Ketu Gochar 2026 Dainik Gomantak
Horoscope

Ketu Gochar 2026: केतुने बदलली चाल अन् 3 राशींच्या नशीबाने घेतला 'यू-टर्न'! ऑफिसमधील कामाचे क्रेडिट चमच्यांना मिळणार; करिअरची गाडीही पंक्चर होणार

Ketu Transit Magha Nakshatra 2026: ज्योतिषशास्त्रात सावली ग्रह मानला जाणारा 'केतु' हा अध्यात्म, मोक्ष आणि अचानक घडणाऱ्या घटनांचा कारक मानला जातो.

Manish Jadhav

Ketu Transit Magha Nakshatra 2026: ज्योतिषशास्त्रात सावली ग्रह मानला जाणारा 'केतु' हा अध्यात्म, मोक्ष आणि अचानक घडणाऱ्या घटनांचा कारक मानला जातो. केतुच्या चालीमधील कोणताही बदल सर्व राशींच्या जीवनावर मोठा प्रभाव पाडतो. आता 29 मे 2026, शुक्रवार रोजी केतु ग्रह मघा नक्षत्राच्या तिसऱ्या चरणात (पद) प्रवेश करणार आहे. केतुचे हे गोचर सकाळी 10 वाजून 16 मिनिटांनी होणार आहे. ज्योतिषीय गणनेनुसार, केतुचा मघा नक्षत्राच्या तिसऱ्या चरणातील हा प्रवेश काही राशींसाठी आव्हानात्मक ठरणार असून, त्यांना आर्थिक आणि मानसिक नुकसानीचा सामना करावा लागू शकतो.

बुद्धी आणि व्यापारावर होणार परिणाम

केतु ग्रह मघा नक्षत्राच्या तिसऱ्या चरणात 30 जून 2026 पर्यंत राहील आणि त्यानंतर तो दुसऱ्या चरणात प्रवेश करेल. विशेष म्हणजे, केतु ग्रह नेहमी उलटी म्हणजेच वक्री चाल चालतो. ज्योतिषशास्त्रानुसार, मघा नक्षत्राच्या या चरणाचा स्वामी 'बुध' ग्रह मानला जातो. बुध हा बुद्धी, संवाद आणि व्यापाराचा कारक ग्रह आहे. त्यामुळे बुध ग्रहाच्या नक्षत्रात केतुचे आगमन झाल्यामुळे लोकांच्या बुद्धीवर आणि व्यापार क्षेत्रावर याचा थेट परिणाम पाहायला मिळणार आहे. चला तर मग या काळात कोणत्या राशींच्या अडचणी वाढू शकतात, ते जाणून घेऊया.

मिथुन राशीच्या कामात अडथळे

केतुच्या या गोचरामुळे मिथुन राशीच्या व्यक्तींना आगामी काळात बऱ्याच अडचणींना तोंड द्यावे लागू शकते. या राशीच्या लोकांनी प्रत्येक पाऊल संभलून टाकण्याची गरज आहे. केतुच्या प्रभावामुळे तुमची बनलेली कामे बिघडू शकतात. नोकरी किंवा कार्यक्षेत्रात वरिष्ठांशी वाद होऊ शकतात किंवा कामाचा ताण वाढू शकतो. या काळात कोणतीही मोठी गुंतवणूक (Investment) करणे टाळावे, अन्यथा आर्थिक नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. व्यापाराशी संबंधित कोणताही मोठा निर्णय सध्या घेऊ नका.

कन्या राशीवर करिअरचा दबाव

कन्या राशीच्या लोकांसाठीही केतुचा हा नक्षत्र बदल चिंता वाढवणारा ठरेल. करिअरमध्ये अचानक कामाचा दबाव वाढल्यामुळे तुम्ही मानसिक तणावाखाली येऊ शकता. या काळात तुम्ही घेतलेल्या मेहनतीचे योग्य फळ न मिळाल्याने निराशा येऊ शकते. आरोग्याच्या (Health) बाबतीत गाफील राहू नका, जुने आजार डोके वर काढू शकतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर आंधळा विश्वास ठेवू नका, अन्यथा तुम्ही मोठ्या संकटात सापडू शकता.

मीन राशीला आर्थिक फटका बसण्याची शक्यता

मीन राशीच्या जातकांना या काळात आपल्या वाणीवर म्हणजेच बोलण्यावर विशेष नियंत्रण ठेवावे लागेल. तुमच्या कडू बोलण्यामुळे जवळचे संबंध बिघडू शकतात. व्यवसायात भागीदारीत काम करत असाल, तर कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी नीट विचार करा, नाहीतर मोठे नुकसान सहन करावे लागेल. आर्थिक आघाडीवर हा काळ चढ-उतारांचा राहील. अनावश्यक खर्च वाढल्याने बजेट कोलमडू शकते, त्यामुळे खर्चावर ताबा ठेवा आणि नाहक ताण घेणे टाळा.

एकंदरीत, 29 मे ते 30 जून 2026 या काळात केतुची ही बदललेली चाल मिथुन, कन्या आणि मीन राशीच्या लोकांसाठी परीक्षेची ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

उघड्यावर कचरा टाकल्यास 5 हजारांचा दंड, नास्नोळा पंचायत मंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय; जागरूक नागरिकांना 10 हजारांचे बक्षीस

Usgao Water Issue: उसगावात दूषित पाणीपुरवठा, दोन दिवसांत उपाययोजना न झाल्यास आंदोलनाचा इशारा

Goa Politics: आरजीपीच्या दुभंगण्याची कारणमीमांसा

VIDEO: 'चीअर्स'...! ट्रम्प साहेब, अमेरिकेत चहा आणि चीनमध्ये शॅम्पेन? जिनपिंगसोबतच्या शाही मेजवाणीतील व्हिडिओ व्हायरल; सोशल मीडियावर उलटसुलट चर्चांना उधाण

Arambol Theft: हरमल परिसरातील चोरी प्रकरणाचा तपास ठप्प, सीसीटीव्ही पुरावे मिळूनही तपास मंदावला

SCROLL FOR NEXT