Budh Gochar 2026 Dainik Gomantak
Horoscope

Budh Gochar 2026: ''आर्थिक चणचण संपणार, गुंतवणुकीतून मिळणार अमाप पैसा'', 5 राशींच्या लोकांची चांदीच चांदी; बुध गोचरमुळे आयुष्यात येणार सुखाचे दिवस

Mercury Transit Krittika Nakshatra May 2026: ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रहांचे राशी परिवर्तन आणि नक्षत्र गोचर अत्यंत महत्त्वाचे मानले जाते, कारण याचा थेट परिणाम मानवी जीवनातील निर्णयक्षमता, बुद्धिमत्ता आणि आर्थिक स्थितीवर होतो.

Manish Jadhav

Budh Gochar 2026: ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रहांचे राशी परिवर्तन आणि नक्षत्र गोचर अत्यंत महत्त्वाचे मानले जाते, कारण याचा थेट परिणाम मानवी जीवनातील निर्णयक्षमता, बुद्धिमत्ता आणि आर्थिक स्थितीवर होतो. 13 मे रोजी ग्रहांचा राजकुमार मानला जाणारा 'बुध' ग्रह कृत्तिका नक्षत्रात प्रवेश करणार आहे. कृत्तिका नक्षत्राचा स्वामी सूर्य असल्याने, बुध आणि सूर्याचा हा प्रभाव पाच विशिष्ट राशींच्या व्यक्तींमध्ये कमालीचा आत्मविश्वास, नेतृत्वगुण आणि स्पष्ट विचारसरणी विकसित करेल.

या गोचरमुळे केवळ व्यापार आणि करिअरमध्येच प्रगती होणार नाही, तर समाजात मान-सन्मान आणि प्रतिष्ठेतही मोठी वाढ होण्याचे संकेत आहेत. 13 मे पासून मकर राशीसह एकूण पाच राशींच्या जातकांसाठी हा काळ अत्यंत फलदायी ठरणार असून त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडतील.

वृषभ राशीच्या जातकांसाठी बुधाचे हे नक्षत्र परिवर्तन आर्थिक समृद्धी घेऊन येईल. तुमची आर्थिक स्थिती वेगाने सुधारेल आणि दीर्घकाळापासून अडकलेले पैसे परत मिळण्याची दाट शक्यता आहे. व्यापारात नवीन सौदे फायदेशीर ठरतील, तर नोकरीत वरिष्ठ अधिकारी तुमच्या मेहनतीवर खुश राहतील. तुमची वाणी प्रभावी झाल्यामुळे सामाजिक स्तरावर लोक तुमचे म्हणणे गांभीर्याने ऐकतील.

मिथुन राशीच्या लोकांसाठी उत्पन्नाचे (Income) नवीन स्त्रोत खुले होतील आणि उत्पन्नात अचानक वाढ संभवते. तुमची संवाद कौशल्ये इतरांना प्रभावित करतील, ज्यामुळे नोकरीत पदोन्नती किंवा नवीन जबाबदारी मिळण्याचे योग आहेत. निर्णय घेण्याची क्षमता अधिक तीव्र होईल आणि तुमच्या योजना वेगाने यशस्वी होतील.

सिंह राशीच्या लोकांसाठी सूर्याच्या प्रभावामुळे हे गोचर करिअरमध्ये अचानक प्रगतीचे संकेत देत आहे. तुमची नेतृत्व क्षमता मजबूत होईल आणि समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल. गुंतवणुकीतून लाभ मिळण्याचे संकेत असून जुनी अडकलेली कामे मार्गी लागतील. कन्या राशीच्या जातकांसाठी हा काळ अत्यंत फलदायी राहील, कारण बुध हा या राशीचा स्वामी आहे. कार्यक्षेत्रातील तुमच्या योजना यशस्वी होतील आणि आयते उत्पन्नाचे नवीन मार्ग सापडतील. भागीदारीच्या कामात नफा होईल आणि अभ्यासात किंवा बौद्धिक कार्यात यश संपादन कराल.

मकर राशीच्या जातकांसाठी देखील हे नक्षत्र परिवर्तन करिअर आणि आर्थिक आघाडीवर मोठे यश घेऊन येईल. तुमची आर्थिक स्थिती स्थिर आणि अधिक मजबूत होईल, तसेच कार्यक्षेत्रात केलेल्या मेहनतीमुळे तुम्हाला विशेष ओळख मिळेल. उच्च अधिकाऱ्यांकडून कौतुकाची थाप मिळेल आणि मान-सन्मानात वृद्धी होईल. तुमच्या रणनीती यशस्वी ठरतील आणि गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याचे योग आहेत, ज्यामुळे जीवनात प्रगती आणि स्थिरतेचा अनुभव येईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Social Media Ban: मुलांसाठी सोशल मीडिया होणार मर्यादित, मुख्‍यमंत्र्यांशी चर्चा करून रिपोर्ट पाठवणार केंद्राला; मंत्री खंवटेंनी स्पष्टच सांगितलं

Goa BA LLB Entrance Exam: 'गोमंतक' इम्पॅक्ट! बीए एलएलबी गुणवाढ प्रकरणाची मुख्यमंत्र्यांकडून दखल, मागवला सविस्तर अहवाल; शिक्षण सचिवांना निर्देश

Goa Fake Call Center Raid: गोव्यातून अमेरिकन नागरिकांना लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश! दोन बनावट कॉल सेंटर्सवर छापेमारी; 19 जणांना बेड्या

Mandovi River Casino: मांडवीत नवा कॅसिनो येणार की रोखला जाणार? सरकार आणि कंपनीच्या दाव्यांमधील विसंगती न्यायालयासमोर उघड; भूमिकेवरच सवाल

Karnataka Goa Island Dispute: गोव्‍याच्‍या ताब्‍यातील 16 बेटांवर कर्नाटकचा दावा! केंद्राला पत्र, सीमावाद पेटणार

SCROLL FOR NEXT