Horoscope April 2026 Dainik Gomantak
Horoscope

Horoscope April 2026: एप्रिल महिना ठरणार भाग्याचा! 'या' राशीच्या लोकांच्या जीवनात येणार सुखाचे दिवस; नात्यांना मिळणार नवी झळाळी

Gemini Horoscope April 2026 Prediction: ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून एप्रिल हा महिना मिथुन राशीच्या जातकांसाठी संमिश्र फलांचा ठरणार आहे.

Manish Jadhav

Horoscope April 2026: ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून एप्रिल हा महिना मिथुन राशीच्या जातकांसाठी संमिश्र फलांचा ठरणार आहे. विशेषतः कौटुंबिक आघाडीवर हा महिना सुखद आणि शांततेचा असला, तरी ग्रहांची बदलती चाल शारीरिक आरोग्यासाठी आणि मानसिक स्थितीसाठी काही अंशी आव्हानात्मक ठरु शकते. मिथुन राशीच्या कुंडलीचा विचार करता, कौटुंबिक सुख आणि संपत्तीच्या दुसऱ्या भावात कोणत्याही पापी ग्रहाचा प्रभाव नसल्यामुळे घरात कोणतीही मोठी समस्या उद्भवणार नाही.

नातेसंबंधांमध्ये एक प्रकारचा समतोल पाहायला मिळेल आणि कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य तुम्हाला लाभेल. असे असले तरी, राशीचा स्वामी असलेल्या बुध ग्रहाच्या विशिष्ट स्थितीमुळे किरकोळ कुरबुरी किंवा संवादात अडथळे येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

एप्रिल महिन्यात मिथुन राशीच्या जातकांना शनी आणि मंगळ या दोन क्रूर ग्रहांच्या युतीपासून अधिक सावध राहण्याची गरज आहे. या दोन ग्रहांच्या प्रभावामुळे घरातील वातावरणात काही काळासाठी तणाव निर्माण होऊ शकतो. विनाकारण चिडचिड होणे किंवा किरकोळ कारणावरून घरात वादाची ठिणगी पडणे असे प्रकार घडू शकतात. मात्र, दुसरीकडे देवगुरु बृहस्पतीचा (गुरु) मिथुन राशीवर अत्यंत शुभ प्रभाव राहणार आहे.

गुरुच्या या सकारात्मक आशीर्वादामुळे तुमचे वैवाहिक जीवन अत्यंत सुखमय आणि आनंदी असेल. पती-पत्नीमधील नाते अधिक दृढ होईल आणि एकमेकांप्रती असलेला विश्वास वाढेल. जे तरुण अविवाहित आहेत आणि लग्नासाठी इच्छुक आहेत, त्यांच्यासाठी एप्रिल महिना नशिबाची दारे उघडणारा ठरेल. या काळात विवाहासाठी चांगले आणि अपेक्षित स्थळ चालून येण्याचे योग प्रबळ आहेत.

आरोग्याच्या दृष्टीने विचार केला तर, मिथुन राशीच्या लोकांसाठी हा काळ 'सरासरी' स्वरुपाचा असेल. लग्नेश बुध तुम्हाला आरोग्याच्या बाबतीत फार मोठी साथ देईलच असे नाही, मात्र मोठी समस्याही उद्भवणार नाही. एप्रिलच्या मध्यावधीत मंगळ आणि शनीची युती तुम्हाला शारीरिकदृष्ट्या थकवून टाकू शकते. या ग्रहांच्या योगामुळे शरीरात अशक्तपणा जाणवणे, लवकर थकवा येणे किंवा उत्साह कमी होणे अशा तक्रारी जाणवू शकतात.

मानसिक तणावाचा परिणाम शारीरिक क्षमतेवर होण्याची शक्यता असल्याने, या काळात कामाचा अतिव्याप टाळणे हिताचे ठरेल. बुध ग्रहाच्या प्रभावामुळे तुम्हाला अपेक्षित असलेले यश काहीसे उशिराने मिळेल, परंतु संयम ठेवल्यास सरासरी निकाल तुमच्या बाजूने लागतील. दिग्भ्रमित न होता, गुरुच्या मार्गदर्शनाखाली आणि संयमी भूमिकेतून हा महिना व्यतीत केल्यास मिथुन राशीच्या व्यक्तींना प्रगती साधता येईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Highway: जमिनी गेल्या, रस्ताही अडला; उगवेकरांचा संताप, एनएच 66 मुळे दैनंदिन जीवन विस्कळीत; मोबदल्याची अद्याप प्रतीक्षा

Bicholim Hit And Run Case: सुरक्षेचा 'तिसरा डोळा' ठरला कर्दनकाळ; अपघातानंतर पळणाऱ्या चालकाच्या मुसक्या आवळल्या, डिचोली पोलिसांची कारवाई

"वाघांचे मृत्यू अन् वन विभागाचे अपयश"; पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर यांचा थेट प्रहार!

Goa Crime: काकाची हत्या करून मावशीकडे घेतला आश्रय! बोरी येथील दीपक नाईक हत्या प्रकरणातील संशयित नराधम पोलिसांच्या तावडीत

Goa Accident: अटल सेतूवर विचित्र अपघात! 1 नाही, 2 नाही... 7 गाड्या एकमेकांना धडकल्या, वाहतूक विस्कळीत; Watch Video

SCROLL FOR NEXT