Surya Grahan 2026 Dainik Gomantak
Horoscope

Surya Grahan 2026: वर्षाचं पहिलं सूर्यग्रहण 'या' दिवशी! 17 फेब्रुवारीला दिसणार 'रिंग ऑफ फायर'; जाणून घ्या ग्रहणाची वेळ, सूतक काळ अन् तुमच्या राशीवर होणारा परिणाम

Surya Grahan 2026: यंदाच्या (2026) वर्षातील खगोलशास्त्रीय घडामोडींची सुरुवात एका मोठ्या घटनेने होणार असून वर्षातील पहिले सूर्यग्रहण 17 फेब्रुवारी रोजी लागणार आहे.

Manish Jadhav

Surya Grahan 2026 : यंदाच्या (2026) वर्षातील खगोलशास्त्रीय घडामोडींची सुरुवात एका मोठ्या घटनेने होणार असून वर्षातील पहिले सूर्यग्रहण 17 फेब्रुवारी रोजी लागणार आहे. हे एक 'कंकणाकृती' सूर्यग्रहण असेल, जे फाल्गुन अमावस्येला मंगळवारी अनुभवता येईल. विज्ञानाच्या दृष्टीने पाहिल्यास, जेव्हा सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये चंद्र येतो आणि त्याची सावली पृथ्वीवर पडते, तेव्हा सूर्यग्रहण घडते. मात्र, ज्योतिष शास्त्रानुसार या घटनेला विशेष महत्त्व आहे कारण यावेळी सूर्य कुंभ राशीत गोचर करत असून तिथे आधीच राहूचे वास्तव्य आहे.

सूर्य आणि राहूची ही युती कुंभ राशीत होत असल्याने हे ग्रहण ज्योतिषीय दृष्टिकोनातून अत्यंत संवेदनशील आणि प्रतिकूल परिणाम देणारे मानले जात आहे. विशेष म्हणजे, हे ग्रहण भारतात दिसणार नाही, त्यामुळे भारतीयांना या ग्रहणाचे कडक नियम किंवा सूतक काळ पाळण्याची तांत्रिक गरज भासणार नाही.

या ग्रहणाची वेळ भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 3 वाजून 26 मिनिटांनी सुरु होईल आणि संध्याकाळी 7 वाजून 57 मिनिटांपर्यंत चालेल. ग्रहणाचा सूतक काळ हा मुख्य घटनेच्या 12 तास आधी सुरु होत असतो, जो मध्यरात्री 3 वाजून 26 मिनिटांनी सुरु होईल. जरी हे ग्रहण भारतात दिसणार नसले, तरी दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे, टांझानिया, नामिबिया, मॉरिशस आणि अंटार्क्टिका यांसारख्या प्रदेशांमध्ये ते पूर्णपणे दृश्यमान असेल. ज्या देशांमध्ये ग्रहण दिसते, तिथेच त्याचा प्रभाव अधिक प्रमाणात जाणवतो. तरीही, अनेकांना ग्रहणाच्या काळातील पथ्ये पाळण्याची इच्छा असते.

परंपरेनुसार, ग्रहण काळात मंदिरे बंद ठेवली जातात आणि घरामध्ये मूर्ती पूजा करणे टाळून केवळ मानसिक जप किंवा ईश्वराचे स्मरण करण्यास प्राधान्य दिले जाते.

धार्मिक समजुतीनुसार, ग्रहण काळात कोणतेही मंगल कार्य जसे की लग्न, मुंज किंवा नवीन घराची पूजा करु नये. तसेच, अन्नावर ग्रहणाचे अशुभ परिणाम होऊ नयेत म्हणून शिजवलेल्या अन्नामध्ये तुळशीची पाने टाकून ठेवण्याची पद्धत आहे. ग्रहण काळात शक्यतो भोजन करणे टाळावे, मात्र गर्भवती स्त्रिया, लहान मुले आणि वृद्ध व्यक्तींना आरोग्याच्या कारणास्तव सवलत दिली जाते. ग्रहण संपल्यानंतर स्वच्छ स्नान करुन घरामध्ये गंगाजल शिंपडणे शुद्धीकरणाचे लक्षण मानले जाते. याशिवाय, सूर्यग्रहणानंतर गरजूंना दानधर्म करणे हे दोषांचे निवारण करण्यासाठी अत्यंत फलदायी ठरते, असे मानले जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT