Horoscope Today August 4, 2026 Dainik Gomantak
Horoscope

Horoscope: मंगळवारी कर्क, सिंहसह 'या' 4 राशींना धनलाभाचे प्रबळ संकेत; मंगळागौरीच्या दिवशी शुभ योगांचा विशेष प्रभाव

Horoscope Today August 4, 2026: आज श्रावण कृष्ण पक्षातील षष्ठी तिथी असून मंगळवारचा दिवस धार्मिकदृष्ट्या विशेष मानला जातो.

Sameer Amunekar

आज श्रावण कृष्ण पक्षातील षष्ठी तिथी असून मंगळवारचा दिवस धार्मिकदृष्ट्या विशेष मानला जातो. आज मंगळागौरी व्रत असल्याने विवाहित महिलांसाठी हा दिवस महत्त्वाचा आहे. अखंड सौभाग्य, सुखी वैवाहिक जीवन आणि कुटुंबातील आनंदासाठी हे व्रत श्रद्धेने पाळले जाते. याशिवाय धृती योग आणि रेवती नक्षत्राचा प्रभावही दिवसाला अधिक शुभ बनवत आहे. या ग्रहयोगांचा परिणाम सर्व १२ राशींवर होणार असला तरी कर्क, सिंह, मकर आणि कुंभ राशीच्या व्यक्तींना आर्थिक लाभ, करिअरमध्ये प्रगती आणि नवीन संधी मिळण्याचे संकेत आहेत.

मेष ते मिथुन: नियोजनाला मिळेल यश

मेष: रखडलेली मालमत्तेशी संबंधित कामे मार्गी लागू शकतात. नियोजन गुप्त ठेवून काम केल्यास अपेक्षित यश मिळेल. कौटुंबिक वातावरण उत्साहवर्धक राहील.

वृषभ: मेहनतीचे फळ मिळण्याचा दिवस आहे. मालमत्तेच्या व्यवहारातून फायदा होऊ शकतो. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत यश मिळण्याची शक्यता आहे.

मिथुन: अनेक दिवसांपासून असलेला संभ्रम दूर होईल. अपूर्ण कामे पूर्ण होतील. खर्च वाढू शकतो, त्यामुळे आर्थिक नियोजन महत्त्वाचे ठरेल.

कर्क आणि सिंह राशींसाठी आर्थिक प्रगतीचे संकेत

कर्क: व्यवसायात नवीन संधी मिळू शकतात. नवीन कामाची सुरुवात फायदेशीर ठरेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील.

सिंह: बँकिंग, वित्त आणि प्रशासकीय क्षेत्रातील व्यक्तींना पदोन्नतीची संधी मिळू शकते. आर्थिक प्रगतीसाठी नवे विचार सुचतील. मित्रांची योग्य वेळी मदत लाभेल.

कन्या ते वृश्चिक: संयम आणि योग्य निर्णय गरजेचा

कन्या: प्रवासातून लाभ होण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या. व्यवसाय विस्तारासाठी नवे नियोजन करता येईल.

तुळ: अध्यात्माकडे ओढ वाढेल. अनुभवी व्यक्तींच्या मार्गदर्शनाचा फायदा होईल. व्यवसायात कुटुंबाचा सल्ला उपयोगी पडेल.

वृश्चिक: व्यवसाय विस्तारासाठी दिवस अनुकूल आहे. जुन्या अडचणी दूर होतील. पर्यटन क्षेत्राशी संबंधित व्यक्तींना आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.

धनु, मकर, कुंभ आणि मीन राशींसाठी कसा असेल दिवस?

धनु: आरोग्यात सुधारणा होईल. समाजोपयोगी कार्यात सहभागी झाल्याने मानसिक समाधान मिळेल.

मकर: व्यापाऱ्यांसाठी दिवस लाभदायक आहे. भागीदारीतून मोठा आर्थिक फायदा होऊ शकतो. करिअरमध्ये प्रगतीचे नवे मार्ग खुलतील.

कुंभ: अचानक धनलाभाचा योग आहे. नोकरीत वरिष्ठांकडून कौतुक मिळू शकते. मालमत्तेशी संबंधित कामे मार्गी लागू शकतात.

मीन: आत्मविश्वास वाढेल. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेशी संबंधित आनंदाची बातमी मिळू शकते. कुटुंबीयांच्या सहकार्यामुळे रखडलेली कामे पूर्ण होतील.

आजचा दिवस विशेषतः आर्थिक नियोजन, करिअरमधील निर्णय आणि कुटुंबीयांशी संवाद यासाठी अनुकूल मानला जात आहे. कोणतीही मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी योग्य सल्ला घ्या. राशिभविष्य हे ज्योतिषशास्त्रीय संकेतांवर आधारित असून त्याकडे मार्गदर्शन म्हणून पाहावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Waste Management: कचरा व्यवस्थापनाचे नियम पाळा, अन्यथा कारवाईची शक्यता; 385 घटकांवर प्रशासनाची नजर

Morjim School Repair News: महिना उलटूनही शाळेची दुरुस्ती रखडली; अंगणवाडी स्टेजवर, बालहक्क आयोगाची नाराजी

Morjim Beach Safety: मोरजी बीचवर गुरांचे कळप, भटक्या श्वानांचा उपद्रव; पर्यटन हंगामात पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न!

Ranji Trophy: गोव्याची फलंदाजी ठरतेय डोकेदुखी; विदर्भाविरुद्ध पराभवांची मालिका खंडित करण्याचे आव्हान

Rohit Sharma Dance Video: 'ले गई, ले गई' गाण्यावर रोहित शर्मानं धरला ठेका! करिश्मा कपूरसोबतचा डान्स व्हिडीओ व्हायरल; हिटमॅन म्हणाला, 'मजा आ गया'

SCROLL FOR NEXT