Chandra Gochar  Dainik Gomantak
Horoscope

Chandra Gochar 2026: नोकरी-व्यवसायात प्रगतीचा योग! चंद्राच्या गोचरने 'या' 3 राशींना अच्छे दिन; मिळणार आनंदाची बातमी

Chandra Gochar 28 November 2026 Benefits: आज 28 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 वाजून 21 मिनिटांनी चंद्राचे गोचर झाले. ज्योतिषशास्त्रात चंद्राला मन, भावना आणि संवेदनशीलतेचा कारक मानले जाते.

Manish Jadhav

Chandra Gochar 28 November 2026 Benefits: आज 28 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 वाजून 21 मिनिटांनी चंद्राचे गोचर झाले. ज्योतिषशास्त्रात चंद्राला मन, भावना आणि संवेदनशीलतेचा कारक मानले जाते. चंद्राच्या या बदलाचा परिणाम सर्वच राशींवर पाहायला मिळेल, मात्र कर्क राशीत चंद्र गेल्यामुळे मेष, कर्क आणि वृश्चिक राशीच्या लोकांना विशेष लाभ होऊ शकतो. या राशींच्या व्यक्तींचा ताणतणाव कमी होऊन प्रगतीचे नवे मार्ग खुले होऊ शकतात.

मेष राशीच्या लोकांसाठी चंद्राचे हे गोचर अत्यंत फायदेशीर ठरु शकते. तुमच्या आयुष्यात आनंदाचे क्षण येतील आणि नशिबाची चांगली साथ मिळेल. नोकरी-व्यवसायात पुढे जाण्याच्या संधी मिळतील तसेच आर्थिक स्थितीतही सुधारणा होण्याची चिन्हे आहेत.

कर्क राशीतच चंद्राचे गोचर झाले असल्याने या राशीच्या लोकांना चांगला फायदा मिळेल. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता असून नशिबाची साथ लाभेल. तसेच, आरोग्यातही (Health) सकारात्मक बदल आणि सुधारणा जाणवू शकते.

वृश्चिक राशीसाठीही चंद्राचे हे गोचर शुभ फलदायी ठरेल. नशिबाची साथ मिळाल्याने कामात यश येईल आणि नोकरीत प्रगतीचे योग जुळून येतील. मानसिक ताण कमी होईल, आर्थिक बाजू भक्कम होऊ शकेल आणि कुटुंबातील वातावरण अधिक आनंदी व सुसंवादी राहील. चंद्राच्या गोचराचे शुभ परिणाम मिळवण्यासाठी "ॐ सों सोमाय नमः" किंवा "ॐ चन्द्राय नमः" या मंत्रांचा जप करणे लाभदायक मानले जाते. याशिवाय शिवलिंगावर जल आणि दूध अर्पण करावे. चंद्राशी संबंधित पांढऱ्या वस्तू, जसे की साखर, दूध आणि तांदूळ यांचे दान करणेही शुभ मानले जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

रिंगमधील 'तो' सामना ठरला अखेरचा! Crown Jewel मध्ये भीषण धडक! बरगड्या अन् किडनीला दुखापत, वयाच्या अवघ्या 38 व्या वर्षी WWE सुपरस्टारचं निधन

Goa Politics: 'गोवा फॉरवर्ड'च्या विलिनीकरणाचा प्रस्ताव आल्यास काँग्रेस तयार; माणिकराव ठाकरे यांचे संकेत

IND vs NZ: क्राइस्टचर्च कसोटीत आकाश दीप चमकला! न्यूझीलंडविरुद्ध रचला नवा इतिहास; 5 बळी घेत केला खास रेकॉर्ड

Daily Horoscope: नात्यात गोडवा अन् कामात उत्साह! 'या' राशींसाठी शनिवारचा दिवस आनंदाचा; आर्थिक स्थितीही सुधारणार

IND vs NZ 2nd Test: 'तो आतून खचला असेल...' सिराजला पुन्हा संघाबाहेर ठेवल्यानं दिग्गज भडकले! कैफ, मुनाफ पटेल अन् जाफर यांनी निवडकर्त्यांना घेतलं फैलावर

SCROLL FOR NEXT