11 Aug Horoscope Dainik Gomantak
Horoscope

Horoscope: दिवाळी उघडणार नशीब! 'या' 5 राशींना होणार विशेष लाभ; सुटणार सगळ्या समस्या

Weekly Horoscope: सूर्य आणि मंगळ या दोन्ही ऊर्जेचे प्रतीक ग्रहांचे एकत्र येणे तुला राशीत होत असल्याने काही राशींसाठी हा काळ अतिशय फलदायी ठरणार आहे.

Sameer Panditrao

दिवाळीच्या या आठवड्यात ‘आदित्य-मंगळ राजयोग’ हा अत्यंत शुभ योग निर्माण झाला आहे. सूर्य आणि मंगळ या दोन्ही ऊर्जेचे प्रतीक ग्रहांचे एकत्र येणे तुला राशीत होत असल्याने काही राशींसाठी हा काळ अतिशय फलदायी ठरणार आहे. या राजयोगाच्या प्रभावामुळे वृषभ, कर्क, सिंह, वृश्चिक आणि कुंभ या पाच राशींना विशेष लाभ होणार असून, इच्छित यश आणि आर्थिक वृद्धीची संधी मिळेल.

वृषभ:
दिवाळीचा हा आठवडा तुमच्यासाठी शुभ फलदायी आहे. घरगुती समस्या सुटतील, व्यवसायात लाभ आणि नोकरीत नवे स्रोत तयार होतील. प्रवासाचे योग असून, लव्ह पार्टनरसोबत आनंदाचे क्षण घालवाल.

कर्क:
या आठवड्यात कार्यक्षेत्रात यश, वरिष्ठांची प्रशंसा आणि सुखद प्रवासाचे योग आहेत. विद्यार्थ्यांना मनासारखे यश लाभेल. कौटुंबिक वातावरण समाधानकारक राहील.

सिंह:
धन गुंतवणुकीतून मोठा लाभ होईल. परदेशी व्यवहार करणाऱ्यांसाठी काळ अत्यंत अनुकूल आहे. कुटुंबीयांचे सहकार्य लाभेल आणि सामाजिक प्रतिष्ठा वाढेल.

वृश्चिक:
दीर्घकालीन आर्थिक अडचणी दूर होतील. मित्र आणि महिला सहकाऱ्यांचा मोठा आधार मिळेल. कामात प्रगती होईल पण अहंकारापासून सावध रहा.

कुंभ:
जीवनातील अडथळे कमी होतील, गाडी पुन्हा योग्य मार्गावर येईल. प्रभावशाली व्यक्तींची भेट होईल. कुटुंबातील तणाव मिटतील आणि शासनाशी संबंधित कामांमध्ये यश मिळेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan-Afghanistan War: "पाकिस्तान क्रिकेट को बर्बाद करना चाहता है…" माजी अफगाण कर्णधाराची शत्रू देशावर टीका

राजधानीत नरकासुराचा 'हाहाकार', दिवाळीची तयारी जोरदार ; Watch Video

जब तक सूरज - चांद रहेगा तब तक पर्रीकर- रवि तुम्हारा नाम रहेगा! मागोवा

VIDEO: मुंबई इंडियन्सने शेअर केला चिमुकल्यांनी बनवलेल्या किल्ल्यांचा व्हिडिओ, फॅन्स म्हणाले, "म्हणूनच हा संघ आमच्यासाठी खास..."

Rama Kankonkar Attack: 'बेल' नाही, 'जेल'च! जेनिटोचा जामीन न्यायालयानं फेटाळला; तुरुंगातील मुक्काम वाढला

SCROLL FOR NEXT