Chandra Gochar 2026 Dainik Gomantak
Horoscope

Chandra Gochar 2026: एप्रिल महिन्यात चंद्राची अद्भुत चाल! 19 वेळा नक्षत्र बदलून 'या' 7 राशींना करणार मालामाल; नशिबाचीही मिळणार साथ

Moon Nakshatra Transit April 2026: वैदिक ज्योतिषशास्त्रात चंद्राला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. चंद्र हा मन, भावना आणि आपल्या दैनंदिन जीवनाचा कारक मानला जातो.

Manish Jadhav

Moon Nakshatra Transit April 2026: वैदिक ज्योतिषशास्त्रात चंद्राला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. चंद्र हा मन, भावना आणि आपल्या दैनंदिन जीवनाचा कारक मानला जातो. त्यामुळेच चंद्राचे नक्षत्र गोचर ज्योतिषीय दृष्टिकोनातून अत्यंत कळीचे ठरते. चंद्र साधारणपणे दररोज आपले नक्षत्र बदलत असतो, ज्याचा थेट परिणाम मानवी स्वभाव, निर्णयक्षमता आणि मानसिक ऊर्जेवर होत असतो. प्रसिद्ध ज्योतिषाचार्यांच्या मते, जेव्हा चंद्राचे गोचर शुभ नक्षत्रात होते, तेव्हा धनलाभ, प्रगती आणि कार्यात यशाचे योग जुळून येतात. याउलट, अशुभ नक्षत्रातील गोचर मानसिक गोंधळ आणि तणाव वाढवू शकते.

येणाऱ्या एप्रिल 2026 मध्ये चंद्राचे तब्बल 19 वेळा नक्षत्र परिवर्तन होणार आहे. या महिन्याची सुरुवात 1 एप्रिल रोजी हस्त नक्षत्रातील गोचरने होईल, जे हिंदू विक्रम संवत 2083 मधील चंद्राचे 13 वे नक्षत्र गोचर असेल. महिन्याचा शेवट 30 एप्रिल रोजी चित्रा नक्षत्रातील गोचरने होणार आहे. या बदलांमुळे काही राशींना भाग्याची साथ मिळेल, तर काहींना सावध राहण्याची गरज भासणार आहे.

मेष राशीच्या जातकांसाठी एप्रिल महिना अत्यंत अनुकूल ठरणार असून अचानक धनलाभाचे योग आहेत. प्रलंबित कामे पूर्ण होतील आणि आत्मविश्वासात वाढ होईल. वृषभ राशीसाठी हा काळ आर्थिक मजबुती घेऊन येईल, उत्पन्नाचे (Income) नवीन स्रोत निर्माण होतील आणि मालमत्तेच्या व्यवहारात लाभ मिळेल. मिथुन राशीच्या व्यक्तींना नशिबाची पूर्ण साथ लाभेल, नोकरी-व्यवसायात प्रगती होऊन आनंदाची बातमी मिळेल.

कर्क राशीच्या लोकांसाठी हा महिना चढ-उतारांचा असू शकतो. वाढते खर्च आणि मानसिक अस्वस्थता यामुळे संयम राखणे गरजेचे ठरेल. सिंह राशीला मात्र हे गोचर जबरदस्त यश मिळवून देईल; समाजात मान-सन्मान वाढेल आणि गुंतवणुकीतून मोठा फायदा होईल. कन्या राशीसाठी हा काळ शुभ संकेतांचा आहे, नोकरीत पदोन्नती आणि कौटुंबिक सुखाचे योग आहेत. तूळ राशीला मिश्र फळे मिळतील, खर्चावर नियंत्रण ठेवणे आणि घाईत निर्णय टाळणे हिताचे ठरेल.

वृश्चिक राशीसाठी चंद्र गोचर अत्यंत लाभदायी ठरेल, करिअरमध्ये मोठी भरभराट होऊन थांबलेले पैसे परत मिळतील. धनु राशीच्या जातकांसाठी काही आव्हाने उभी राहू शकतात, कामात अडथळे आणि मानसिक ताण वाढण्याची शक्यता असल्याने आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. मकर राशीसाठी हा काळ संधीचा असून उत्पन्नात वाढ आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभेल. कुंभ राशीला संमिश्र परिणाम मिळतील, संयम ठेवल्यास कठीण प्रसंगातून मार्ग निघेल. मीन राशीसाठी हा महिना थोडा सावधगिरीचा असेल; कामात अडथळे येण्याची शक्यता असल्याने अध्यात्माकडे कल वाढवणे शांततेसाठी पूरक ठरेल.

एकूणच, एप्रिल महिना चंद्राच्या सततच्या नक्षत्र बदलांमुळे सर्व राशींच्या जीवनात महत्त्वाचे फेरबदल घडवून आणणारा ठरेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: "चिमुकल्यांचे हात-पाय बांधून अमानुष छळ!" डेकेअर सेंटरचा संतापजनक व्हिडिओ व्हायरल; पोलिसांनी 13 जणांना ठोकल्या बेड्या

Goa Professional League 2026: स्पोर्टिंग क्लब द गोवाचा 'विराट' विजय! डॉयल अल्विसची शानदार हॅटट्रिक अन् प्रोफेशनल लीगच्या जेतेपदावर तिसऱ्यांदा कोरलं नाव

Goa River Drowning Cases: गोव्यात बेफिकिरीमुळेच बुडण्याच्या घटनांमध्‍ये होतेय वाढ! सत्तरी तालुक्‍यातही चिंता; मद्यसेवन, सुरक्षेअभावी नद्या बनल्‍या धोकादायक

Harmal Wedding Theft : वीज पुरवठा थांबवून मारला डल्ला, लग्नसोहळ्यातील लुटीचा पडद्याआडून खेळ तपासाचे आव्हान

Bicholim Class 11 Admissions : अकरावीच्या प्रवेशासाठी धावपळ, विज्ञान शाखेसाठी चुरस; ‘ऑनलाईन’ प्रवेश प्रक्रिया सुरू

SCROLL FOR NEXT