Krishna Janmashtami 2025 astrology Dainik Gomantak
Horoscope

Horoscope: कृष्ण जन्माष्टमीला गजकेसरी योग! 'या' 3 राशींना नशिबाची साथ; मिळेल आर्थिक लाभ

lucky zodiac signs Janmashtami: हर्षण योग, त्रिपुष्कर योग आणि रोहिणी नक्षत्राचाही शुभ संयोग जुळून येत असल्याने हा दिवस अधिक फलदायी ठरेल

Akshata Chhatre

Krishna Janmashtami horoscope: सध्या सगळीकडे कृष्णजन्माष्टमीचा पवित्र सण साजरा केला जात आहे. या दिवशी चंद्राचे वृषभ राशीत आगमन होत असून, याच ठिकाणी आधीपासून गुरू ग्रह विराजमान आहे. या शुभ संयोगामुळे ‘गजकेसरी योग’ तयार होत आहे. याशिवाय, हर्षण योग, त्रिपुष्कर योग आणि रोहिणी नक्षत्राचाही शुभ संयोग जुळून येत असल्याने हा दिवस अधिक फलदायी ठरेल. या ग्रहस्थितीमुळे काही राशींच्या व्यक्तींवर परिणाम होणार आहे.

सिंह रास

सिंह राशीच्या लोकांसाठी हा दिवस मध्यम फलदायी असेल. कोणतेही महत्त्वाचे काम करायचे असल्यास, घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींचा किंवा आईचा सल्ला घेणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. तुम्ही केलेल्या मेहनतीला आज यश मिळेल आणि समाजात तुमची जबाबदारी वाढेल. ज्या मित्रांनी तुम्हाला मदत केली आहे, त्यांच्या मदतीसाठी तुम्हीही पुढे याल. व्यापारात काही संधी हातून निसटण्याची शक्यता आहे, पण तुमच्या समाधानी स्वभावामुळे तुम्ही निराश होणार नाही. संध्याकाळचा वेळ धार्मिक कार्यात जाईल.

कन्या रास

कन्या राशीच्या व्यक्तींसाठी कृष्णजन्माष्टमीचा दिवस अत्यंत शुभ राहील. कुटुंबात सुरू असलेला कोणताही तणाव आज दूर होईल आणि तुम्हाला धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. मुलांची प्रगती पाहून तुम्हाला आनंद होईल, मात्र आईच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. आज तुम्ही दिवसभर आनंदी आणि उत्साही असाल. नोकरदार व्यक्तींना त्यांच्या वरिष्ठांचे सहकार्य मिळेल आणि दुसऱ्या कंपनीकडून चांगला 'जॉब ऑफर' मिळण्याची शक्यता आहे. संध्याकाळचा वेळ धार्मिक कार्यात व्यतीत होईल.

वृश्चिक रास

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी सोमवारचा दिवस लाभदायक असेल. एखाद्या सरकारी संस्थेकडून तुम्हाला दीर्घकाळ फायदा होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांसोबत तुमचे संबंध चांगले राहतील, ज्यामुळे तुमचा प्रभाव वाढेल. लेखन आणि कला क्षेत्राशी संबंधित लोकांना आपली प्रतिभा दाखवण्याची संधी मिळेल. मुलांकडून चांगली बातमी ऐकायला मिळू शकते आणि कुटुंबाशी संबंधित एखादे महत्त्वाचे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. व्यापाऱ्यांना चांगला फायदा होईल आणि गुंतवणुकीतूनही लाभ मिळेल. सायंकाळी तुम्ही मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल.

याव्यतिरिक्त इतर राशींसाठी...

वृषभ राशीच्या व्यक्तींना भविष्यातील खर्चाची चिंता सतावू शकते, त्यामुळे आज त्यांनी आर्थिक बाबतीत अधिक सावधगिरी बाळगावी. एकूणच, आजचा दिवस मेहनत, संयम आणि योग्य नियोजनाने चांगला घालवल्यास तुम्हाला यश मिळेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mhadei River: कर्नाटकचे पितळ उघडे! खोट्या माहितीद्वारे घेतले जागतिक बँकेचे कर्ज! 'म्‍हादई'प्रश्‍नी गोवा सरकार देणार पुरावे

Mhaje Ghar: एक कार्यक्रम, 173 बैठका! ‘माझे घर’साठी भाजपने केले सूक्ष्म नियोजन; लाभार्थ्यांपर्यंत अर्जांसह पोहोचणार कार्यकर्ते

Horoscope: आत्मविश्वास उंचावेल,नात्यांमध्ये विश्वास वाढेल; 'या' राशींसाठी आजचा दिवस लाभदायक

India vs Pakistan: पाकिस्तान पुन्हा फेल! टीम इंडियानं 88 धावांनी चारली पराभवाची धूळ, दीप्ती-क्रांतीची भेदक गोलंदाजी

LIVE सामन्यात भयंकर राडा; भारताच्या खेळाडूंमध्ये 'तू तू- मै मै', एकमेकांच्या अंगावर धावून गेले; अंपायर नसता तर... Watch Video

SCROLL FOR NEXT