्यांसाठी हा काळ अत्यंत लाभदायक आहे, या काळात केलेली गुंतवणूक भविष्यात मोठा परतावा देऊ शकते. नोकरी करणाऱ्या जातकांसाठी ऑफिसमधील वातावरण सकारात्मक असेल. तुमचे वरिष्ठ तुमच्या कामावर खुश राहतील आणि तुमच्या मेहनतीचे कौतुक होईल, ज्यामुळे तुम्हाला मानसिक समाधान लाभेल.

कन्या राशीच्या जातकांसाठी पापमोचनी एकादशी यशाची दारे उघडणारी ठरेल. विशेषतः ज्या विद्यार्थ्यांचे परदेशात जाऊन उच्च शिक्षण घेण्याचे स्वप्न आहे, त्यांना या काळात काही चांगली बातमी मिळू शकते. विवाहित जोडप्यांसाठी हा काळ सुवर्णकाळासारखा असेल, त्यांच्या नात्यात गोडवा आणि सामंजस्य वाढेल. आर्थिक आघाडीवर नवनवीन संधी चालून येतील, ज्याचा फायदा भविष्यात होईल.

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी, विशेषतः व्यापाऱ्यांसाठी हा दिवस अत्यंत फायदेशीर ठरेल. एखादी मोठी बिझनेस डील फायनल होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे व्यवसायात मोठी प्रगती होईल. प्रगतीचे मार्ग मोकळे झाल्यामुळे तुमचा उत्साह वाढेल. ज्यांना परदेशवारीची ओढ आहे, त्यांचे विदेश प्रवासाचे स्वप्नही या काळात पूर्ण होऊ शकते.

धनु राशीच्या जातकांना पापमोचनी एकादशीला भाग्याची पूर्ण साथ मिळणार आहे. नोकरी आणि व्यवसाय दोन्ही क्षेत्रात तुमची प्रगती होईल. नोकरीत बढती (प्रमोशन) मिळण्याचे संकेत असून पगारवाढीचेही योग आहेत. कौटुंबिक आयुष्यात सुख-शांती नांदेल आणि नात्यांमधील दुरावा कमी होऊन प्रेम वाढेल. अविवाहित लोकांसाठी विवाहाचे चांगले प्रस्ताव येऊ शकतात, ज्यामुळे घरात आनंदाचे वातावरण राहील.

कुंभ राशीच्या लोकांच्या आयुष्यातील दीर्घकाळापासून सुरु असलेल्या समस्या आता संपुष्टात येतील. जे लोक नोकरीच्या शोधात आहेत, त्यांना नामांकित कंपन्यांकडून चांगल्या संधी मिळतील. स्वतःचे काम स्वतः करण्यावर भर दिल्यास तुम्हाला यश नक्की मिळेल, इतरांवर विसंबून राहणे टाळावे. गुंतवणुकीसाठी हा काळ उत्तम असून भविष्यात त्यातून मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे. एकंदरीत, या 5 राशींसाठी हा काळ प्रगतीचा आणि समृद्धीचा ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: लुटमार, मारहाण अन् दहशत! वृद्धांना कोंडून सोनं लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, पाच बांगलादेशी जेरबंद; गोवा पोलिसांना मोठं यश

Goa Cooperative Bank NPA Recovery: 'एनपीए'चे ओझे कमी करण्यासाठी सहकार खाते ॲक्शन मोडमध्ये! 65 लाखांची ‘एनपीए’ कर्जे वसूल; मंत्री शिरोडकरांची माहिती

49 तास, 44 मिनिटांत 210 किमी अंतर पोहून पार! आर्यन सिंगची समुद्रातील चित्तथरारक झुंज; अजितदादांना अनोखी श्रद्धांजली

Porvorim Flyover: पर्वरीकरांसाठी आनंदाची बातमी! उड्डाणपूल गणेश चतुर्थीपूर्वीच पूर्ण होणार, डांबरीकरणास प्रारंभ; मंत्री कामतांची मोठी माहिती

मैदानावर काळाचा घाला! 'रुईशा'चा हॉकीचा सराव ठरला अखेरचा, डोक्याला चेंडू लागून 14 वर्षीय खेळाडूचा मृत्यू; क्षणात होत्याचं नव्हतं झालं

SCROLL FOR NEXT