Budhaditya Rajyog in Virgo September 2026: द्रिक पंचांगानुसार, आज (17 सप्टेंबर) सकाळी 7 वाजून 58 मिनिटांनी सूर्यदेवाने सिंह राशीतून निघून कन्या राशीत प्रवेश केला. सूर्याच्या या कन्या संक्रांतीमुळे अत्यंत शक्तिशाली आणि दुर्मिळ 'बुधादित्य राजयोग' निर्माण झाला. विशेष म्हणजे, कन्या राशीत बुध ग्रह आधीपासूनच स्वतःच्या उच्च राशीत विराजमान असून 'भद्र राजयोग' बनवत आहे. सूर्य आणि बुधाची युती दरमहा होत असली, तरी 17 सप्टेंबरपासून तयार होणारा हा संयोग या वर्षातील सर्वात शक्तिशाली योग मानला जात आहे. ज्योतिषाचार्यांच्या मते, हा बुधादित्य योग कन्या राशीत बनत असल्याने अतिशय शुभ फलदायी ठरणार असून, प्रामुख्याने 5 राशींचे नशीब सुवर्ण अक्षरांनी लिहिले जाणार आहे.
वृषभ राशीच्या जातकांसाठी हा राजयोग पाचव्या भावात बनत असल्याने अचानक मोठे यश घेऊन येईल. शेअर बाजार, म्युच्युअल फंड आणि क्रिएटिव्ह क्षेत्राशी जोडलेल्या लोकांना अफाट धनलाभ होईल. विद्यार्थ्यांना परीक्षेत मोठे यश मिळेल आणि नवीन नोकरीची संधी उपलब्ध होईल. मिथुन राशीचा स्वामी स्वतः बुध असल्याने चौथ्या भावातील हा योग सुख, समृद्धी आणि मालमत्ता वाढवणारा ठरेल. मिथुन राशीच्या लोकांना नवीन घर, दुकान किंवा गाडी खरेदी करण्याचे प्रबळ योग आहेत, तसेच आईचे पूर्ण सहकार्य आणि उत्तम आरोग्य लाभेल.
सिंह राशीच्या दुसऱ्या भावात म्हणजेच धन आणि वाणीच्या भावात हा योग बनत असल्याने हा काळ कुबेराच्या वरदानासारखा सिद्ध होईल. सेल्स, मार्केटिंग, बँकिंग आणि कन्सल्टन्सी क्षेत्रातील लोकांचा बँक बॅलन्स अचानक वाढेल आणि कौटुंबिक वाद संपुष्टात येतील. कन्या राशीच्या लग्न भावातच हा राजयोग तयार होत असल्याने याचा सर्वाधिक सकारात्मक प्रभाव याच राशीवर पडेल. व्यक्तिमत्त्वात प्रचंड आकर्षण वाढेल, मानसिक स्पष्टता येईल आणि व्यापारात मोठा नफा मिळण्यासोबतच नोकरीत मोठी जबाबदारी प्राप्त होईल.
धनु राशीच्या दहाव्या भावात म्हणजेच कर्म आणि करिअरच्या स्थानात हा राजयोग बनत असल्याने नवीन स्टार्टअप सुरु करण्यासाठी हा सुवर्णकाळ आहे. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्यांना मोठे यश मिळू शकते आणि मनासारखी नोकरी बदलण्याची इच्छा पूर्ण होईल. एकंदरीत, हा दुर्मिळ बुधादित्य योग या पाच राशींच्या आयुष्याला नवी दिशा देणारा ठरणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.