Laxmi Narayana Rajyog Dainik Gomantak
Horoscope

Laxmi Narayana Rajyog 2026: फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच या 3 राशींचं नशीब पालटणार; 'लक्ष्मी नारायण राजयोग' करणार धनवर्षाव!

Laxmi Narayana Rajyog: ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने वर्ष 2026 मधील जानेवारी महिना ज्याप्रमाणे अनेक मोठ्या घडामोडींचा ठरला, त्याचप्रमाणे फेब्रुवारी महिना देखील अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे.

Manish Jadhav

Laxmi Narayana Rajyog 2026: ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने वर्ष 2026 मधील जानेवारी महिना ज्याप्रमाणे अनेक मोठ्या घडामोडींचा ठरला, त्याचप्रमाणे फेब्रुवारी महिना देखील अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. या महिन्यात केवळ शक्तिशाली ग्रहांचे राशी परिवर्तनच होणार नाही, तर नऊ ग्रहांच्या विशेष संयोगातून अनेक शुभ योग, राजयोग आणि महायुतींचे निर्माण होणार आहे. पंचांगानुसार, फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच शनिदेवाच्या मालकीच्या कुंभ राशीमध्ये एक अत्यंत प्रभावशाली 'लक्ष्मी नारायण राजयोग' तयार होत आहे.

ग्रहांचा राजकुमार मानला जाणारा बुध 3 फेब्रुवारी 2026 रोजी कुंभ राशीत प्रवेश करेल, तर त्यानंतर अवघ्या तीन दिवसांनी म्हणजेच 6 फेब्रुवारीला सुखाचा कारक मानला जाणारा शुक्र देखील याच राशीत पाऊल ठेवणार आहे. बुध आणि शुक्राच्या या युतीमुळे कुंभ राशीत हा राजयोग साकारणार असून, तो 2 मार्च 2026 च्या पहाटेपर्यंत म्हणजेच सुमारे 25 दिवस प्रभावी राहणार आहे. 2 मार्चला शुक्र मीन राशीत गेल्यावर हा योग समाप्त होईल, मात्र या 25 दिवसांच्या कालावधीत शुक्र-बुधाची ही कृपा तीन विशिष्ट राशींच्या आयुष्यात प्रगतीचे नवे दरवाजे उघडणार आहे.

या शुभ राजयोगाचा सर्वाधिक फायदा मिथुन राशीच्या जातकांना होताना दिसेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींच्या उत्पन्नात (Income) मोठी वाढ होण्याची शक्यता असली, तरी खर्चावर नियंत्रण ठेवण्याचे आव्हान तुमच्यासमोर असेल. ज्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे, त्यांना या काळात अपेक्षेपेक्षा कितीतरी पटीने जास्त नफा मिळू शकतो, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती अधिक मजबूत होईल. यासोबतच तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक संबंधांमध्ये उत्तम समन्वय पाहायला मिळेल, ज्यामुळे मन प्रसन्न राहील.

दुसरीकडे, वृश्चिक राशीच्या लोकांसाठी देखील आगामी 25 दिवस भाग्योदयाचे ठरणार आहेत. व्यापाऱ्यांच्या नफ्यात वाढ होईलच, पण नोकरी करणाऱ्यांना वेतनवाढीची गोड बातमी मिळण्याची दाट शक्यता आहे. विशेष म्हणजे या काळात तुम्ही स्वतःच्या नावाने मालमत्ता किंवा संपत्ती खरेदी करु शकता, ज्याचा फायदा तुम्हाला भविष्यात दीर्घकाळ मिळत राहील. तुमच्या मान-सन्मानात भर पडल्याने हा काळ तुमच्यासाठी अविस्मरणीय ठरेल.

मकर राशीच्या जातकांसाठी लक्ष्मी नारायण राजयोग एखाद्या वरदानापेक्षा कमी नसेल. या काळात तुमचे अनावश्यक खर्च मर्यादित होतील आणि जुन्या गुंतवणुकीतून अचानक नफा मिळण्यास सुरुवात होईल. बऱ्याच काळापासून रखडलेली तुमची कामे या 25 दिवसांत गतीने पूर्ण होताना दिसतील, ज्यामुळे तुमच्यावरील कामाचा ताण कमी होईल. कौटुंबिक आणि प्रेमसंबंधांच्या बाबतीतही हा काळ सुखद असेल; नात्यांमधील जुने मतभेद मिटून पुन्हा एकदा जवळीक निर्माण होईल.

एकंदरीत, कुंभ राशीत तयार होणारा हा बुध-शुक्राचा संयोग या तीन राशींसाठी समृद्धी, धनलाभ आणि मानसिक समाधान घेऊन येणार आहे. या काळातील सकारात्मक ऊर्जेचा वापर करून नवीन योजनांवर काम करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

Europe Heatwave: युरोपमध्ये भीषण उष्णतेचा कहर! फ्रान्समध्ये 1000 हून अधिक मृत्यू; 'ग्लोबल वॉर्मिंग'मुळे परिस्थिती गंभीर

SCROLL FOR NEXT