Dashank Yog Dainik Gomantak
Horoscope

Dashank Yog 2026: नशिबाची तगडी लॉटरी, गरिबी कायमची मिटणार! 'दशांक योग' पालटणार 5 राशींचं भाग्य; बुध-मंगळाचा मोठा चमत्कार

Dashank Yog In Vedic Astrology 2026: वैदिक ज्योतिषशास्त्रात काही ग्रहांची स्थिती मानवी जीवनासाठी अत्यंत भाग्यवान मानली जाते.

Manish Jadhav

Dashank Yog In Vedic Astrology 2026: वैदिक ज्योतिषशास्त्रात काही ग्रहांची स्थिती मानवी जीवनासाठी अत्यंत भाग्यवान मानली जाते. असाच एक अत्यंत शुभ आणि मोठा लाभ देणारा 'दशांक योग' लवकरच अवकाशात निर्माण होणार आहे. पंचांगानुसार, येत्या 14 ऑगस्ट रोजी बुध आणि मंगळ हे दोन्ही महत्त्वाचे ग्रह एकमेकांपासून 36 अंशांच्या अंतरावर येणार आहेत. या विशेष अंतरामुळे 'दशांक योगा'ची निर्मिती होते, जो अनेक राशींचे नशीब पालटणारा ठरेल. ज्योतिषीय गणनेनुसार, या काळात 5 राशींच्या जातकांना नशिबाची पूर्ण साथ मिळणार असून त्यांच्यावर पैशांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

या दोन्ही ग्रहांच्या अशा विशेष स्थितीमुळे अत्यंत फलदायी 'दशांक योगा'ची निर्मिती होत आहे. ज्योतिषीय विश्लेषणांनुसार, या शक्तिशाली योगाचा प्रभाव सर्वच राशींवर पडणार असला, तरी 5 विशेष राशींच्या जातकांसाठी हा काळ अत्यंत भाग्याचा आणि सुवर्णकाळ ठरणार आहे.

या भाग्यवान राशींमध्ये पहिली रास म्हणजेच मेष राशीच्या लोकांसाठी हा योग करिअरमध्ये प्रगतीच्या नव्या सुवर्णसंधी घेऊन येईल. त्यांना भूतकाळात झालेल्या चुका सुधारण्याची नामी संधी मिळेल, तसेच आरोग्याची उत्तम साथ लाभेल. मात्र, या काळात त्यांनी व्यायामावर विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. दुसरी राश असलेल्या सिंह राशीच्या व्यावसायिकांसाठी हा काळ वरदान ठरेल. त्यांना व्यवसायात नवीन भागीदार मिळतील, ज्यामुळे मोठा आर्थिक नफा होईल. कौटुंबिक जीवनात आनंद राहील आणि जुन्या आजारांपासून त्यांची कायमची सुटका होईल.

कन्या राशीच्या जातकांबद्दल बोलायचे झाले तर, कार्यक्षेत्रातील कामाचा ताण कमी होऊन त्यांना स्वतःसाठी पुरेसा वेळ काढता येईल. घरातील सदस्यांसोबतचे त्यांचे संबंध अधिक दृढ होतील. आरोग्याच्या दृष्टीने डोळ्यांशी संबंधित असलेल्या समस्या दूर होतील आणि त्यांना उत्तम, स्वादिष्ट भोजनाचा आनंद घेता येईल. चौथी भाग्यवान रास म्हणजेच धनु राशीच्या लोकांचा आत्मविश्वास कमालीचा वाढेल, ज्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वात एक वेगळीच चमक दिसेल. समाजात आणि कामाच्या ठिकाणी त्यांना विशेष मान-सन्मान मिळेल. तसेच, आर्थिक परिस्थिती मजबूत करण्यासाठी गेली अनेक महिने चालू असलेली त्यांची धडपड आता यशस्वी होऊन त्यांच्या कष्टाचे चीज होईल.

शेवटी, मीन राशीच्या लोकांसाठी हा दशांक योग व्यवसायात एखादी मोठी आणि महत्त्वाची डील फायनल करणारा ठरेल, ज्यातून त्यांना प्रचंड आर्थिक नफा मिळण्याचे स्पष्ट संकेत आहेत. या काळात त्यांना शहराबाहेर किंवा लांबच्या प्रवासाला जाण्याची उत्तम संधी मिळेल. त्यांच्या प्रेमसंबंधांमधील सर्व जुने वाद आणि तणाव दूर होऊन नातेवाईक व जोडीदारासोबतचे बिघडलेले संबंध पुन्हा पूर्ववत सुधारु लागतील. एकूणच, बुध आणि मंगळाच्या कृपेने बनणारा हा दशांक योग या पाच राशींच्या जीवनात प्रगतीची नवी पहाट घेऊन येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mitchell Starc Fight: लाईव्ह सामन्यात 'रनिंग लाईन'वरुन राडा! मिचेल स्टार्क मेहदी हसन मिराजशी भिडला; हाय-व्होल्टेज ड्रामा व्हायरल

Goa Olympic Association: 'गोवा ऑलिंपिक'ला 21 वर्षांनंतर लाभणार नवा सचिव, गुरुदत्त भक्ता यांची दोन दशकांची कारकीर्द; महत्त्वाच्या स्पर्धांचे राज्यात आयोजन

Shukra Pushkaransh Yog 2026: शुक्रदेवांची अफाट कृपादृष्टी! 15 ऑगस्टपासून 'या' राशींच्या नशिबाला मिळणार नवी दिशा; 'शुक्र पुष्करांश' योग करणार मालामाल

Calangute Dance Bar: कळंगुटमधील 'डान्स बार' बंद करा, गट काँग्रेस समितीची मागणी; पोलिसांना निवेदन सादर

Child Disappearance Goa: राज्यात पाच वर्षांत हरवली 256 मुले, 106 सापडली,150 बेपत्ता

SCROLL FOR NEXT