Daily Rashi Bhavishya  Dainik Gomantak
Horoscope

Horoscope: नोकरीत प्रगतीची शक्यता, घरात शुभकार्य; प्रिय व्यक्तीकडून आनंददायी बातमी मिळणार

Daily Horoscope 15 October 2025: जाणून घ्या तुमच्या राशीचे भविष्य १५ ऑक्टोबर २०२५

Akshata Chhatre

मेष
आज कामात प्रगती होईल. वरिष्ठांचा पाठिंबा लाभेल आणि नवी जबाबदारी मिळू शकते. आर्थिक स्थिती सुधारेल. आरोग्य चांगले राहील आणि मन प्रसन्न राहील.

वृषभ
आज थोडा भावनिक ताण जाणवेल, पण दुपारनंतर परिस्थिती सुधारेल. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल. खर्च वाढू शकतो. कामात संयम ठेवा.

मिथुन
आजचा दिवस तुमच्या कल्पकतेसाठी अनुकूल आहे. व्यवसायात नवे करार होतील. प्रवास लाभदायक ठरेल. कुटुंबात आनंददायी वातावरण राहील.

कर्क
आज तुमच्या मेहनतीला यश मिळेल. नोकरीत प्रगतीची शक्यता आहे. कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण होतील. आर्थिक लाभाचा योग आहे.

सिंह
आज तुमचा आत्मविश्वास वाढेल. नवे प्रकल्प सुरू करण्यासाठी उत्तम वेळ आहे. वरिष्ठांचा सल्ला घ्या. कुटुंबात एखादी शुभ बातमी मिळेल.

कन्या
आजच्या दिवशी आर्थिकदृष्ट्या फायदा होईल. अडकलेले काम पूर्ण होईल. मित्रांची मदत मिळेल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.

तूळ
आज मानसिक शांतीसाठी प्रवासाची इच्छा होईल. जोडीदारासोबत मतभेद दूर होतील. कामात नवीन कल्पना यशस्वी ठरतील. दुपारनंतर आर्थिक लाभ होईल.

वृश्चिक
आजचा दिवस संघर्षमय पण फलदायी राहील. नोकरीतील बदलाचा विचार करू शकता. आरोग्याच्या बाबतीत दक्ष राहा. संयम ठेवा, लाभ मिळेल.

धनु
आज नवे संधी मिळतील. उच्च शिक्षण किंवा परदेश प्रवासाशी संबंधित योजना पुढे सरकतील. आत्मविश्वास वाढेल. आर्थिक स्थिती मजबूत राहील.

मकर
आज घरात शुभकार्याची शक्यता आहे. वरिष्ठांकडून कौतुक मिळेल. व्यवसायात नफा होईल. आरोग्य उत्तम राहील आणि मन शांत राहील.

कुंभ
आज तुमच्या निर्णयक्षमतेची परीक्षा होईल. नोकरीत बदल होऊ शकतो. प्रवास योग शुभ आहे. कुटुंबात आनंद वाढेल.

मीन
आज तुमच्यासाठी आर्थिक लाभाचा दिवस आहे. नवे कार्य सुरू करण्यासाठी उत्तम वेळ आहे. प्रिय व्यक्तीकडून आनंददायी बातमी मिळेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: 13 वर्षीय मुलीने गळफास घेत संपवलं जीवन, वडिलांचा शाळेतील विद्यार्थ्यावर गंभीर आरोप; वाचा संपूर्ण प्रकरण

'मृतदेह घरी पोहोचवा, क्लब मालकांकडून आर्थिक मदत मिळवून द्या', मृतांच्या मित्रांचा एल्गार

"मैं नहीं खाउंगा, मोटा हो जाउंगा" जयस्वाल केक घेऊन आला, पण 'हिटमॅन'ने दिला नकार Watch Video

Goa Politics:"सकाळी येतो सांगून तुकाराम आलाच नाही!", RGP प्रमुखांनी काँग्रेसला पुन्हा टाळले? युतीचा 'सस्पेन्स' वाढला

Goa Nightclub Fire: हडफडे नाईट क्लब दुर्घटनेप्रकरणी मोठी कारवाई: चार व्यवस्थापक अटकेत, मालकाचीही चौकशी होणार

SCROLL FOR NEXT