Magh Purnima Dainik Gomantak
Horoscope

Magh Purnima 2026: कष्टाचं फळ मिळणार अन् कष्ट दूर होणार! माघ पौर्णिमेला 5 शुभ योगांचा महासंयोग; 'या' राशींच्या सुवर्णकाळाची सुरुवात

Magh Purnima 2026: यंदाची माघ पौर्णिमा म्हणजेच 1 फेब्रुवारी 2026 हा दिवस ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आणि मंगलमय ठरणार आहे.

Manish Jadhav

Magh Purnima 2026: यंदाची माघ पौर्णिमा म्हणजेच 1 फेब्रुवारी 2026 हा दिवस ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आणि मंगलमय ठरणार आहे. या दिवसाला 'माघी पौर्णिमा' म्हणूनही ओळखले जाते. या विशेष तिथीला अनेक दुर्मिळ आणि शुभ योगांचा महासंयोग जुळून येत आहे, ज्यामुळे या दिवसाचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व अधिकच वाढले आहे.

यंदा माघ पौर्णिमेच्या दिवशी प्रीति योग, आयुष्मान् योग, पुष्य नक्षत्र, रवि पुष्य योग आणि सर्वार्थ सिद्धी योग असे एकापेक्षा एक प्रभावी योग निर्माण होत आहेत. ग्रहांच्या या शुभ स्थितीचा सकारात्मक परिणाम सर्व राशींवर होणार असला तरी, चार विशेष राशींच्या नशिबाला आता नवी कलाटणी मिळणार आहे. या योगांच्या प्रभावामुळे संबंधितांच्या जीवनातील अनेक संकटे दूर होऊन सुख-समृद्धीचा मार्ग मोकळा होणार आहे.

या शुभ पर्वात मेष राशीच्या जातकांना नशिबाची जोरदार साथ मिळणार आहे. तुम्ही गेल्या अनेक दिवसांपासून करत असलेल्या मेहनतीचे गोड फळ मिळण्याची वेळ आता आली आहे. शुभ कार्यांमध्ये तुम्हाला हमखास यश मिळेल, त्यामुळे समोर येणाऱ्या संधींचा पूर्ण फायदा करून घेणे तुमच्यासाठी हिताचे ठरेल. विशेषतः व्यापाऱ्यांसाठी हा काळ भरघोस नफा मिळवून देणारा ठरेल.

मिथुन राशीच्या लोकांसाठी देखील ही पौर्णिमा आनंदाची बातमी घेऊन येईल. तुमच्या कामातील अडथळे दूर होऊन नोकरी आणि व्यवसायात लाभाचे योग येतील. जीवनातील समस्यांवर तोडगा निघेल, फक्त बोलताना आपल्या वाणीवर संयम ठेवणे गरजेचे आहे. एखादी नवीन योजना आखली असेल, तर ती यशस्वीपणे पूर्णत्वास जाईल.

वृश्चिक राशीच्या व्यक्तींना त्यांच्या कष्टाचे पूर्ण श्रेय मिळेल, ज्यामुळे आर्थिक स्थितीत मोठी सुधारणा होईल. व्यापारात एखादी मोठी डील फायनल होऊ शकते, ज्यामुळे अचानक धनलाभ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल आणि प्रदीर्घ काळ प्रलंबित असलेली कामे मार्गी लागतील.

त्याचप्रमाणे धनु राशीच्या जातकांसाठी प्रगतीची नवीन दारे उघडणार आहेत. गुंतवणुकीतून (Investment) चांगला परतावा मिळण्याचे संकेत आहेत, मात्र कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे किंवा नीट विचार करणे फायद्याचे ठरेल. कार्यक्षेत्रात तुम्हाला यश मिळेल आणि कौटुंबिक नातेसंबंधांमध्ये पूर्वीपेक्षा जास्त गोडवा निर्माण होईल. एकंदरीत, 1 फेब्रुवारीचा हा शुभ संयोग या चार राशींच्या आयुष्यात सोन्याचे दिवस घेऊन येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nanoda: सफर गोव्याची! मंदिरातल्या नादमधूर सुस्वरांनी भक्तीमय होणारे, सर्वांना भुरळ घालणारे टुमदार 'नानोडा'

High Court: बलात्काराचा आरोप सिद्ध करण्यासाठी 'पेनेट्रेशन' अनिवार्य..! 20 वर्षांनंतर आरोपीला हायकोर्टाचा मोठा दिलासा

Shiv Jayanti Wishes In Marathi: जय भवानी, जय शिवाजी! शिवजयंतीनिमित्त प्रियजनांना पाठवा 'या' खास मराठी शुभेच्छा!

8th Pay Commission: लवकरच लागू होणार 8वा वेतन आयोग! कोणाची होणार चांदी अन् कोणाला बसणार फटका? जाणून घ्या सविस्तर

Seema Haider: नव्या घरात हलला पाळणा, पाकिस्‍तानहून भारतात आलेल्‍या सीमा हैदरनं दिला गोंडस मुलाला जन्म; पुन्हा बनली 'आई'

SCROLL FOR NEXT