Horoscope 19 January 2026 Dainik Gomantak
Horoscope

Horoscope 19 January 2026: सोमवारी 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सुखाचे दिवस; मकर-मीनसाठी काळ ठरेल भाग्यवान

Lucky zodiac signs today 19 Jan: सोमवार, १९ जानेवारी २०२६ रोजी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाची प्रतिपदा तिथी असून, याच दिवसापासून 'माघ गुप्त नवरात्री'ला सुरुवात होत आहे.

Sameer Amunekar

सोमवार, १९ जानेवारी २०२६ रोजी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाची प्रतिपदा तिथी असून, याच दिवसापासून 'माघ गुप्त नवरात्री'ला सुरुवात होत आहे. ग्रहांच्या स्थितीनुसार, उद्याचा दिवस मकर आणि मीनसह पाच राशींसाठी अत्यंत लाभदायी ठरणार आहे. विशेषतः आर्थिक व्यवहार आणि आरोग्याच्या दृष्टीने हा काळ महत्त्वाचा आहे. चला तर मग, जाणून घेऊया सर्व १२ राशींचे सविस्तर भविष्य.

आर्थिक लाभाच्या आणि प्रगतीच्या राशी

मकर राशीच्या व्यक्तींना उद्या अपत्यांकडून किंवा मुलांच्या माध्यमातून आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. कुटुंबासोबत वेळ घालवल्यास जुने वाद मिटतील. मीन राशीच्या लोकांसाठी मालमत्ता (Property) खरेदी-विक्रीतून चांगला नफा मिळू शकतो.

उत्साहाने काम केल्यास मन शांत राहील. वृषभ राशीच्या लोकांना त्यांचे अडकलेले पैसे परत मिळू शकतात, ज्यामुळे त्यांची आर्थिक बाजू भक्कम होईल. प्रवासाचे योगही जुळून येत आहेत.

गुंतवणूक आणि आरोग्याबाबत सावधानता

मिथुन राशीच्या व्यक्तींनी उद्या कोणाच्याही सल्ल्याने गुंतवणूक करणे टाळावे, अन्यथा नुकसान होऊ शकते. इतरांशी बोलताना नम्रता बाळगा. वृश्चिक राशीच्या लोकांसाठी घरामध्ये तणावाचे वातावरण राहू शकते, ज्यामुळे मन अस्वस्थ होईल.

भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांनी व्यवहारात पारदर्शकता ठेवावी. कर्क राशीच्या लोकांनी वाढत्या खर्चावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. भविष्यासाठी बचत करणे हिताचे ठरेल.

करिअर आणि कौटुंबिक सुख

सिंह राशीच्या व्यक्ती स्थावर मालमत्तेत (Real Estate) गुंतवणूक करून फायदा मिळवू शकतात. नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी दिवस शुभ आहे. धनु राशीला प्रियजनांच्या सल्ल्यामुळे धनलाभ होईल.

वैवाहिक जोडीदारासोबत प्रवासाचा आनंद घेता येईल. कुंभ राशीसाठी कामाच्या ठिकाणी उर्जेने भरलेला दिवस असेल, वेळेत कामे पूर्ण होतील. मेष राशीच्या व्यक्तींचा आत्मविश्वास वाढेल आणि व्यापारात भरभराट होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

चिंता पुरेशी नाही, आता कृती हवी! 'हरित गोव्या'साठी श्री श्री रविशंकर यांचा 'इनफ इज इनफ' चळवळीला पाठिंबा

Goa Politics: 'निवृत्ती ही अफवा, पेडणेतूनच लढणारच'! माजी उपमुख्यमंत्री आजगावकरांचा निर्धार; 2027 विधानसभेसाठी ठोकला शड्डू

Margao Crime: 'चोरी नव्हे, हा तर खुनाचा प्रयत्न'! मडगाव दुर्घटनेवरून प्रभाव नायक आक्रमक; तातडीने कारवाईची केली मागणी

Goa Latest Updates: जाणून घ्या गोव्यातील घडामोडी; राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि महत्वाच्या बातम्या

Goa Opinion: गेल्या 65 वर्षांच्या गोव्याच्या बदललेल्या चित्रात गोवेकर कुठेच आढळत नाही; मग ‘अस्मिताय’, ‘अस्मिताय’ हे कशाला म्हणायचे?

SCROLL FOR NEXT