zodiac signs financial loss Dainik Gomantak
Horoscope

Horoscope: पैशांची हानी, आरोग्याचा त्रास; 'विष योगा'मुळे 'या' 3 राशींनी काळजी घेण्याची गरज

Vish Yog horoscope: या ग्रह गोचरामुळे अनेक शुभ-अशुभ योग तयार होतात, जे मानवी जीवनावर थेट परिणाम करतात

Akshata Chhatre

Vish Yog 2025 effects: ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह ठरावीक कालावधीनंतर आपले स्थान बदलतात. या ग्रह गोचरामुळे अनेक शुभ-अशुभ योग तयार होतात, जे मानवी जीवनावर थेट परिणाम करतात. असाच एक महत्त्वाचा आणि अशुभ योग म्हणजे 'विष योग', जो शनि आणि चंद्र यांच्या युतीमुळे तयार होतो. १२ ऑगस्ट रोजी हा योग मीन राशीत तयार होणार असून, यामुळे काही राशींच्या व्यक्तींनी सावध राहणे गरजेचे आहे.

मीन राशीत 'विष योगा'ची निर्मिती

सध्या न्यायदेवता शनि मीन राशीत विराजमान आहे. १२ ऑगस्ट रोजी चंद्रही याच राशीत प्रवेश करेल, ज्यामुळे शनि आणि चंद्र यांची युती होईल. ज्योतिषशास्त्रात या युतीला 'विष योग' म्हणून ओळखले जाते. हा योग दुर्मिळ मानला जातो आणि त्याचा परिणाम काही राशींच्या व्यक्तींवर धनहानी, मानसिक ताण आणि आरोग्याच्या समस्यांच्या रूपात दिसून येऊ शकतो.

या राशींच्या व्यक्तींनी सावध राहावे

मेष (Aries): तुमच्या राशीच्या बाराव्या घरात हा योग तयार होत असल्याने मेष राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ आव्हानात्मक असू शकतो. अनावश्यक खर्च वाढल्यामुळे आर्थिक बजेट बिघडण्याची शक्यता आहे. भाग्याची साथ कमी मिळेल. व्यावसायिक भागीदारीत नुकसान होण्याची शक्यता आहे, त्यामुळे कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्या. कामाच्या ठिकाणी निष्काळजीपणा टाळा. आरोग्याची काळजी घ्या आणि कोणालाही उधार देणे टाळा.

सिंह (Leo): सिंह राशीसाठी आठव्या भावात विष योग तयार होत असल्यामुळे अचानक अडचणी येऊ शकतात. जुने किंवा गुप्त आजार डोके वर काढण्याची शक्यता आहे. नोकरदार वर्गाला कामात अडथळे आणि कामाच्या ठिकाणी तणाव जाणवू शकतो. भागीदारीतील कामात नुकसानीचा धोका आहे. मानसिक तणाव वाढू शकतो, त्यामुळे शांत राहण्याचा प्रयत्न करा.

मीन (Pisces): मीन राशीच्या व्यक्तींसाठी हा योग थेट लग्न भावात तयार होत असल्यामुळे जीवनाच्या अनेक क्षेत्रांमध्ये तणाव निर्माण होऊ शकतो. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांशी किंवा सहकाऱ्यांशी मतभेद होऊ शकतात. वैवाहिक जीवनात वाद टाळणे आवश्यक आहे, अन्यथा नात्यात दुरावा निर्माण होईल. आरोग्याच्या बाबतीत विशेष काळजी घ्या, जुने आजार पुन्हा त्रास देऊ शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

GST Collection: गोव्यात पाच महिन्यांत 1,143 कोटींचा जीएसटी जमा; 20,960 सक्रिय करदाते, कॅसिनोंबाबतही मोठी स्पष्टता

Team India ODI Series: 2027 वनडे वर्ल्ड कपआधी टीम इंडियाची अग्निपरीक्षा! न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिकेसह 'या' संघांविरुद्ध होणार सामने; पाहा संपूर्ण वेळापत्रक

Goa Wildlife: गोव्याचा 'गवा' राज्य प्राणी का? जंगलतोड, काजू बागायती अन् पाण्याच्या शोधात वाढतोय मानव-गवा संघर्ष

Wildlife Conservation: गोव्याच्या जंगलात दुर्मिळ जीवांचे अस्तित्व धोक्यात; वन्यजीव सप्ताहात अधिवास वाचवण्याचा संदेश

VIDEO: रक्ताने माखलेला गणवेश आणि गुडघ्यावर बसलेला हल्लेखोर! कॉकपिटच्या आत नक्की काय घडलं? फ्लाय दुबईच्या विमानातील नवा व्हिडिओ आला समोर

SCROLL FOR NEXT