Horoscope | Rashi Bhavishya Dainik Gomantak
Horoscope

Weekly Horoscope: डबल राजयोग! 'या' 5 राशींचे बदलणार भाग्य; हा आठवडा ठरणार खास, कसा ते वाचा..

Weekly Horoscope 23 To 29 March: मार्चच्या या आठवड्यात ग्रहस्थिती अत्यंत विशेष मानली जात आहे. कारण या काळात डबल राजयोग तयार होत असून त्याचा प्रभाव अनेक राशींवर सकारात्मक दिसणार आहे.

Sameer Panditrao

मार्चच्या या आठवड्यात ग्रहस्थिती अत्यंत विशेष मानली जात आहे. कारण या काळात डबल राजयोग तयार होत असून त्याचा प्रभाव अनेक राशींवर सकारात्मक दिसणार आहे. आठवड्याच्या सुरुवातीलाच शुक्र आपल्या उच्च राशी मीनमध्ये प्रवेश करून मालव्य राजयोग निर्माण करतो. त्यानंतर आठवड्याच्या मध्यात चंद्र मिथुन राशीत जाऊन गुरुशी युती करतो आणि त्यामुळे गजकेसरी राजयोग तयार होतो.

🦁 सिंह राशी

सिंह राशीच्या व्यक्तींना हा आठवडा अनुकूल ठरेल. आर्थिक लाभाचे योग आहेत. गुंतवणूक करताना विचारपूर्वक निर्णय घेतल्यास फायदा होईल. कुटुंबातील नातेसंबंध अधिक घट्ट होतील आणि प्रवासातून आनंद मिळेल.

🦂 वृश्चिक राशी

वृश्चिक राशीसाठी हा आठवडा कामकाजात यश देणारा आहे. प्रवासातून नवीन संधी मिळू शकतात. गुंतवणुकीत बदल दिसू शकतो. प्रेमसंबंध अधिक मजबूत होतील. आठवड्याच्या शेवटी काही आव्हाने येऊ शकतात, पण तुम्ही ती धैर्याने पार कराल.

🔥 मेष राशी

या आठवड्यात मेष राशीच्या लोकांसाठी करिअरमध्ये प्रगतीची उत्तम संधी आहे. नवीन प्रोजेक्ट्समध्ये यश मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत राहील आणि कुटुंबीयांचे सहकार्य लाभेल. मात्र बदलत्या हवामानामुळे आरोग्याची थोडी काळजी घ्यावी.

💰 मिथुन राशी

मिथुन राशीसाठी हा आठवडा प्रगतीचा ठरणार आहे. कामे वेळेत पूर्ण होतील आणि आर्थिक लाभाचे संकेत आहेत. एखाद्या स्त्रीच्या मदतीमुळे प्रेमजीवनात आनंद वाढेल. आरोग्याकडेही लक्ष द्याल आणि आठवड्याच्या शेवटी मानसिक शांतता मिळेल.

🏹 धनु राशी

धनु राशीच्या लोकांसाठी हा आठवडा नवीन संधी घेऊन येईल. कामाच्या ठिकाणी ओळख निर्माण होईल आणि यश मिळेल. प्रेमजीवनात गोडवा वाढेल. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील आणि आयुष्यात नवीन सुरुवात होण्याचे संकेत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nanoda Road Issue: नानोडा रस्ता वाहतुकीस धोकादायक, खोदून ठेवलेला मातीचा भराव ठरतो अपघातास कारण

Goa River Pollution: अस्नोड्यातील जीवनदायिनी 'पार' नदीचे अस्तित्व संकटात: नदीत जलपर्णीचे आक्रमण, प्लास्टिक कचऱ्यांचे ग्रहण

Goa Beach: पर्यटकांच्या जिवाशी खेळ! गोव्याच्या बीचवर काचेच्या तुकड्यांचा विळखा; प्रसिद्ध यूट्यूबरनं उघड केलं विदारक वास्तव

Goa Accidents: दक्षिणेतील अपघाती मृत्यूत 84 टक्के घट; वाहतूक विभाग उपअधीक्षक प्रभुदेसाई यांची माहिती

Gajalakshmi Rajyog: सुखाचे दिवस सुरू! गजलक्ष्मी राजयोगामुळे 5 राशींचे नशीब चमकणार, मिळणार अमाप संपत्ती आणि मानसन्मान

SCROLL FOR NEXT